"ती पोरगी पाहिलीस/?..काय माल आहे?"..अशा माझ्या मित्राच्या उद्गाराला मी फक्त "ती माल नाही, मुलगी आहे..तिला कळत नाहीये कसे कपडे घालावेत म्हणून शरीर उठून दिसतंय,..उगाच सुंदर दिसण्याच्या नादात आजकाल हे नवीन खूळ आलंय ..लहान कपडयांच!!.. स्त्रियांचे सौंदर्य सत्विकतेमध्ये आहे..हे त्यांना समजले कि अशा चुका होत नाहीत..जाऊ देत..चालायचंच ! "..असे प्रत्त्युत्तर दिले..आणि त्याने सुरुवात केली"..बास..चुकलो महाशय ;तुम्हाला बोललो हीच चूक !..तू रामायण काळात जन्मायला हवा होतास..ते ऋषी मुनी जायचे ना अरण्यात ?..तसा.."......हा डोंबिवली स्थानकावरचा सत्य प्रसंग आणि संभाषण मनात ठेवून मी लोकल पकडली ..मित्राचा निरोप घेतला..दुपारची वेळ असल्याने गर्दी कमीच ..म्हणून शांतपणे माझा मोबाईल घेऊन हेडफोन वर माझे काही निवडक संगीत ऐकत बसलो..खिडकीतून उष्ण वारा वाहत होता अंगावर..आणि कानात समर्थांचे सुंदर शब्द..एकेक शब्द भक्तीने आणि ज्ञानाने सिद्ध झालेला..."मनाची शते ऐकता दोष जाती...
हे श्लोक मनाचे!.आत्म्याचे !!ते मी कित्येक वेळा ऐकले असतील..पण प्रत्येक वेळी एक नवे साधन मला देतात..आपण अद्याप काय शिकलो आणि किती कमी ज्ञान घेतले असा विचार देतात..अतीव स्खलनशील माणसाला सुद्धा सहज विरक्तीचा अनुभव देण्याचे सामर्थ्य समर्थांच्या वाड्मयात आहे..धर्म हृदयात जागृत करण्याचे .असंबद्ध मनाला संशयहीन करून भक्ती-परायण करण्याचे आणि राजहंसा सारखे शुद्ध नीरक्षीर विवेक देण्याचे ..असे सारे सामर्थ्य मला सार्याच संतांच्या आणि विशेषतः रामदास स्वामींच्या रचनांमध्ये दिसते..अर्थात मी त्या उपदेशांना सदैव जवळ बाळगतो..अगदी प्राणापेक्षा..जवळ!!..असो..तर मी ऐकत बसलो ..छान समाधी लागली होती..आणि मघाशी घडलेला प्रसंग मनात आला..आणि मनाच्या बहुआयामी पटावर..कानांतून येणाऱ्या संगीताच्या पार्श्वभूमीवर स्मृतींचे आवर्तन सुरु झाले...
...माझ्या मित्राला काय किंवा कोणाला काय मी सहसा पूर्वी असे उपदेश देत नसे..पण आजकाल सहज निघून जातात ..आणि मग वाटते अजून त्यांना शिकायचे आहे..मी सुद्धा असाच राहिलो असतो ..स्त्री -पुरुष आणि त्यांच्या परस्पर सह्संबंधान्बद्दल...कदाचित मला फारच लवकर समजले आणि अजून समजणे सुरूच आहे..त्यांना समजेल वा न समजेल...पण आपण उपदेश करण्यात अर्थ नाही..ज्ञान कुणालाही भरवता येत नाही..जेंव्हा तुमची बुद्धी ते समजते तेंव्हाच खरे..तोवर प्रमाद घडतच राहतात..!!..मला सुद्धा जेंव्हा अंतरात्म्यातून समजले तेंव्हाच मी प्रबोधीत झालो...बाहेरचे गुरु मार्ग दाखवतात..पण शेवटी जोवर आपले मस्तक ते मार्ग समजून घेत नाही..मान्य करत नाही.तोवर सर्व व्यर्थ असते!...
स्त्री आणि पुरुष ;नर आणि नारी ..हे विषय विनोदाने ;आनंदाने ;अश्लील्तेने ..असे विविध अंगांनी आपल्याला भेट असतात रोजचेच..!पैकी विनोद कधी पायरी सोडतो आणि आनंद कधी उन्माद होऊन जातो ते कळत नाही..एकंदर स्त्री आणि पुरुष हा विषय मुक्तपणे चर्चेत नसला तरी प्रत्येक ठिकाणी ;प्रत्येक दिवशी हा विषय सार्यांपुढे येतोच..स्त्री आणि पुरुषांमधले नैसर्गिक बंध कसे असतात किंबहुना स्त्री आणि पुरुषाची मानसिकता कशी असावी ह्याबद्दल माझे मन परत एका वेगळ्या वाटेवर मला घेऊन गेले..देहात सहा विकार आणि एकुलता एक विवेक आहे..अर्थात सहा पुष्ट जनावरांना नियंत्रणात ठेवणारा एकच नियंत्रक...ज्यांच्या [बहुतेकांच्या]मनात हे सहा पुष्ट प्राणी अगदीच शेफार्लेले असतात त्यांना विवेक रहात नाही..तो चेंगरून गेलेला असतो..आतल्याआत..आणि मग माणसांच्या वेगवेगळ्या पापकर्मांना अलगद सुरुवात होते..स्त्री काय किंवा पुरुष काय ..तसे म्हंटले तर एकाच ईश्वराची दोन रूपे..दोघांमध्ये काही साम्य आणि काही भेद उत्पन्न केले आहेत निसर्गतः !!.. to be continued..[when i will be in mood..!!]
No comments:
Post a Comment