Monday, November 8, 2010

**रुद्रचेतस *

संगरांतून जन्मलेला तप्त अग्नीश्वास मी.....!!
रूद्र -यागांतून उठता उग्रतम नीर्यास मी.....!!!


चेतलेल्या वादळांचा शांत अंतर्भाग मी....!!!
उसळत्या लावा रसांचा दीर्घ-स्त्रावी राग मी.......!!


सूर्यमंडळ भेदणारा इन्द्रप्रेषित नाद मी..!!
श्री हरीने भारलेल्या बासुरीची साद मी ..!!


सर्व-भंजक शंकराच्या सत्पदांचा दास मी..!!
नित्य विष्णु वंदणारा ;वैष्णवांचा ध्यास मी..!!


सज्जन्नांच्या हृदय्स्थानी राहतो शुभ हर्ष जो!!!!! ..
दुखितांच्या मर्मस्थानी नीत्य-जागृत शोक जो!!!१


मी तयांचे संगमांचा नीत्य साक्षीदार आहे!!!
माजिया कंठात म्हणुनी ईश्वरी हुंकार आहे!!!
 -------------------------------------
--------------------------------लेखन -- हर्षल 

No comments:

Post a Comment