सरूनी कीतीएक ओसाड गेले ;उन्हांचे उसासे नभांच्यातूनी!!
कीती ते उन्हाले ;कीती पाव्साले;कीती यौवनाचे गुलाबी हीवाले!!
तुझ्यावाचूनी रीक्त जगलो कसा मी;उरी राहीली उग्र ती वादले!!
तुझे नेत्र ;चंद्रार्क ते वाह्नारे;तुझे हास्य माधुर्य मोती पीसारे !!
तुझी पाउले चंदनान्च्या खुणान्ची; तुझे स्पर्श ते तीव्र रोमांच सारे!!
तुझ्या गोड रूपांतली दीव्यता ती;तुझ्या स्तब्ध प्रेमातली सौम्यता!!
अजुनी प्रतीदीन स्मृतीत आहे;तुझ्या आसवांतील वैफल्यता!!
अजुनी तसा मी शहाणाच आहे;उरीचे उसासे उरी ठेवतो!!
मनान्तून ओसंडत्या आसवांना; सवे घेउनी हासूनी चालतो!!
कसे वेड जाईल काही कले ना ;तुझी ओढ़ काळीज खेचून घेते!!
तुझ्या आणी माझ्या दूभंगून गेल्या;पथाच्या वरी रोज घोटाळते !!
............................हर्षल.........
No comments:
Post a Comment