Friday, December 24, 2010

An extract .from ."THE ETERNAL DUAL ..".....of my writings...!!

it would be  too early.........he thought.....about asking her.. 

when he was very near......nearer to her.......as both of them ...too unknown to each other..that time!!


then there were times ........he could have talked to her...atleast....!!


as they had ...atleast by then known to each other......to some extent..!!!
 
but he just let moments freely to be wasted...couldnt get nearer to her ....!.not by a single chance!!


times passed away......
.while passing as always time does...it marked their past AND carved on them the maturity.;increased their age....!!....
one more thing  the time somehow managed;very precisely;.....it PARTED them............totally seperated...differentiated.....!!


now was the problem for him....!!......she went without any relation ....HE remained with a specificationless AFFECTION.......unknown ....unsupported .......unacknowledged ....!!


""TIME has PLAYED foul games "" he used to think when he used to be in silent moments with himself ..thinking of HER and his own miserable life...!!


not only THE TIME had  removed his beloved to a far remote and unapproachable distance ;but also had scratched  HIS life by indeterminate and unsolved questions of stubborn and darkest destiny! HE couldnt  SOLVE them...the unwise dreadful questions..!!........
he fought with them as he could ....but doesnt know whether he won a bit or instead lost the whole essence of  his life [which once was so aspiring ..and demanding]...!!
 
......now someday he settles down at a lonely place......looks at completely changed himself....as if transformed from a golden object to some cast iron shineless thing ......feels awkward to look at himself....to recognize himself.......and suddenly HE remembers HER.........he sinks too deep inside the memories of her ........................

HE knows SHE LIVES STILL somewhere to a reachable distance by a vehicle......HE CAN SEE her smile IF he pursues her ....HE can even see her if he forcefully intends and tries to do so.......
.................BUT ....NO...!!....HE  knows well .....NOW it is not the matter of physical distance between them.....Which SEPARATES them.....but the LIVES of them have had been truly  and vigorously bifurcated ... ..they are not supposed to be united ...or mended together .................!!!



""IT  IS TOO LATE...""...........!!....HE SAYS TO HIMSELF AND THE IMAGE OF HER IN HIS HEART                            


 written by harshal
                           from his writings  
                           "the eternal dual"


........... 

Sunday, December 19, 2010

expressions for TRUTH...............!!

it is not the things we decide .......
but it is  the things who decide .......

what to flourish ,,,.......and when..!!
that all makes "DESTINY"..........!

THE power to strive is the outcome  of what we intake ....when we remain powerless..

  • it is the strength ..yet unknown to us whether it just depends upon the circumstances we are presented to overcome...or the instinct ...or the succession that already has been captivated by the soul during the birth of us..!!.....the prominent thing among this is that the ways of life are so scientifically arranged ..based on the minuscule fine laws though apparently unseen;but omnipresent and rigid enough to bind the events in all respects ...this extremely interlinked pre-maintained synopsis is out of bound of what is generally known as "philosophy of life"....................
 as we must understand ;the philosophical limits are not the real limits of philosophy as we many times presume;but they are the "relative  in capabilities" of the  humans who do not recognize the acute and inseparable unity in the universe; before propounding so called "philosophical "theories!!!............ 
....................................by''harshal deshpande"......................18d10

तुझ्यावीण...................................!!!!!!!

कधी वाटते चन्द्र होउन यावे..
तुझ्या दिव्य रूपावरी  पाझरावे..
तुझे नेत्र मिटता..हलुवार तेथे ..
तुझ्या शांत  निद्रेतूनी .स्वप्न व्हावे..


तुझे श्वास ते सौम्य ;झूलता  जरासे
तुझे ओठ निशब्द ;हलता जरासे ;
तुझे भाव अव्यक्त समजून घ्यावे;
तुझे नाव हृदयात ऐसे वसावे..!


पसरला सभोती दिशांचा पसारा..
पसरला जगाचा असा खेळ सारा..
तरी त्यात माझे नसे चित्त काही..
तुझ्यावीण ते सौख्य येणार नाही..
 इथे मानवान्च्या महाभव्य जत्रा
क्षणांच्या सुखाच्या बहुरंग यात्रा;
 तरी त्यात  नाही सुखाचा निवारा..


तुझ्यावीण हां जन्म निर्जीव सारा.......!!


हर्षल ............१८डी १० 

Wednesday, November 24, 2010

ईश्वर..!!

