Thursday, November 4, 2010

sadhya..............

.......सध्या.......!!
आजकाल सायंकाळी उदास उदास शब्द गात...
विनाकारण काळजामधे खोल आत रूतत जात...
मनावरती दाटून येत ..संथपणे सरत आहेत..!!
एकेक क्षण गोठून टाकत..नवे वार करत आहेत..!!


पिन्जार्लेल्या नशीबासाठी..वादळलेल्या दुखासाठी..!!
नवी पहाट अजुन्सुद्धा मेहरबान होत नाही...
आकान्शेचे दोन किरण दान तीही देत नाही...!!


दिवसभर तेच सल्..मनामधे करून खल..१
जेंव्हा ह्रदय भरून येते..डोळया मधून झरून जाते...
तेंव्हा सुद्धा शांत झोप रात्रभर लागत नाही..!
रात्र सुद्धा बेईमान ..अन्गामधे भीनत नाही..!!


पुर्वीसारखे आज नाही...चैतन्याचे भान नाही..
मनामधे आज तरी सौजन्याचे स्थान नाही!!
आजकल श्वासामधून निर्जीव वायु आत येतो...
सजीव शरीर नीर्जीव्पणे...जगवण्याचा त्रास होतो!!!
-------------------------------------हर्शल२०/०४/2009

No comments:

Post a Comment