कफ ;पित्त आणि वात हे त्रिदोष मानवी शरीरात आहेत...असे वैद्य लोक सांगत असतात ..पैकी पित्त आणि वात नक्की कसे आहेत ते मला ठाऊक नाही..म्हणजे मला जसे ते होतात तसेच आयुर्वेदात त्यांचे उल्लेख आहेत का ;हे मला माहित नाही...तेंडूलकर उगाच आउट झाला..किंवा सुंदर मुलींनी आमच्याकडे बघून न बघितल्यासारखे केले किंवा शेजारच्या काकू नको तेंव्हा घरी येऊन आमचे प्रताप आईला सांगू लागल्या ..अशा काही घटनांनंतर जे उसळते त्याला मी "पित्त"उसळले असे म्हणत असतो...
बाकी वात तर मला बर्याचदा येत असतो..पण तो रोग म्हणून असतो का हे मला माहित नाही..पकावूचंद मास्तर रटाळ पणे शिकवू लागल्यावर;अत्यंत माठ माणसाने मला अक्कल शिकवायला सुरुवात केल्यावर ;विनाकारण लाईट गेल्यामुळे फेसबुक वर बसता न आल्याने...मला जे काही होते त्याला मी "वात" आला जाम ..असे साध्या भाषेत म्हणतो....
अर्थात ह्या तीन दोषांपैकी पित्त आणि वात माझ्या प्रत्यक्ष भानगडीत फारसे पडत नाहीत ....पण जो उरलेला तिसरा आहे...तो मात्र माझा १ नम्बरचा शत्रू आहे..हलकट रोगांचा राजा..कफ !!
मला खरोखरच भयानक सर्दी होते..म्हणजे लोकांना सर्दी झाली आणि गेली हे कळत पण नसेल..किंवा असेलच तर थोडा काळ ..पण माझी केस विचित्र आहे लोकहो..!!..मला सर्दी एखाद्या मदोन्मत्त तरुणीसारखी येऊन बिलगते..माझे लाड करते..आपल्या प्रियकरावर जीव ओवाळून टाकणार्या प्रीयांगनेसारखे
माझ्यावर तुफान प्रेम करते ..शेवटी मी बेजार झालो ..कि तिला मजा येते..आणि प्रेमाचे नवीन नवीन फोर्मुले ती माझ्यावर वापरते...!!..
मला सर्दी कधीच एकदम होत नाही..आणि म्हणूनच ती एकदम जात सुद्धा नाही..सर्दी हा अत्यंत नालायक रोग आहे..आणि जगातील कुठल्याही रोगापेक्षा तो माणसाला बेदम करू शकतो..याबद्दल मला तीळमात्र शंका नाही..याचे कारण म्हणजे..निदान माझ्या बाबतीत तरी सर्दी जे जे उद्योग करून ठेवते ते अगम्य असतात....मुळात सर्दी कडे काही पोझीटीव मुद्दे असतात..म्हणजे कोणालाच सर्दीची भीती वाटत नाही..त्यामुळे आपण कोणाला सांगितले कि "अरे .फार सर्दी झालीये रे.जरा मदत करशील का"..तर ती व्यक्ती आपल्याकडे तुच्छतापूर्वक पाहते..""काय रे ;पोरीन्सारखा.सर्दी सर्दी काय करतोयस?..देऊ का दोन लगावून?..म्हणजे उतरेल चांगली..बेअक्कल कुठचा!!..काम करायला नको डुकराला !!..म्हणून सगळी नाटक सुचतायेत..!!अरे मला गोवर होता गोवर ..आहेस कुठे!!..तरी पाणी भरत होतो..ऑफिस ला जात होतो..असली नाटके नाही केलीत कधी..मेंगळट कुठचा..चल काम कर नाटक्या .."""!असे प्रेमळ उद्गार ऐकू येतात...डॉक्टरांपासून दुकानदारांपर्यंत ..मास्तरांपासून आई-वडिलांपर्यंत सगळ्यांना सर्दी म्हणजे "मामुली", वाटत असते ..हेच माझ्या दुखाचे मूळ आहे लोकहो..आणि म्हणूनच मला जी सर्दी होते तिलाही हे माहित असल्याने ती मला भंडावून सोडते..आणि मी तिला गुप चूप शरण जातो....
आता सरावाने मला सर्दीची लक्षणे चांगलीच माहित झालीयेत..म्हणजे ८० टक्के तरी...पण ही लक्षणे निष्णात डॉक्टर ला सुद्धा कळणार नाहीत ..आता माझा सर्दिशी जुनाच प्रेमळ संबंध असल्याने मला तिची सगळी कला कौशल्ये माहित आहेत..सर्दी मला तरी एकदम होत नाही...फैशन शो मध्ये अलगद अलगद अंग वेडावीत चालणार्या सुकडबम्बू [त्यांना लोक का सुंदर म्हणतात हे आपल्याला कळलेले नाहीये बुवा अजून!]मोडेल बायांसार्खी ती हळू हळू माझ्या जवळ येते....एक आठवडाभर नुसतेच अस्वस्थ वाटले..नाक विनाकारण पकडावेसे वाटले कि मला कळते "बाईसाहेब "निघ्ल्यात ..आता पुढच्या आठवड्यात गाठणार आपल्याला !!...कोणालाच कळत नाही कि हा काहींही झाले नसताना विकस ;निलगिरी वगैरे फालतू गोष्टी का शोधतोय?..पण अज्ञ जनांना तसेच भ्रमात ठेऊन मी मोर्चा बंदी करून ठेवत असतो..शत्रू येण्या अगोदरच मी मोर्चे लावतो..निलगिरीचे रुमाल ;कफाची औशधे ..नीर निराळ्या गोळ्या .;धने जिरे यांच्या पुड्या ;आले लिंबू इत्यादी महत्वाच्या वस्तू ..हे सगळे जमवून मी निधड्या छातीने आणि वीर पुरुषाच्या आविर्भावात ..[उदासवाणा] असा उभा राहतो..तिची वाट पाहत!!..
No comments:
Post a Comment