ईश्वराला शोधायची आवश्यकता नाही...

समस्त प्रश्नांचा अंत झाल्यावर ..तो आपोआप दृश्यमान होतो.......

...........परमेश्वर तर्कांच्या..; बुद्धीच्या पलिकडे विद्यमान आहे...!!

......अट एकच आहे...त्याला भेटण्यासाठी ..........ती म्हणजे ;;

आपले प्रश्न ;आपले तर्क ......"आपल्यातले "आपण"....संपून जायला हवे......!!

Thursday, November 11, 2010

******** philosophy ***********



it is the case with most of us ...who learn and go on doing the same...without knowing the adaptation we unknowingly do or accept in the process called as "learning"..!!
 
when the search of the life and all around us..the universe ..will be done or made by accurate and wholesome
understanding of "relativity"..and "unity".......we start gaining what is known as "knowledge"..!!
 
science or art or any other part or stream of the information or any kind of virtue .........they are not different..!!..all coincide at a point...this unity of grasping the truth is the real "knowledge"or say "philosophy"..
we analyze the unique phenomenon by number of names ..focusing on certain prior aspect of the event...hence we analyze always a fraction of the incidence...the truth is like a point..accurate .. but still may be existing or non existing..!!...if u say a point exists [in maths]..u cant give the dimensions for it..the existence of point is only adopted on the basis of "mere idea of accepting its existence"........but if u dont accept it.no dimension can take birth!!........like wise the core form of truth is existing but free of any binding ...but without which nothing can form or exist!!!,............
 
*************************** h a r s h a l *******.

Wednesday, November 10, 2010

तो आणि ती ----भाग २

तो आणि ती ---part second
                                           ..*..........ती ............*


"ती ज़रा अस्वस्थच  होती काल पासून ....तीलाच कळत नव्हते!!..
आज   ती लवकर उठली..फ्रेश व्हायला फारसा वेळ न लावता तयार होउन खाली आली....
कालच तिला मागणी आली होती..मुलगा चांगला एम. बी. ए!!. ....महितितला !!..आई बाबांना आवडलेला !!...गोरापान ..अगदी नाव ठेवायला जागा नाही!!...........
मुख्य म्हणजे दारात स्थळ चालत आलेले !!..काल रात्री तीच्या वाढदिवसाला बाबांनी घोषणा सुद्धा केली भर पार्टीत !!!...कित्ती मित्र -मैत्रिणी आले होते.!!.
..पण..पण ..काहीतरी चुकत होत!!.... अचानक लग्न !!..काहीतरी चुकत होते.!!.
.मागणी घालणारा मुलगा उत्तम होताच ..पण तिला उगाचच अस्वस्थ वाटत होते..!! ती विचार करू लागली ,""  .अगदी तरुण वयापासुनच..तिला वाटायच  आपण प्रेम वगैरे कराव,,अगदी जीवापाड  !!..पण तशी  वेळच  नाही आली.. !!.अभ्यास ..मित्र .मैत्रिणी .यात वेळ कसा उडाला आणि कॉलेज कधी संपले ते लक्षातच नाही आले..!!रोमांटिक कथा पुस्तकापुरत्या उरल्या."".तीच्या  मनाने एक अलगद हुंदका दीला..,,,",आता  ते सारे संपणार ..स्वप्नांचे जग ..प्रेम कवितांची हुरहुर ...!!"";
.."'आपल्याला आपल्या आवडीचा कोणी भेटलाच नाही का??..की तसा कुणी असून आपणच दुर्लक्ष केले?""........ती स्वतालाच तपासू लागली.................
."".आजवर कॉलेजात अनेक मुलगे मागे लागले असतील...पण तेवढयापुरते..!!"....
...ती तशी दिसायला गोड होतीच.....हुशार  सुद्धा ! ......तिला वाटल .."; खरच!; आजवर आपल्यावर प्रेम करणारा ...प्रमाणिक प्रेम करणारा कुणीच कसा नाही भेटला..?..निदान आपल्याला तसे का नाही वाटल कुठल्या मुलाबद्दल??....आपण  तर ठरवले होते ,..प्रेम विवाह करावा...निदान प्रेम तरी.!.".....ती विचारांत बुडाली ....."असा कुणी होता का /..ज्याला आपण आवडत होतो..मनापासून??"....


