अजुन रात्रींचे पडदे अदृश्य चित्रांचे भास् ;चमत्कारिक कलाकृती ;निर्माण करताहेत...!!
सत्य अजुन धुक्यातच आहे ...
संध्याकाळ आज सुद्धा ;अस्वस्थ करते...
अजब आहे सारे ...नाही का?..
दूर वाटांवर अजुन चाहुल लागते कुठेतरी...
आजुबाजुचे लोक मला सांगतात..."भास् आहे रे हां.".
"अंधार पडला की असे भास् होतात..."..अरे शुद्धीत असलेल्या माणसाला सुद्धा भ्रम होतो रे..मग तू तर काय ...."
आणि ते शांत होतात ...त्यांचे अर्धवट वाक्य "मग तू तर काय ...वेडाच!!.."..मी मनातल्या मनात पूर्ण करतो..!!
जग मस्त आहे .नाही .!!..निरुत्तर प्रश्नाची हकालपट्टी करायला एकदम तैयार...always ..ready !! ..
शंकराचार्य म्हणतात "सारे जगच मिथ्या आहे.."...आणि जग म्हणते;.."जे दिसते ;आम्हाला तेच खरे "..'यातला
"आम्हाला" हां शब्द महत्वाचा आहे ;याचे भान नसते त्यांना,,,!!..जाऊ दे..माझ्यासारख्या मूर्खाचे अकलेचे बोल का मानाल तुम्ही..??...तुम्ही पण त्यातलेच ना...!!..म्हणजे .शहाणे !!
मी रागावून बोलत नाहिये .!!राग ;द्वेष;मत्सर; वासना ;स्वार्थ;मत्सर ...[खोटे वाटेल तुम्हाला ]..पण माझ्यात नाहिये..!!
हेच कारण असेल की ;लोक मला "वेडा"म्हणतात ....असे जर असेल तर भाग्यवान आहे मी..
...फार मोठ्या लोंकांच्या यादीत बसेन मी...
संतांच्या ;प्रेशीतान्च्या ;महंतान्च्या...
सांसारिक लोकांच्या [अल्प]बुद्धी प्रमाणे ..हे सारे अत्यंत वेडे होतेच .
तुकारामांना संसार नाही जमला...रामदासान्ना तर तो नव्ताच..
एक्नाथान्पासून ..गोरा कुम्भारापर्यंत ...सारे अगदी कट्टर ..स्वार्थ वीरहीत..आसक्ती विरहीत..!!
...लोक त्यांचे "लाजे खातर "उत्सव" करतील...प्रपंचात मीठभर परमार्थ म्हणून...!!
पण स्वत मात्र काडीमात्र बदलायचे नाहीत...
मी सांगीतले ना ;ज्यांना आपण खरच मानतो...त्यांचे आपण ऐकतो..जीव लावून...!!....लोक त्यांना पुस्तकातून पाहतात...समाज म्हणतो म्हणून नमस्कार करतात..पण त्यांना "सत्य"म्हणून स्वीकारू शकत नाहीत...!!...[इतके सोपे नाही ते...आस लागते ;नशीब लागते त्याला..असो]
लोकांची खरी दैवते भलतीच असतात.!...त्यांची..त्या देवतांची मंदीरे नसतात ..टोलेजंग..!!
नसतात उपास तापास !! ....काडीमात्र बंधने नसतात...त्यांना !
पण ही दैवते भयंकर ..सर्वत्र ..अंतर्बाह्य पसरलेली असतात...[सर्व व्यापी...अगदी शब्दश:]
अहोरात्र त्यांचीच पूजा होत असते...लोक्मान्सातून...!!
ह्या अहर्निश भक्तीच्या उन्मत्त शक्तीने..ही देवतांची फौज नवीन नवीन
वरदानान्ची खैरात करत असते...!!..आपल्या अबोध भक्तांवर..!!..
अक्खे जग त्यांचे भक्त..सारी माणसे त्यांची अनुरक्त ..!!
...".ह्या " देवतांना शरण न जाणारेसुद्धा ....असतात !!..पण ..अगदी ..म्हणजे अगदीच थोड़े..एखाद दुसरा . कोट्यवधीन्मधे..!!
ते जाणतात ..ह्या देवांचे थोटेपण..खोटे पण ......"ते" नकार देतात ह्या देवांना "खरे"देव म्हणायला ....
."ते" नाव देतात या देवांना "षड-वीकारांचे ".!!.......आणि सांगतात सम्पूर्ण जगाला ...."त्यांच्या" असत्याचे "भीषण "सत्य ...आणि ब्रह्म सत्याचे वास्तव...!!
...अगदी कंठ शोष करून..!!....
.जगातले काही जागतात सुद्धा या शब्दानी...
..पण अखेरीस काय ...निष्पन्न ??.....
मी सुरुवातीलाच म्हंटले ना..!!
"ही वीकारांची दैवते फार फार भयंकर असतात.."......
त्यांचे गुलाम भक्त त्यांना सोडणार नाहीत अशी कड़क सोय करतातच ते...!!
आणि मग??....मग काय ..."संतांची ; दार्शनीकान्ची..; धिंड निघते .."प्रथम लोकांच्या मनातून ;नंतर समाजातून..!!"
.....अर्थात ...समाजाला समजत नाही .....सत्याची आवश्यकता "त्यांना"आहे..संतांना नव्हे..!!...!!
-------------------------------------------------------हर्षल १\१\११.......