Monday, May 30, 2011

तो

तो : कितीतरी वेळ असाच जात राहतोय ...सगळे समोर असून काहीच नसल्याचा भास ..तोही वाढतोय..!!
      
आजवर अशी वेळ का नाही आली..??....तू समोर आहेस आणि मी स्पष्ट बोलतोय...मन मोकळे,...अशी वेळ !!
      
आज मुद्दाम इथे आलोय ...त्या जुन्या गेट जवळ ....मागे एका जुनाट शाळेची मोठी पडकी इमारत ...आजूबाजूला शांत रस्ते....तुला लक्षात असेल ....अनेक वर्षे झाली त्याला .....अन जागा हीच...गम्मत आहे नाही!!...जागा संदर्भ कशा बदलतात...कळत नाही...!!....त्या वेळी आपण बोलत नसू ......पण एकत्र होतो.....दोघानाही काय कळत होते देव जाणे...पण एकत्र होतो...आज बोलणेही नाही आणि ..एकत्रही नाही.....सगळाच आनंद आहे..!!..असो..
 .........तू ऐकत असशील माझे स्वगत तर ...समजून घेऊ शकतेस ....तुझ्यासाठी मी थांबलोय अजून .....अन तुझ्याकडून उत्तर नाहीये काहीच.........अस ऐकलय एकाकडून कि फार बिझी असतेस आजकाल.....!!...आठवणी  कुरवाळायला वेळ नसेल...तुला...आणि आपल्या फारशा आठवणी आहेत कुठे ??...नाही म्हणायला एखाद दोन ....!!पण त्या तरी "तुला" लक्षात आहेत कि नाही मला माहित नाही...!!मला वाटलं जशा माझ्या भावना आहेत तशा तुझ्याही असतील.....भ्रमात होतो बहुदा..!!...आपोआप कळेल तुला अस वाटायचं !!.....पण वर्षांचे आणि वयांचे नुसतेच मोजमाप वाढत गेले......आपल्यातले अंतर वाढवत...अधिकाधिक !!.............आता ही अंतरे मिटतील असे आशावाद मला झेपत नाहीत....!!..तुझ्या जगाचे रुपांतर सुंदर उमललेल्या फुलांत झाले असेल ...[आणि तसेच व्हावे असे मलाही वाटते]....आयुष्याला सुंदर परिमाणे  मिळाली असतील ...तू सुखी असशील ...!!..कदाचित माझे नावसुद्धा तुझ्या या सुंदर आयुष्याला शोभणार नाही...एखादे दुसरेच नाव ..कुणाचे तरी  मिळाले असेल त्याला !!........फक्त एकच इच्छा आहे......
चुकून माकून कधी भेटलीसच  ...भविष्यात वाटेवर ...तर ..थोडीशी तरी ओळख दाखव..!!..बस..तेवढे प्रेम तरी नक्कीच केले मी तुझ्यावर........!!

........हर्षल .....[लेख...ती आणि तो..काल्पनिक]

No comments:

Post a Comment