..........अचानक तिला धक्का बसला ...हलकासा !!...एक अस्पष्ट चित्र.. "ती"च्या  अबोध मनाने चितारले देखिल होते....."त्या"चे!!!.
  ""तो"?..."तो ?" ....हो नक्की तोच .......पण "तो "तर तिच्याशी बोलायचा देखील नाही....एकच नव्हे  तर अनेक वर्ष....!!


ते दोघे एका वर्गात नव्हते ....कॉलेजात नव्हते ...एका समान विश्वात नव्हते ...अगदी दोन साध्या मित्रांत असते तितकी सुद्धा ओळख नव्हती त्या दोघांची.. .फ़क्त ते एकमेकाना सामान्य  परिचयाचे होते..एकमेकांच्या आसपास राहणारे !!बस्स..!!इतकेच..!! ....पण कुठलेसे नाते दोघांत जन्मापासून बनले होते ठावूक नाही...."हाच अदृश्य बंध आपल्याला त्रास देतोय का?" तिला वाटले !!....."".काल पार्टीत "तो" होता का?..होय..होता तो..!!..शांत पणे आपल्याकडे बघत होता!!..आपण एकच क्षण पाहिले असेल त्याला !!..काहीतरी  सांगायचे ..असल्यासारखा अगतीक चेहरा होता त्याचा....बाबांनी लग्नाची घोषणा केल्यावर तो
दिसलाच नाही...."" ...ती अचानक भानावर आली..!!..आपण विचार करतोय ते खरे की भास् ??...काहीच समजेना  ..!!....एकच प्रश्न होता.."' की ;हे जर खरे असेल तर त्याने या आधी सांगितले का नाही??"...ती अस्वस्थ झाली....


.......इतक्यात ..तीचा फोन वाजला .. सुप्रियाचा होता ...सुप्रिया फोनवर विचित्र आवाजात थरथरत बोलत होती..आवाज कंप पावत होता..पण तिला स्पष्ट ऐकू आले "त्या"चे नाव.. सुप्रिया पुढे  सांगत होती;"".."तो ".."तो " काल पार्टी अर्धवट सोडून गेल्यावर ; वेड्यासारखा रात्री एकटाच शहरात फिरत होता...मध्यरात्री रस्त्यावर बेशुद्ध होउन पडला ...पहाटे दवाखान्यात नेले....अजुन तस्साच आहे..शुद्ध नाही!!..आणि..आणि...".त्या"च्या हातात तुझा चुरगाळलेला ...फोटो होता.""!!


 *****************लेखन---हर्षल...{काल्पनिक कथा]....

तो आणि ती --- part one

..........................*******.........तो......******
तो रस्त्यांवरून रात्रीचा  एकटाच चालतोय...
डांबरी रस्त्यावरून पाउस नुकताच सरपटून  गेलाय ....
ओलसर कात टाकलेल्या नागासारखा ...वळत -वळत पुढे पुढे धावणारा रस्ता...
सर्वत्र अंधार ..दोन्ही बाजूंच्या रस्त्यावरच्या दिव्यांच्या ओंजळीतून  ओसंडणारा प्रकाश ..तेवढाच जीवंत पणा..सम्पूर्ण अंधारात..!!....
.त्याच्याशिवाय रस्त्यावर कोणीही नाही....!!
लांब  कुठेतरी शेवटची लोकल ट्रेन ..निघून गेल्याची अस्पष्ट सूचना ....!!..आता पहाटेशिवाय लोकल सुद्धा नाही..
"किती वेळ फिरणार आहेस.?"...तो मनाला विचारतो.....काहीही उत्तर नाही..
पाठीच्या म ण क्या तून वाहणारी बधीर संवेदना ....मनाला गुरफटून बंद करून शरिराभोवती वेढ़े टाकून बसलेली आहे..
कित्येक तास झालेत ....वेढा अजुन सुटत नाही....
.पाय यंत्रासारखे चाललेत ....दिशा नाही ..नियंत्रण तर अजिबातच नाही..
.....कुठेतरी माणसांची चाहुल लागते....हो..दारुडेच असणार बहुतेक ..".तो " थोडासा भानावर येतो....
...आजुबाजुचा निर्जन भाग ....दमलेले पाय ...सुन्न मन...
सारे जाणवते आहे आता "त्याला"....सारे आठवते आहे आता...अगदी स्पष्ट !!..विषासारखे दाहक   ..!!.. 


