"सत्य "ही अत्यंत चमत्कारिक आणि तितकीच प्रभावशाली वस्तु आहे... !!
म्हणुनच "सत्य" हे अत्यंत सावध विवेकाने प्रसारित करायला हवे...!!
असत्य म्हणजे दुसरे तीसरे काही नसून ........स्थान-भ्रष्ट झालेले सत्य होय..!!
अर्थात ;असत्याला सत्याशिवाय अस्तित्व कधीच नसते....!!
[एक सोपे उदाहरण ::--खालील विधाने वाचा
"माणसाला दोन पाय असतात .....१]
"घोड्याला चार पाय असतात....२]
वरील दोन्ही विधाने "सत्य"आहेत...
आता सत्याला स्थान -भ्रष्ट करुयात ...............खालील वीधाने वाचा ;
"माणसाला चार पाय असतात ........१]
"घोड्याला दोन पाय असतात.......२]
]............ही असत्य वीधाने ठरतात .....परन्तु हां बदल नक्की कसा झाला?? ....तर केवळ सत्याचे स्थान बदलल्याने ..बस्स!
असत्य हे असेच निर्माण होते...सत्य जागा बदलते तेंव्हा...!! ..सर्वत्र!!
.........................................................हर्षल देशपांडे ...१२ज ११
No comments:
Post a Comment