Monday, November 8, 2010

......आजही...!!

असे आजही काळजाला ; विखारी;
जुन्या बंधनांचे जरी भान सारे...
तरी आजही मूर्त चित्रे सुखांची ;
किती पाहते रोज वेडे बिचारे..!!..१]


जरी आज संध्या मनांतून दाटे...
जरी दाटतो डोह काळआ सभोती..
तरी अंतरी एक आशाही नांदे ...
मला दाखवी नित्य स्वप्ने प्रभाती ...!!


असा घोर की ;विश्व बंदिस्त माझे ,
असा दाह की ;गोठतो जीव सारा ...
तरीही कुठे सूक्ष्म ;नादे अजुनी..
मनाच्या तली ;शांत स्वानंद वारा..!!३]


विजांचे जणू तप्त कल्लोळ खाली ;
मेघान्तूनी द्रोह ओतून यावे;
फीरावे जणू उष्ण ;वैशाख वायु;
अखंडीत आयुष्य भाजूनी जावे...!!
........तसे उग्र थैमान माझ्या मनांचे;
किती काळ झाले;अजुनी विझेना ...
तरी त्यातही एक अंकुर आहे..
विश्वासदायी;तोही मरेना...!!


......असो आज छाया ..महागर्द सार्या..
असो दुःख निष्टुर ..आनंदघाती... !!
तरीही मनांतून सौजन्य आहे...नवी आस आहे..
तरीही प्रपाती..!!


येवो कितीही महापूर आता....
मनांतून विश्वास वाहे अजुनी..
अजुनी रुधीरांत चैतन्य आहे..
महादेव अन्तस्थ आहे अजुनी....!!!
...............................................हर्षल [10/6/2009

No comments:

Post a Comment