.........आणि आठवलेले सारे सत्य आहे...ही भयंकर जाणीव सुद्धा ......त्याच्या मुठी त्वेषाने व ळ तात.....
अंग दु:खाने  थरथरते....डोळ्यांतून अश्रूंचा अबोल झरा ओसंडून वाहू लागतो.....
..एका एकी स्मृतींचे ....फार जुन्या स्मृतींचे
चित्रपट मस्तकात चक्राकार गतीने गर्दी करतात ......आणि "तो" विसरतो...आसपासच्या अर्धप्रकाशीत शांत विश्वाला...
....मस्तकात गतकालाच्या स्मृतींचे थैमान सुरु होते....असह्य ...एकेक आठवण...एकेक स्वप्न .....
मेंदू विचार करण्याच्या पलिकडे पोचतो...छाती फाडून बाहर येइल ..अशी हृदयाची धडपड सुरु होते...!!
.सारेच  सन्दर्भ सुटतात ...विचारांची मनावरची पकड़ पार सुटून जाते.!1.
..का ळ.-..वेळ- जाणीव शून्यात कोसळत जाते..!!..अगदी खोल ..भयंकर अंधाराचे आवर्त उधाणलेले असतात...!!सैताना सारखे .....!!...भविष्याचे पडदे दिसेनासे होतात...वर्तमानाचे फास गच्च बसतात ...अखंड शरीरा-भोवती..!!
.....मन अस्वस्थ्तेच्या अन्तिम पायरीवर उसळते..............!!!!


........आणी ..अचानक सारे थंड पड़ते ...   ."तो "  भर रस्त्यावर कोसळतो.!!.उध्वस्त  व्रुक्षासारखा!!... एकाकी .रस्त्याच्या   मध्यावर .!!.ओल्याशार रस्त्यावर तो पडताना हलकासा आवाज होतो...तेव्हढाच  !!. पुन्हा......सारे काही शांत होते,!!*****


**** इस्पितळ!त..."त्या"च्या   बेशुद्ध देहाशेजारी उभे राहून नर्स घरच्यांना विचारते ...."काय झाल  काय ?..ही इज वेरी सिरिअस    ;तो आता माणसांत परत येइल हीच शंका आहे..!"...........
घरचे सारे निरुत्तर ...........
त्याचा एकुलता एक जीवलग  मित्र अश्रु सावरत ओरडतो.." "ती ".."त्या"च्यापासून फार दूर गेली ; डॉक्टर";...कायमची!!..  अगदी कायमची ...बहुतेक .!..""!!!


--------------लेखन ------हर्षल.......(काल्पनिक कथा  आहे याची कृपया नोंद असावी ;लेखक सुद्धा सुस्थितीत आहे हे लक्षात असू द्यावे.@@!! )

Monday, November 8, 2010

**रुद्रचेतस *

संगरांतून जन्मलेला तप्त अग्नीश्वास मी.....!!
रूद्र -यागांतून उठता उग्रतम नीर्यास मी.....!!!


चेतलेल्या वादळांचा शांत अंतर्भाग मी....!!!
उसळत्या लावा रसांचा दीर्घ-स्त्रावी राग मी.......!!


सूर्यमंडळ भेदणारा इन्द्रप्रेषित नाद मी..!!
श्री हरीने भारलेल्या बासुरीची साद मी ..!!


सर्व-भंजक शंकराच्या सत्पदांचा दास मी..!!
नित्य विष्णु वंदणारा ;वैष्णवांचा ध्यास मी..!!


सज्जन्नांच्या हृदय्स्थानी राहतो शुभ हर्ष जो!!!!! ..
दुखितांच्या मर्मस्थानी नीत्य-जागृत शोक जो!!!१


मी तयांचे संगमांचा नीत्य साक्षीदार आहे!!!
माजिया कंठात म्हणुनी ईश्वरी हुंकार आहे!!!
 -------------------------------------
--------------------------------लेखन -- हर्षल 

**************:::!!सायंतारा!!!!******

                                       
हरवता दीवस ;सोनेरी ;संथ नभांत!!!
परतता खगांचे;जथे शुभ्र डौलांत!!!!
तो सूर्य; तेज घेउन परतता मागे!!!
अस्मानी उरती ;केशर रंगी धागे!!


मन सुप्त नद्यांचे;प्रवाहान्तूनी वाही!!!
खळ-बळ हृदयातील ;मूक खळाळत राही !

