हरवता दीवस ;सोनेरी ;संथ नभांत!!!
तो सूर्य; तेज घेउन परतता मागे!!!
अस्मानी उरती ;केशर रंगी धागे!!
मन सुप्त नद्यांचे;प्रवाहान्तूनी वाही!!!
खळ-बळ हृदयातील ;मूक खळाळत राही !
ते दूर ;खोल सागरी जन्मती वारे!!
धावती गर्द रानात पीसाटून सारे!!!
उरतात भास ;नभदेह कृष्ण होताना!!!
फीर्तात कौल मानसी; सांज येताना!!!
अंधार अंतरी ;अलगद पाउल ठेवी !!!
नयनांत जागते ;नीवांत निद्रा-देवी !!!
सल कुठली ;लागे अशांत कातरवेळी !!
बेभान चीत्त ;करती ह्या "सायंकाळी "!!!!
अन्; अशाच वेळी;चकाकूनी वर उभरे!!
तो सायंतारा;क्षितिजावर्ती;पसरे!!!
लाघवी ;शुभ्र ;अनीवार;उजळते बाहू!!
धरतीस ;आपुल्या मिठित;घेती पाहू!!
ते हास्य ;शुभंकर; मंगल्तेचे स्थान!!!
अंतरात ठेवी;नीत्य-प्रकाशी भान!!!!!
.......................................हर्षल .....
No comments:
Post a Comment