सारे जुनेच आहे ....
आयुष्य तेच आहे...
वाटा सरून गेल्या ..
अंधार सावल्यांच्या..
अजुनी तरी मनाला ..
उद्वेग तोच आहे..!!
सारे नव्या-जुन्यांचे ..
उरलेत बोध हाती..
स्वप्नातल्या जगाचा..
चालूच शोध आहे.....!
आशा स्वतंत्र होत्या..
होते स्वतंत्र भान..
हृदयात नित्य होते ..
विजयी प्रताप गान
आले कुठुनसे ते ..
उसवून अंतराला ..
दुर्भाग्य ते विषारी..
आले असे फळ!ला !!
हे घोर संचिताचे..
आवेग आत्मघाती..
जालून सर्व गेले..
सौंदर्य मग्न नाती..!!\
उतरून सूर गेले..
गेले सरून धीर..
कालिज आत खोल ..
झाले उगा अधीर..!!
क्रोधात सौख्य नाही..
लोभास सख्य नाही..
प्रेमात मोह नाही..
सामर्थ्य द्रोह नाही..
होई अशी अवस्था ..
पसरे सभोवताली ..
आयुष्य प़रण -सुमने ..
निर्माल्य रूप झाली..!!
तरीही मनात वाहे..
विश्वास धर्मरूपी..
उसले अजुन सारा ..
अभिमान आत्मरूपी..
वाटे समस्त मजला ..
तो देव पाहताहे..
श्वासात सर्व माझ्या.
त्याचा निवास आहे..
रक्षील तो जयासी ;
कसली त्यास चिंता..
हा देह सर्व त्याचा..
त्याचेच पायी माथा..!!
..............................हर्षल देशपांडे ...३/०९/२०१०
आयुष्य तेच आहे...

अंधार सावल्यांच्या..
अजुनी तरी मनाला ..
उद्वेग तोच आहे..!!
सारे नव्या-जुन्यांचे ..
उरलेत बोध हाती..
स्वप्नातल्या जगाचा..
चालूच शोध आहे.....!
आशा स्वतंत्र होत्या..
होते स्वतंत्र भान..
हृदयात नित्य होते ..
विजयी प्रताप गान
आले कुठुनसे ते ..
उसवून अंतराला ..
दुर्भाग्य ते विषारी..
आले असे फळ!ला !!
हे घोर संचिताचे..
आवेग आत्मघाती..
जालून सर्व गेले..
सौंदर्य मग्न नाती..!!\
उतरून सूर गेले..
गेले सरून धीर..
कालिज आत खोल ..
झाले उगा अधीर..!!
क्रोधात सौख्य नाही..
लोभास सख्य नाही..
प्रेमात मोह नाही..
सामर्थ्य द्रोह नाही..
होई अशी अवस्था ..
पसरे सभोवताली ..
आयुष्य प़रण -सुमने ..
निर्माल्य रूप झाली..!!
तरीही मनात वाहे..
विश्वास धर्मरूपी..
उसले अजुन सारा ..
अभिमान आत्मरूपी..
वाटे समस्त मजला ..
तो देव पाहताहे..
श्वासात सर्व माझ्या.
त्याचा निवास आहे..
रक्षील तो जयासी ;
कसली त्यास चिंता..
हा देह सर्व त्याचा..
त्याचेच पायी माथा..!!
..............................हर्षल देशपांडे ...३/०९/२०१०
No comments:
Post a Comment