ते दूर ;खोल सागरी जन्मती वारे!!
धावती गर्द रानात पीसाटून सारे!!!


उरतात भास ;नभदेह कृष्ण होताना!!!
फीर्तात कौल मानसी; सांज येताना!!!
अंधार अंतरी ;अलगद पाउल ठेवी !!!
नयनांत जागते ;नीवांत निद्रा-देवी !!!


 सल कुठली ;लागे अशांत कातरवेळी !!
 बेभान चीत्त ;करती ह्या "सायंकाळी "!!!!


अन्; अशाच वेळी;चकाकूनी वर उभरे!!
तो सायंतारा;क्षितिजावर्ती;पसरे!!!

लाघवी ;शुभ्र ;अनीवार;उजळते बाहू!!
धरतीस ;आपुल्या मिठित;घेती पाहू!!

ते हास्य ;शुभंकर; मंगल्तेचे स्थान!!!
अंतरात ठेवी;नीत्य-प्रकाशी भान!!!!!
.......................................हर्षल .....

विश्रांती ........

किती फीरतील रे ;फीरतील खग ;मेघांत..??
दिवसाचा तो ;होता होता अंत..!!
लागेल जीवा ..लागेल छंद घरटयांचा ..
उसलेल मनी ..उसलेल मोह परतीचा...!!


येतील पहा...येतील सांज होताना...
दिसतील जगा ;ते थवे परत येताना...!१


जणू आपणही ;ते विहंग जग भ्रमणारे ...
श्रमल्यावरती ;अन ;घराकडे   वळणारे    ..............
,;..........................हर्षल!!!

......आजही...!!

असे आजही काळजाला ; विखारी;
जुन्या बंधनांचे जरी भान सारे...
तरी आजही मूर्त चित्रे सुखांची ;
किती पाहते रोज वेडे बिचारे..!!..१]


जरी आज संध्या मनांतून दाटे...
जरी दाटतो डोह काळआ सभोती..
तरी अंतरी एक आशाही नांदे ...
मला दाखवी नित्य स्वप्ने प्रभाती ...!!


असा घोर की ;विश्व बंदिस्त माझे ,
असा दाह की ;गोठतो जीव सारा ...
तरीही कुठे सूक्ष्म ;नादे अजुनी..
मनाच्या तली ;शांत स्वानंद वारा..!!३]


विजांचे जणू तप्त कल्लोळ खाली ;
मेघान्तूनी द्रोह ओतून यावे;
फीरावे जणू उष्ण ;वैशाख वायु;
अखंडीत आयुष्य भाजूनी जावे...!!
........तसे उग्र थैमान माझ्या मनांचे;
किती काळ झाले;अजुनी विझेना ...
तरी त्यातही एक अंकुर आहे..
विश्वासदायी;तोही मरेना...!!


......असो आज छाया ..महागर्द सार्या..
असो दुःख निष्टुर ..आनंदघाती... !!
तरीही मनांतून सौजन्य आहे...नवी आस आहे..
तरीही प्रपाती..!!


येवो कितीही महापूर आता....
मनांतून विश्वास वाहे अजुनी..
अजुनी रुधीरांत चैतन्य आहे..
महादेव अन्तस्थ आहे अजुनी....!!!
...............................................हर्षल [10/6/2009

ABOUT ""HARSHAAYAN""....हर्षायन!!

"मी"आहेच..पण "माझे"काहीही नाही...!!


"चालवीतो राम ..तैसाची चालतो..
.बोलतो तयाची वरदत्त  वाणी..!!
.पाहतो तयासी नित्य अंतरात ..
.तारतो अखंड एक चक्रपाणि...
.............................श्रीरामचरणरज -- हर्षल !!             

Friday, November 5, 2010

************ शौर्य **********




  
वाचता संदेश यवनांचा विखारी 
वीर ते मेवाडचे उठले करारी ;
केसरी रजपूत पाणीदार सारे .. 
परतंत्र राजस्थानवासी सिंह  सारे..!! 
वक्र त्या ताठून उठल्या ;
उग्र भिवयां.....
गेल्या फुलारून थरथरा 
त्या मर्द धमन्या ..
दंड पोलादी शीगां सम तप्त झाले..
 मस्तकांतून उग्र मग थैमान चाले.. 

