![]() |
काय हरवले कळत नाही..
काय निसटले दिसत नाही...
पावलान्खाल्ची वाट कधी हरवून गेली सुचत नाही/...
ओळखीचेच जुने चेहरे ,अवचित नवे नवे दिसती..
परिचितांचे जुनेच थवे,नवीन रूपे घेऊन हसती...
प्रेम ते जुनेच तरी ..जुना त्यात रंग नाही..
किती झरती अश्रू तरीही ...पूर्वीचा तो संग नाही..
सायंकाळी पूर्वीसुद्धा नियमानुसार येतच होत्या..
काळीज कापत अनाम हुरहूर रोज आत भरत होत्या..
आज सुद्धा सांज येते ..दिवस सरला सांगून जाते..
पण याशिवाय वेगळे काही पूर्वीसारखे बोलत नाही ...
एकसुद्धा विश्रांतीचा कुठे विसावा देत नाही..
स्वप्ने पूर्वी रात्रभर नवे काही सांगत होती..
पहाटेच्या थंड वेळी डोळ्यांवरून स्मरत होती..
दिवस तेंव्हा स्वप्नासारखे हसत नाचत सरत होते..
रोज रात्री नकळत नवीन स्वप्न देऊन सरत होते..
आज निद्रा खूप येते ..स्वप्ने मात्र येत नाहीत..
काळोखाचा भार सारा..कवडसाही शिरत नाही..
मनामधले सल सारे ..दिवसभर छळून जातात..
रात्र होते अंधाराची ...स्वप्ने त्यात जळून जातात ...
आधाराचे जुने हात आज पुन्हा शोधतो आहे...
उधाणलेल्या गलबताला किनारयाशी ओढतो आहे.
किनारा जुना फार दूर ..एक दिवस नक्की दिसेल...
जुने सारे भान पुन्हा मनामध्ये नक्की वसेल............!!
.................................................................................हर्षल@@.........२७अ ११
No comments:
Post a Comment