Friday, November 5, 2010

************ शौर्य **********




  
वाचता संदेश यवनांचा विखारी 
वीर ते मेवाडचे उठले करारी ;
केसरी रजपूत पाणीदार सारे .. 
परतंत्र राजस्थानवासी सिंह  सारे..!! 
वक्र त्या ताठून उठल्या ;
उग्र भिवयां.....
गेल्या फुलारून थरथरा 
त्या मर्द धमन्या ..
दंड पोलादी शीगां सम तप्त झाले..
 मस्तकांतून उग्र मग थैमान चाले.. 

 क्रोध रक्ताहून सरसर फिरत पसरे 
आवेग शौर्याचा मुखांतून तीव्र उसळे 
हर हर शिवाचा नाद गर्जे शत्-मुखांनी
शब्द ते घुमले कितीदा दश दिशांनी ...!!

.... घेतले शूरान्नी श्वास;
             भरारत  ऊर;
संताप चढ़े रक्तात;
            उठे काहूर!!!
  ताणल्या  गर्दना अभीमानी अश्वांच्या!!
रिकिबीत रोवूनी ; पाय जाहले स्वार्!!
त्या समोर फूटता; ईशारतींच्या तोफा!
वीज फुटावी;;तसा उसळला ताफा!!!!


ते उधालेले वणवे राजस्थानी!!
सरदार तयांचा "प्रताप " तो अभीमानी..!!!
प्रेरणा  एक ;ती आग एक अंगात !!
ते जळते तारे ;कोसळते  मेघांत !!!


सरसरा तापती;चक-चकती ती कवचे!!! !
ण खणती  भाले :शमशेरी अन् बर्चे!!
ते जाळत गेले ;ऊजाड रेगिस्थाने !!
गद-गदा हालवित ; ऊंच कोरडी राने!!


अंधार फाडूनी;सूर्य;;शेकडो जळले !!
संतप्त शिवाचे ,बाण सणाणत  सुटले!!!!!
 ते, जणू पसरले अंगारे फूललेले!!!;
वा; वाघ भयंकर रानातुन सुट्लेले!!!!!
ते उठ्वीत गेले मेलेल्या हृदयान्ना !!
अन् स्व-ताच शोधत मृत्युच्या दूतान्ना!!


........लेखन ......हर्षल

No comments:

Post a Comment