 क्रोध रक्ताहून सरसर फिरत पसरे 
आवेग शौर्याचा मुखांतून तीव्र उसळे 
हर हर शिवाचा नाद गर्जे शत्-मुखांनी
शब्द ते घुमले कितीदा दश दिशांनी ...!!

.... घेतले शूरान्नी श्वास;
             भरारत  ऊर;
संताप चढ़े रक्तात;
            उठे काहूर!!!
  ताणल्या  गर्दना अभीमानी अश्वांच्या!!
रिकिबीत रोवूनी ; पाय जाहले स्वार्!!
त्या समोर फूटता; ईशारतींच्या तोफा!
वीज फुटावी;;तसा उसळला ताफा!!!!


ते उधालेले वणवे राजस्थानी!!
सरदार तयांचा "प्रताप " तो अभीमानी..!!!
प्रेरणा  एक ;ती आग एक अंगात !!
ते जळते तारे ;कोसळते  मेघांत !!!


सरसरा तापती;चक-चकती ती कवचे!!! !
ण खणती  भाले :शमशेरी अन् बर्चे!!
ते जाळत गेले ;ऊजाड रेगिस्थाने !!
गद-गदा हालवित ; ऊंच कोरडी राने!!


अंधार फाडूनी;सूर्य;;शेकडो जळले !!
संतप्त शिवाचे ,बाण सणाणत  सुटले!!!!!
 ते, जणू पसरले अंगारे फूललेले!!!;
वा; वाघ भयंकर रानातुन सुट्लेले!!!!!
ते उठ्वीत गेले मेलेल्या हृदयान्ना !!
अन् स्व-ताच शोधत मृत्युच्या दूतान्ना!!


........लेखन ......हर्षल

**आई





आई म्हणजे काय आहे....आईलाही कळत नाही!!
तरीसुद्धा तीची माया ; रेसभर सरत नाही!!


आई म्हणजे नीरांजनातील ...शांत जळती वात असते!!
आई म्हणजे अंधारातील ...पौर्णिमेची रात असते!!
आई म्हणजे लहानग्याच्या उरामधली आस असते!!
आई म्हणजे घरामध्ला आनंदाचा श्वास असते!!


आई म्हणजे दान असते ...ईश्वराचे गान असते..!!
आई म्हणजे घरामधल्या ..शुद्धतेचे मान असते!!
आई असते एक कुशी ...प्रेमभराने नीजण्याची!!
आई असते एक जागा..रोज पाया पडण्याची!!


आई मूक जगत जाते....उन-पाउस झेलत जाते..!!
इतरांसाठी जगता जगता ...संथपणे सरत जाते!!
सगळे वणवे पाहत पाहत नदीसारखी  सुकत -थकत.. !!
जमेल तीत्के प्रेम ओतत ...आत खोल..झुरत जाते!!


कुणालाही कळत नाही ,,,आई म्हणजे काय असते...
एक कळते तीच्यावाचून घरा-घरात "हाय'असते!!

..रुद्रार्चनम.........!!



महामहेंद्र-स्थावरं..-जटासलीलवेष्टीतम् ;त्रिलोचनं .विशेश्वरम,
मदांधनाद भयरवं.;
विराटभाल चर्चीतम..समुद्रकांतशेखरम;
महेश्वरम;सुरेश्वरं,भजाम्यहम भयन्करम!!


हिरणय बाहू धारणम ;हलाहलांतकारणम ;
प्रतीक्षणम ; प्रतीक्षणम;भजाम्यहम शिवारणवम् !!


सदैव पार्वतीपतीम;गजाननस्य निर्मिकम;!
अमोघधर्मरक्षकम;अखंड-ध्यान-धारकम;!
विशेष द्रोह प्रज्ज्वलम ;विशेष वर्ण प्रज्ज्वलम ;!
प्रकांडपौरुषस्वलम; अघोर रुद्र उज्ज्वलं ...
दग्ध धर्म नाशकं ;असुर वंश तापकम;
निशाचरेन्द्र नायकं ;मखांगमेधसायकं !!
विषानतकम ;पुरान्तकं;
भयान्तकम ;भवान्तकं..
प्रदोष द्रोह शान्तकम...नमाम्यहम नमाम्यहम !!
....................हर्षल .........
***************वारस- दार  *************************
रस्त्यावरच्या बेभान झुंडी....
धर्माचे घेतात नाव... खातात शपथा महावीरांच्या!!
आणी फोडून काढतात ..काचा घरांच्या ;गाड्यांच्या !!!

