Wednesday, August 31, 2011

...परमेश्वर >>>>!!

परमेश्वराचे नाद ..मला ऐकायचे होते..
पहायचे होते..त्याचे सम्पूर्ण निर्विकार सौंदर्य..
त्याची कृपा..त्याचे प्रेम..ईश्वराच्या सर्व साक्षीत्वाचा..अनुपमेय आल्हाद..!!


म्हणून देवाला मी शोधले ..दहा दीशान्तून ..
देशा -देशांतून ...मनांतून ...तनान्तून ...!!
ओसाड रानान्तून ;निष्प्राण प्रेतान्तून ...
जमिनीच्या पोटा -तून ..आकाशाच्या ओठांतून ...
आणी हो ..मूर्ती तून ...देवालयानतून ..!!
स्मशानान्च्या राखेतून ... ..द्रोहातून ..
प्रेमातून ..क्रोधातून ..!!
.सर्वत्र पसरलेया तमातून...
अतिवोन्नत तेजांतून ...!!
पण सापडले फ़क्त त्याचे अस्पर्श आलेख ...
संभ्रमांचे पाश ..तेहि सुरेख ..!!


बुद्धीने .सांगितले अंतिमत: .".देव असेलही वा नसेलही "..
सरळ आहे ती हरली होती ...!!
तर्क -भाव -विचार-विकार सारे वापरून थकली होती..
देव सापडला नाही ...तिला ...!!
.


माझ्या निराश शून्य देहाला ..
.तेंव्हाच अलगद काही कळले ...
..उजेड़ाचे असीम काहूर ..
मनामधे तेंव्हाच उठले ..


जुने सारे गर्व माझे एक क्षणात सरून गेले ...
विभ्रमांचे पाश तुटता ..आत्म रंग दीसून आले ..!!


सहस्त्र मायापंखांखाली ...विकारांच्या  चक्रां -खाली ..
देव स्वये उभा आहे...!!
कळले मला माझ्यामधेच ईश्वराची प्रभा आहे..! .........written by -HARSHAL *

Saturday, August 13, 2011

तो...भाग ३

   संध्या काळ शांत पणे सरत होती...........एकेक किरण एकेक  रंग विरत होते..काळ्याशार आकाशामध्ये..!..  तो मात्र तसाच ...सुन्नपणे उभा होता लांबवर पाहत ....नदीच्या चमचमत्या ;आणि मधेच अलगद उसळणार्या जल पात्राकडे निरखून पाहत ..किती वेळ झालाय ..नदीच्या पात्राचा रंग मघाशी उजळ ;निळा होता ....आत्ता तो
     . धुरकट राखाडी होत चाललाय ....सावकाश !! पण नजर हटत नाही..आपण ही नदी इतकी मनापासून का पाहतोय ..ह्याचे उत्तर सुद्धा नाहीये त्याच्याजवळ......ती संथ नदी ..तसेच आपण...तसेच रंग बदलणारे ,,पण
      रंग नदीने बदलले कि आकाशाने ..???..नदी तशीच आहे..पण  पाहणार्याला वाटावे कि तिनेच रंग बदलले ..
 ..आपणही तसेच आहोत ....फक्त परिस्थितीने रंग बदलले...आणि बाजूच्यांना वाटले कि ह्यानेच रंग
  पालटले..........असो........!!..कदाचित म्हणून ही नदी जवळची वाटते ....तीही आपल्या सारखीच  ...!!

एक सहज कविता आठवून गेली.........आपणच लिहिली होती नाही....??..हो ..असे विचार येतायत ..तोवर त्याला त्या ओळी दिसल्या देखील मनासमोर...अगदी नदीसारख्या स्वच्छ ...


"" तुझे स्वप्न नेत्रांत पाहून जगलो..
तुझे नाम श्वासांत राखून जगलो..!!
तुझे ध्यान आहे अजुनी मनाला..!!
तुझ्यावीण आयुष्य वाहून थकलो..!!,""


....................त्याला आठवले ...आणि परत तो शांत पणे समोरच्या जल पात्रासारखा वाहत गेला......मनातल्या मनातच...पण फार खोल आणि लांबवर....संध्याकाळ सरून गेली होती ..आणि दाट ;घट्ट रात्रीचा शेला विणला जात होता ..सावकाश ..त्याच्याभोवती ...मनाभोवती..!!


...............तो आणि ती ...भाग ३ .....[काल्पनिक ]...लेखन -हर्षल