Sunday, June 5, 2011

अधांतर ...!!

अश्रूंत रोजचा भिजतो ..
एकेक  दाह अंगाचा ..
ओसंडूनी वाहत जातो..
उद्वेग उग्र विजनाचा ...!!

सरताना सरुनी गेले..
आवेग मग्न विषयांचे..
पाठीस राहिला आता..
अस्वस्थ घोर शापांचा ....!!

जगताना कळले नाही 
सामर्थ्य शुद्ध सत्याचे 
उरला असत्य सारा 
हृदयात द्रोह सत्याचा !!