पेटवून देतात ;मस्तवाल-पणे दुकानांच्या रांगा...
कळकट टायर ;लाकडी तख्ते ;...आणी हो; माणसेही ...!!

जाळणारे सांगत असतात ;मानवतेची शुभ्र वचने!!
महान माणसांची थोर स्वप्ने!!'
त्यांच्या मते;;हातातल्या हरेक दगड़ावर !!
पर्मेश्वराची अनुमती असते ;
स्वता देवाने दीलेली......!!!
क्रान्तीचे उघड संदेश ..समाज जाळणयाचे उघड आवाहन!!
त्यांना मीळत असते ;याच "त्यांच्या "देवाक्डून!!

ते सांगतात ;
सैतानाचा नाश होवो;;आमच्या रक्त-उज्जवल संघर्शान्तून!!
आम्ही मार्तोय त्याच्याच ;वारस्दारान्ना!!
आमच्या तर्वारी ;आमचे पत्थर ;आमच्या आरोळ्या ....!!
कापून जातील राक्षसी आकान्षा!!
गाडून टाकतील सैतान ;पाताळ-यंत्री !!

अन खरोखरच हजारो गाडले जातात !!
उसळतात उग्र ज्वालान्ची संगरे!!
नागासारखी धूम्र-वलये ;जळत्या राखेंतून!!
लाल होतात दीशांचे पडदे!!...
उठतात हजारो आरोळया .मर्न्र्यांच्या मार्नार्यांच्या!
.हल्लेखोर नीघून जातात तसेच वणव्यासारखे!!
जळणारया जमीनीवर्चा एक ढग ;लाल लाल अस्मानातला!!
संथपणे बाजूला होतो!!
दोन डोळे ताम्बार्लेले...नीराकार..नीर्वीकार..!!
पाहून घेतात हैदोस...आणी हैदोसाच्या नीर्मात्यान्ना!!!!
अनेक शत्कांचा अनुभव...पुन्हा घेत असतात!!
आनंदीत होउन..!!..शांतातेसाठी जनावर होणारे अनावर जमाव....
त्यांना सापडलेले असतात...!!
जुने भक्त मेलेले असतात..तीकडे पाहात नाहीत ते डोळे !!
........सैतानाला नवीन वारसदार मीळ!लेले असतात.......पुढच्या काही दश्कांसाठी !!
______________________*****हर्शल (१४\०३\२००८)..रा. ९.०० वाजता!!

Thursday, November 4, 2010

sadhya..............

.......सध्या.......!!
आजकाल सायंकाळी उदास उदास शब्द गात...
विनाकारण काळजामधे खोल आत रूतत जात...
मनावरती दाटून येत ..संथपणे सरत आहेत..!!
एकेक क्षण गोठून टाकत..नवे वार करत आहेत..!!


पिन्जार्लेल्या नशीबासाठी..वादळलेल्या दुखासाठी..!!
नवी पहाट अजुन्सुद्धा मेहरबान होत नाही...
आकान्शेचे दोन किरण दान तीही देत नाही...!!


दिवसभर तेच सल्..मनामधे करून खल..१
जेंव्हा ह्रदय भरून येते..डोळया मधून झरून जाते...
तेंव्हा सुद्धा शांत झोप रात्रभर लागत नाही..!
रात्र सुद्धा बेईमान ..अन्गामधे भीनत नाही..!!


पुर्वीसारखे आज नाही...चैतन्याचे भान नाही..
मनामधे आज तरी सौजन्याचे स्थान नाही!!
आजकल श्वासामधून निर्जीव वायु आत येतो...
सजीव शरीर नीर्जीव्पणे...जगवण्याचा त्रास होतो!!!
-------------------------------------हर्शल२०/०४/2009

ishwar

सारे जुनेच आहे ....
आयुष्य तेच आहे...


वाटा सरून गेल्या ..
अंधार सावल्यांच्या..
अजुनी तरी मनाला ..
उद्वेग तोच आहे..!!


सारे नव्या-जुन्यांचे ..
उरलेत बोध हाती..
स्वप्नातल्या जगाचा..
चालूच शोध आहे.....!


आशा स्वतंत्र होत्या..
होते स्वतंत्र भान..
हृदयात नित्य होते ..
विजयी प्रताप गान


आले कुठुनसे ते ..
उसवून अंतराला ..
दुर्भाग्य ते विषारी..
आले असे फळ!ला !!


