कितीदा मनासी तुझी ओढ़ वाटे..अजुनी कितीदा तुझे भास होती..
अजुनी तळाशी मनोसागरान्च्या..
चमकती स्मृतींचे तुझ्या शुभ्र मोती..!!१]
पलाशांत फुलत्या सुरक्तांग साऱ्या..
अजुनी तुझी पाहतो धुंद चर्या..
उधाणुन आकाश येता ढगांनी..
वीजान्च्या प्रकाशी तुझे भास् होती..!!२]
उरे भोवती विश्व बेरंग सारे...
तुझ्यावीण निर्जीव सारे पसारे...
रक्तांत अजुनी तुझ्या आठवांच्या ..
अति उंच लाटा उफाळून येती..!!३]
कसे सावरावे ..कसे शांत व्हावे..
कसे सांग सखये ;असे मी जगावे..?
जाणार नाही मनांतून प्रीती.. !!
तुला वीस्मरूनी..उरे काय हाती??? ४]
::::::::::::::::::::::::हर्षल :::::२\०९\२००९.!!११.१९..
अत्यंत विशेष सूचना:-- कृपया ही कविता वाचून "आम्हाला नाय सांगणार?? कोण रे ती मुलगी ??,,लब्बाड्डा !!...सांग ना रे कोण रे ती मुलगी ??.. ""..असे फालतू प्रश्न विचारू नयेत ...कविवर्य हे जन्माने पुण्याचे असल्याने अशा प्रश्नांना फारच उर्मट पणे उत्तरे देण्यात ते वाकबगार आहेत...ह्याचे भान ठेवावे ..ही विनम्र सूचना!!
............कळावे .लोभ असावा ======== हर्षल..!!
No comments:
Post a Comment