भाग १
[सेल्समन एखादा मुलगा नाहीतर माणूस असतो तेंव्हा ]
वेळ :दुपार [आणि म्हणून झोप काढण्याची किंवा टीव्ही बघण्याची ]
स्थळ :अमुचे घरकुल
बेल वाजते .....
मी:[दार उघडून ]..कोण आपण?
सेल्समन:- नमस्ते सर .
मी: आम्हाला काही नकोय..
तो: मराठी वाटत साहेब !!
मी: हो ..का हो ??
तो :नाही बोलण्यावरून कळलं..हे हे हे
मी:[संताप गिळून ]अस का ?..बर बर ..पण काही नकोय आम्हाला !!
तो :साहेब फक्त पाच मिंट ...पाचच मिंट ...
मी:अहो खरच काही नकोय..
तो:साहेब हे बघा ;कंपनीचा नवा माल..
मी:-मला माल बघायचा पण नाहीये[आता जरा राग येत चाललाय...]
तो:दाढी करता का साहेब?
मी:नाही ...माझी हजामत ऑफिसात रोज होतच असते..वेगळी अजून कशाला ..
तो:गम्मत छान करता हो.!!..हेहेहे ..बर हे रेझर बघा ;खास राठ आणि मुर्दाड चेह्र्यांसाठी बनवलाय..तुम्हाला तर मस्त शोभेल साहेब.
मी:.नकोय हो मला ..आणि मी मुर्दाड वाटतो तुम्हाला??...
तो:.नाही साहेब...तुमचा चेहरा साहेब..बघा कसली राठ दाढी वाढलीये..हो कि नाही??
मी:-तुम्हाला काय त्याच्याशी ?..मला नकोय ..निघा आता !!
तो:साहेब क्रीम घेता?..थंड वाटेल..
मी:नकोय हो..निघा प्लीज ..
तो :बर नाहीये का साहेब ?
मी:[मनात:चांगली कल्पना आहे ..कटवायची ]
हो..अहो भयंकर पाठ दुख्तीये..ताप आहे .
तो:..पोट सुटलाय न साहेब म्हणून..??
मी:म्हणजे?..
तो:.बसून बसून पोट सुटते ..मग वजन वाढते;पचन शक्ती कमी होते..मग काय छत्तीस रोग लागणारच..!!पण घाबरू नका साहेब ..आम्ही एक लोशन विकतो ,,आणलय मी..!!.सोलिड आहे !!
मी:-[चायला..!! कटकटच आहे साली ...कान्फाडून काढला पाहिजे ह्याला आणि वर ह्याचंच लोशन चोळून दिलं पाहिजे ..!! ]नको हो ..मला फक्त आराम पाहिजे ..औशध आणलय मी ..!!
तो:-साहेब एक मस्त प्लास्टिक ची हवा भरायची उशी आहे ..डोक्याखाली घेऊन झोपा..आधी हवा भरून मग हां...हेहेहे..दाखवू का..??..फक्त दीडशे रुपये..ग्यारेणटी..सकट....!!..आताच खाली जोशी काकांना विकली ..घेता का..??
मी:-[पिसाळून]..आण ..तुझे रेझर ..तुजे लोशन..क्रीम सगळं आण ..ती उशी ..अजून काय असेल तर सगळे आण ...चकली चिवडा असे काही असेल तर ते पण काढ ...
तो:- ते सगळे देतो..पण चकली चिवडा दिवाळीत विकतो मी...तेंव्हा नक्की आणेन..तुमच्यासारखे फार कमी भेटतात ...बोला ..सगळे देऊ न एकेक पीस ..हां हे घ्या ..एकूण १२०० रुपये झाले..तुमच्यासाठी ११५० फक्त..!!
असो...ह्या पुढचे लिहित नाही...तो रेझर ;ते लोशन ;ती उशी अजून घरात पडून आहे...ईतकच सांगतो...काय बोलायचे?..
No comments:
Post a Comment