हे घोर संचिताचे..
आवेग आत्मघाती..
जालून सर्व गेले..
सौंदर्य मग्न नाती..!!\


उतरून सूर गेले..
गेले सरून धीर..
कालिज आत खोल ..
झाले उगा अधीर..!!


क्रोधात सौख्य नाही..
लोभास सख्य नाही..
प्रेमात मोह नाही..
सामर्थ्य द्रोह नाही..
होई अशी अवस्था ..
पसरे सभोवताली ..
आयुष्य प़रण -सुमने ..
निर्माल्य रूप झाली..!!


तरीही मनात वाहे..
विश्वास धर्मरूपी..
उसले अजुन सारा ..
अभिमान आत्मरूपी..


वाटे समस्त मजला ..
तो देव पाहताहे..
श्वासात सर्व माझ्या.
त्याचा निवास आहे..


रक्षील तो जयासी ;
कसली त्यास चिंता..
हा देह सर्व त्याचा..
त्याचेच पायी माथा..!!
..............................हर्षल देशपांडे ...३/०९/२०१०

.....भास .....





कितीदा मनासी तुझी ओढ़ वाटे..अजुनी कितीदा तुझे भास होती..
अजुनी तळाशी मनोसागरान्च्या..
चमकती स्मृतींचे तुझ्या शुभ्र मोती..!!१]


पलाशांत फुलत्या सुरक्तांग साऱ्या..
अजुनी तुझी पाहतो धुंद चर्या..
उधाणुन आकाश येता ढगांनी..
वीजान्च्या प्रकाशी तुझे भास् होती..!!२]


उरे भोवती विश्व बेरंग सारे...
तुझ्यावीण निर्जीव सारे पसारे...
रक्तांत अजुनी तुझ्या आठवांच्या ..
अति उंच लाटा उफाळून येती..!!३]


कसे सावरावे ..कसे शांत व्हावे..
कसे सांग सखये ;असे मी जगावे..?
जाणार नाही मनांतून प्रीती.. !!
तुला वीस्मरूनी..उरे काय हाती??? ४]


::::::::::::::::::::::::हर्षल :::::२\०९\२००९.!!११.१९..

अत्यंत विशेष सूचना:-- कृपया ही कविता वाचून "आम्हाला नाय सांगणार?? कोण रे ती मुलगी ??,,लब्बाड्डा !!...सांग ना रे कोण रे ती मुलगी ??.. ""..असे फालतू प्रश्न विचारू नयेत ...कविवर्य हे जन्माने पुण्याचे असल्याने अशा प्रश्नांना फारच उर्मट पणे उत्तरे देण्यात ते वाकबगार आहेत...ह्याचे भान ठेवावे ..ही विनम्र सूचना!!
............कळावे .लोभ असावा ======== हर्षल..!!

virah



सरूनी कीतीएक ओसाड गेले ;उन्हांचे उसासे नभांच्यातूनी!!
कीती-एक हंगाम ओसंडले ते ;तुझ्या आणी माझ्या प्रीतीवाचूनी!!
कीती ते उन्हाले ;कीती पाव्साले;कीती यौवनाचे गुलाबी हीवाले!!
तुझ्यावाचूनी रीक्त जगलो कसा मी;उरी राहीली उग्र ती वादले!!


तुझे नेत्र ;चंद्रार्क ते वाह्नारे;तुझे हास्य माधुर्य मोती पीसारे !!
तुझी पाउले चंदनान्च्या खुणान्ची; तुझे स्पर्श ते तीव्र रोमांच सारे!!
तुझ्या गोड रूपांतली दीव्यता ती;तुझ्या स्तब्ध प्रेमातली सौम्यता!!
अजुनी प्रतीदीन स्मृतीत आहे;तुझ्या आसवांतील वैफल्यता!!


अजुनी तसा मी शहाणाच आहे;उरीचे उसासे उरी ठेवतो!!
मनान्तून ओसंडत्या आसवांना; सवे घेउनी हासूनी चालतो!!
कसे वेड जाईल काही कले ना ;तुझी ओढ़ काळीज खेचून घेते!!
तुझ्या आणी माझ्या दूभंगून गेल्या;पथाच्या वरी रोज घोटाळते !!


............................हर्षल.........