आई म्हणजे काय आहे....आईलाही कळत नाही!!
तरीसुद्धा तीची माया ; रेसभर सरत नाही!!
आई म्हणजे नीरांजनातील ...शांत जळती वात असते!!
आई म्हणजे अंधारातील ...पौर्णिमेची रात असते!!
आई म्हणजे लहानग्याच्या उरामधली आस असते!!
आई म्हणजे घरामध्ला आनंदाचा श्वास असते!!
आई म्हणजे दान असते ...ईश्वराचे गान असते..!!
आई म्हणजे घरामधल्या ..शुद्धतेचे मान असते!!
आई असते एक कुशी ...प्रेमभराने नीजण्याची!!
आई असते एक जागा..रोज पाया पडण्याची!!
आई मूक जगत जाते....उन-पाउस झेलत जाते..!!
इतरांसाठी जगता जगता ...संथपणे सरत जाते!!
सगळे वणवे पाहत पाहत नदीसारखी सुकत -थकत.. !!
जमेल तीत्के प्रेम ओतत ...आत खोल..झुरत जाते!!
कुणालाही कळत नाही ,,,आई म्हणजे काय असते...
एक कळते तीच्यावाचून घरा-घरात "हाय'असते!!
सुंदर कविता !!!
ReplyDeletekavita awadlyabaddal dhanyavaad......bt this is not really very gr8 poem...well the subect mother is gr8..hence ..it seems gr8..aso...this poem i st wrote in 7th or 8th std....jst found so published..!!
ReplyDelete