प्रसंग ४:- उग्र मतभेद!!
स्थळ :पुणे शहरामधील एक वाचनालय :-२००५ चा जुलै महिना वेळ :- सकाळी सुमारे ११ची !
{ **एक देशस्थ [श्री.अत्रे] आणि एक कोकणस्थ [श्री.गाडगीळ] दोन मित्र(?) एकमेकांना भेटलेत ..}
"काय म्हणतोस अत्रे बर्याच दिव्सांने भेटलास?.कधी घरातून बाहेर पडत जा ;वाचनालयाला ईतकी फी भरतोस आणि पुस्तके बदलायला अगदी क्वचितच येतोस!!..थोडा हिशेब तरी ठेव..हेहेहे "
"ओहो गाडगीळ !!कसा आहेस ?..कसले हिशेब ?..चायला मी हिशेब करावे ;फी वसूल करावी
म्हणून लायब्ररी नाही वापरत...चांगली पुस्तके वाचण्याचा छंद आहे म्हणून लावतो ;तुमच्यासारखे वसुली बाज लोक नाहीयोत आम्ही !!साला ..सगळीकडे फक्त फायदा आणि वसुली काय रे बघता ?मन शुद्ध कर आधी ;आणि कसली फडतूस पुस्तके वाचतोस गाडगीळ तू !!..आणि ह्याला वाचन म्हणतोस;वसुली म्हणतोस ??..टीनपाट खोपडीच्या!!""
"साहित्याची आवड म्हणतात त्याला ;देशस्थांच्या डोक्याबाहेरची गोष्ट आहे ती !!..आणि टीनपाट कोणाला म्हणतोस रे अक्करमाशा ?..चित्पावन म्हणजे काय तुमच्यासारखे मट्ठ नाहीयेत !..उच्च विचार आणी समर्पक व्यवहारी आचार म्हणजे चित्पावन ;म्हणजे आम्ही!! ;कळले का रे काळपट माणसा ??"
"चायला ..उच्च विचार ??साहित्याची आवड ?? ते पण तुमच्याकडे ?अरे, पांढरट पोपटनाक्या;साहित्य म्हणजे काय ते माहितीये तरी का,चीचुन्द्र्या ?? घार्या डोळ्यांवर चष्मा लावून आणि सडपातळ अंगात झब्बा घालून चीचुन्द्रीसार्ख्या आवाजात गाण्याचे प्रोग्राम केले कि लगेच स्वतःला साहित्यिक म्हणवता तुम्ही ??..थापा पुण्याबाहेरच्या लोकांना मार रे !! तुमच्या सगळ्या आवडी माहितीयेत मला ;समर्पक आचार म्हणे !! काहीही म्हण गाडगीळा ;कोकणस्थ चित्पावन म्हणजे फुल भंकस पब्लिक रे तुम्ही "
"अहो मिस्टर व्यवस्थित म्हणजे भंकस पब्लिक काय;.आणि गाणे म्हणायला बारीक आणि गोडच आवाज लागतो ;आहे तो आमच्या लोकांकडे ,तुमच्यासारखा भसाडा आणि चार मजले जमीनदोस्त करणारा आवाज नसतो आमचा..!!...पण जंगली रेड्यांना संगीतातले काय कळणार म्हणा!!..झोपा काढा झोपा, तुम्ही चार वेळ हादडून आणि दुसर्याच्या कर्तृत्वाला नावे ठेवा ..मद्दड मेंदूच्या माणसा एक तरी गुण आहे का आमच्यासारखा तुमच्यात ??!!
?"
"गुण आहेत रे पण तुमच्यासारखे ते ओतू जाणारे अवगुण नाहीयेत; हावरट तुसडेपणा नाहीये;
गुण म्हणे गुण?..कसले गुण रे ?..चावटपणा,स्वार्थीपणा ;आगाउपणा;एकलकोंडेपणा;भांडखोरपणा;कवडीचुंबकपणा हे गुण ?? आणि ह्या स्वभावाचा केवढा ताठा;केवढा अभिमान तुम्हाला ?? ;अभिमान कसला गर्व म्हणूयात का ,गर्व ?..आता बोल ना ;मेणचट-पुतळ्या ??"
"अरे,डांबर-काळ्या ;काही गुण असले ना तरच ताठा येतो ;तुम्हा देशस्थांत काय गुण आहेत ते ठावूक आहे मला;आमचे गुण अवगुणच वाटणार रे तुम्हाला ;बत्थड माणसा !"
"अस का ?..अरे पांढरट रंगाच्या हिरवट माणसा आमच्या गुणांची साक्ष ईतिहास देईल...तुमचे नुसतेच अभिमान ;आणि आगाउपणे !!..काम काही नाही!!"
