Saturday, August 13, 2011

तो...भाग ३

   संध्या काळ शांत पणे सरत होती...........एकेक किरण एकेक  रंग विरत होते..काळ्याशार आकाशामध्ये..!..  तो मात्र तसाच ...सुन्नपणे उभा होता लांबवर पाहत ....नदीच्या चमचमत्या ;आणि मधेच अलगद उसळणार्या जल पात्राकडे निरखून पाहत ..किती वेळ झालाय ..नदीच्या पात्राचा रंग मघाशी उजळ ;निळा होता ....आत्ता तो
     . धुरकट राखाडी होत चाललाय ....सावकाश !! पण नजर हटत नाही..आपण ही नदी इतकी मनापासून का पाहतोय ..ह्याचे उत्तर सुद्धा नाहीये त्याच्याजवळ......ती संथ नदी ..तसेच आपण...तसेच रंग बदलणारे ,,पण
      रंग नदीने बदलले कि आकाशाने ..???..नदी तशीच आहे..पण  पाहणार्याला वाटावे कि तिनेच रंग बदलले ..
 ..आपणही तसेच आहोत ....फक्त परिस्थितीने रंग बदलले...आणि बाजूच्यांना वाटले कि ह्यानेच रंग
  पालटले..........असो........!!..कदाचित म्हणून ही नदी जवळची वाटते ....तीही आपल्या सारखीच  ...!!

एक सहज कविता आठवून गेली.........आपणच लिहिली होती नाही....??..हो ..असे विचार येतायत ..तोवर त्याला त्या ओळी दिसल्या देखील मनासमोर...अगदी नदीसारख्या स्वच्छ ...


"" तुझे स्वप्न नेत्रांत पाहून जगलो..
तुझे नाम श्वासांत राखून जगलो..!!
तुझे ध्यान आहे अजुनी मनाला..!!
तुझ्यावीण आयुष्य वाहून थकलो..!!,""


....................त्याला आठवले ...आणि परत तो शांत पणे समोरच्या जल पात्रासारखा वाहत गेला......मनातल्या मनातच...पण फार खोल आणि लांबवर....संध्याकाळ सरून गेली होती ..आणि दाट ;घट्ट रात्रीचा शेला विणला जात होता ..सावकाश ..त्याच्याभोवती ...मनाभोवती..!!


...............तो आणि ती ...भाग ३ .....[काल्पनिक ]...लेखन -हर्षल























No comments:

Post a Comment