"अत्र्या ;आहोत आम्ही गोरे ;कारण आम्ही तेजस्वी आहोत;स्वाभिमानी आहोत !!तुमच्यासारखे करपलेले बेढब काळपट नाहीयोत;मेंगळट आणी सुस्त ;बीनमणक्याचे अजगर नाहीयोत रे फितूर माणसा !!..आणि ईतिहासाच्या गमजा कुणाला सांगतोस रे?..आम्ही घडवलाय तो ..वाच पुस्तके जरा !!"
"वाचलीयेत रे रेम्याडोक्या ;सगळी वाचलीयेत .आणि फितूर कुणाला म्हणतोस रे निलाजर्या ??.!!..म्हणे ईतिहास घडवला .दोन चार सुधारक आणि पेशवे सोडले तर आहे काय ईतिहासात तुमचे?"
"सगळ्या चळवळी आम्ही केल्यात अत्र्या!!..नाव घ्यायला गेलो तर तोंड अजून काळे ठिक्कर पडेल तुझे..!!"
"अरे कसल्या चळवळी रे गाडगीळ्या ?..चळवळी नाही वळवळी केल्यात नुसत्या सर्वत्र !!..म्हणे चळवळी केल्यात ..आधी साधे सरळ चाला ;कन्जूसांनो!!..मग वळवळ का चळवळ काय ते करा !!"
"कंजूस कोणाला म्हणतोस रे उधळ्या ?..धोरणी आहोत आम्ही !!धोरणी..!!बदाबदा अन्न करून फेकत नाही तुमच्यासारखे ..वाट्टेल तसे बेहिशेबी नसतो तुमच्यासारखे..!!मला सांगतोय वळवळ करा..!!अरे तुम्ही तेवढी तरी करून दाखवा ना!!..आळशी;सुस्ताड प्राणी कुठचे!!"
"अरे आम्ही केलीच ना तर डायरेक्ट क्रांती करतो;वळवळ ;चळवळ नाही ..!!आणि तुम्ही धोरणी ??
हिशेबी??..चार आणे काढताना आव लागल्यासारखे चेहरे करता तुम्ही; जेवतांना मोजून पोळ्या करणारे दीड अकली लोक तुम्ही !!;अरे आम्ही उदार आहोत दिलदार आहोत..उगाच फालतू हिशेबात आयुष्य नाही घालवत !!..आणि आमच्या शांत स्वभावाला सुस्त म्हणतोस गाडगीळ्या ?"
"तुम्ही शांत नाही ;मक्ख आहात मक्ख !!..आम्ही व्यवस्थित आहोत म्हणून सगळं मोजून मापून करतो..अत्र्या,तुमच्यासारख नाही बिनडोक वागणं आमचं..!!म्हणूनच तर ईतके तीक्ष्ण आणी विद्वान लोक जन्माला आले आमच्यात !!"
"तीक्ष्ण आणी विद्वान ??..कंजूस आणी मक्खीचूस म्हण त्यापेक्षा ..चार दोन अपवाद सोडले तर कोण आले रे महान लोक जन्माला तुमच्यात ?"
"सगळे समाज सुधारक ;स्वातंत्रवीर आणी प्रत्यक्ष पेशवे काय देशस्थ होते काय रे अत्र्या ??"
"अरे मी म्हणालो ना..नुसते वळवळ करा लेकांनो..भरीव काही काम नकोच तुम्हाला !!"
"अरे आम्ही समाज सेवा केलीये;समाजाला जागे केलेय !!तुम्ही काय दिवे लावलेत रे ?"
"ए गाडगीळ्या;म्हणे समाजाला जागे केलेय!!..आधी त्याला झोपवले तुम्हीच ना ?"
"अस्स?..पण निदान जागे तरी केले;तुम्ही काय दिवे लावले ब्राह्मण असून ते सांग !"
"अरे आम्ही असे दिवे लावलेत कि त्याचा प्रकाश उधार घेऊन अजून जगताय तुम्ही .."
"असे कोण महान लोक जन्माल घातले रे तुम्ही"
"सगळे संत बघ ;मक्खीचूस माणसा !!..एकजात देशस्थ होते !!..संत रे संत..!! वळवळे नाहीतर चळवळे नाहीत ..डायरेक्ट संतच !!..ही लेव्हल आहे आपली..डायरेक्ट संत.!!.आता बोल की कोकण्या ?? ""
"अरे हवेतच रहा तुम्ही ,हवेतच !!संत असतात चार आणि त्यांची नावे काढत स्वताची पाठ थोपटा घाट्यान्नो!"
"मग सुधारक आणि स्वातंत्र्यवीर काय लाखात मोजावे ईतके होते काय रे कोक्या ??"
"अरे माठ्या; आम्ही संस्कारी आहोत ;तुमच्यासारखे गबाळे आणी बेशिस्त नाही"
"कोणाचे संस्कार रे कोबरटा?..कसले संस्कार ?..सासू सासर्यांना बाहेरची पायरी दाखवण्याचे आणी जावयांना घरजावई करण्याचे ??;कि चीक्कुपणे आणी स्वार्थीपणे स्वताच्या पोळीवर तेवढे तूप ओतून घेण्याचे ??"
"ए वाह्यात माणसा,वाट्टेल ते आरोप नको करूस,आम्ही शिस्तबद्ध वागतो न तेच सलतंय तुम्हाला ..!!सगळ्या गोष्टीत घोळ घातले की मगच बरे वाटते ना तुम्हाला ;वाट्टेल तसे खायचे ;झोप काढायच्या ;मंदपणे जगायचे आणी फुकटचे सल्ले द्यायचे येवढेच करा तुम्ही !..सुधारणार नाही कधी तुम्ही देशस्थ माणसे !!"
"जे मनाने आधीच सुधारलेत त्यांना तुम्ही अजून काय सुधारणार रे ?..स्वताकडे बघा आधी !!"
"अच्छा!!..तुम्ही मनाने सुधारलेले??..अरे मनाने बोथट आहात बोथट!!कुशाग्र बुद्धी नाही तुमची !,शिका आमच्याकडून काहीतरी "
"तुमच्याकडून काय शिकणार ?.लुच्चेपणा??. तुम्हीच साधेपणा शिका आमच्याकडून !!"
"ईतकी वाईट वेळ अजून आली नाहीये चित्पावनांवर ;कि तुमच्याकडून शिकावे ..!!"
"मग देशस्थांची सुद्धा बुद्धी अजून ईतकी भ्रष्ट नाही झालीये कि तुमच्याकडून सल्ले घ्यावेत !!"
"एक मिनिट अत्रे ;आपण असेच भांडत राहिलो तर निकाल लागणार कसा ?"
"हो रे गाडगीळ ;थांब ,कोणाला तरी विचारुयात..तो बघ तिथे एक माणूस आहे मघासपासून ऐकतोय वाटत आपला वाद..त्यालाच विचारुयात .."
"चालेल ;मला तरी तो माणूस कोणी मोठा आणी विद्वान वाटतोय ;चल ,विचारू त्याला "
तेवढ्यात तो माणूस स्वतच जवळ येतो ..आणि दोघांनी काही विचारण्याआधीच म्हणतो ...
""तुमच्या दोघांत तोच जिंकलाय जो सगळ्यात जास्त मूर्ख आहे..!!आणि माझ्या मते तुम्ही दोघेही जिंकलेले आहात..अर्थात महामूर्ख देखील आहात !!;विनाकारण वितंडवाद करणारे संतही नसतात आणि सुधारकदेखील..आणि हो..असेच भांडत राहिलात तर दोघेही सुधारणार तर नाहीच पण अजूनच बीघडाल !..एकेमकांना समजून घेतलत तर शहाणे राहाल नाहीतर अज्ञानातच जगाल आणि तसेच मराल.!!
लक्षात ठेवा :-एकमेकांशी संवाद करून दोष समजून घेणे आणि ते सुधारणे हाच खरा सहकार !!..
आणि नुसतेच एकमेकांचे दोष दाखवणे आणि टीका करणे म्हणजे संपूर्ण अनाचार !!..
काय करायचं ते तुम्हीच ठरवा!!!...................
-----विशेष सूचना:---हा प्रसंग मी प्रत्यक्ष पाहिलेला असून केवळ काही शब्द;पात्रांची नावे आणि संवाद वगळता सुमारे ८० ते ८५% जसाच्या तसा लिहिलेला आहे..!!हे लिहिण्यामध्ये काही ठिकाणी अतिशयोक्ती असली तरी त्यातला काल्पनिक भाग अत्यल्प आहे..ब्राह्मण वर्णाने एकसंघ राहावे ह्या मताचा मी असल्याने ..सर्व ब्राह्मण मी समान दृष्टीने पाहतो...मला भेद समजतात पण मान्य होत नाहीत ;ते भेद मोडून ही ब्राह्मशक्ती एक व्हावी अशीच ईच्छा माझी सदैव असते व राहील सुद्धा !!...त्यामुळे अर्थातच हे संवाद लेखन कोणाही कोकणस्थ अथवा देशस्थ मनुष्यास दुखावण्यासाठी हे लिहिलेले नसून;उलट अशा निष्कारण कटुते पासून सार्यांनीच बोध घ्यावा व असे प्रकार घडू नयेत म्हणून हा लेखन प्रपंच आहे !!तरीही चुकून कुणास तसे वाटून वाईट वाटले असल्यास मी त्यांची क्षमा मागतो !!...
..................लेखन ------ ---- हर्षल !!