"उजवीकडून चौथी बघ"..
"बघितली."
"आता तिच्या डावीकडून दुसरी बघ"..
"एक मिनिट..हो बघितली "
"आता थोडासा मागे वळ आणि माझ्या मागे तिसर्या रांगेत बसलेली बी टेन नंबर खुर्चीत बसलेली बघ ..लाल ड्रेस वाली "
"तू ग्रेट आहेस रे,ढापण्या ,पुढच्या मुली दिसतायेत ते ठीक आहे , पण मागे बसलेल्या सुद्धा न वळता अचूक सांगतोस..?"
"अरे चमन ,ते तर आपलं स्कील आहे. यु नो खासियत ..हेहेहेहे !,तू फक्त बघायचा काम कर ,आपली खोपडी चांगल्या मूड मध्ये असताना उगाच फालतू चमनगिरी नकोय तुझी !..चायला ,ह्या गोंडस पोरी आपल्या कॉलेजात का नसतात रे?,अशा गोड मुली जर आपल्या वर्गात असत्या ना ,तर मी कशाला रे कॉलेज बुडवलं असतं?..आत्ता बुडवतोय तसं??.!! बाय द वे ती लाल ड्रेस वाली म्हणजे समीरा;१०३पहिला मजला,आशीर्वाद ;गोखले रोड ..लक्षात ठेव,रे चमन !!""..
भर गर्दीच्या थेटरात आमची चौकडी चित्रपट बघायला नुकतीच स्थानापन्न झालेली होती ..आणि चमन माझ्या उजव्या बाजूला..डावीकडे विन्या आणि त्याच्या बाजूला निक ..पैकी विन्या आणि निक तसे शांतताप्रिय [कारण काही बोलण्या ईतके ज्ञान अजून त्यांना प्राप्त झालेले नाही ..आणि ते गप्प असतात तरच छान असे सगळ्यांचे मत असल्याने त्यात विशेष काही नाही..] ..पण चमन हा जरा विचित्र प्रकार आहे..म्हणजे वर जो संवाद मी लिहिला तो संवाद आपल्या बारीक चष्मा चढवलेल्या आणि मुली बघताच गरागरा डोळे फिरवणार्या ज्या अवलियाच्या मुखातून निघाला त्या अफाट तोंडाचा मालक..चमन हे त्याला दिलेले सार्थ नाम आहे..कारण तो स्वतः सोडून सगळ्यांना चमन म्हणत असतो..एकदा तर तो स्वतच्या वडीलांना चुकून "कसले चमन आहात हो तुम्ही?" असे पटकन बोलून गेला आणि नंतर तीन दिवस अवघड जागेवर बसलेल्या लाथेच्या आठवणी आम्हाला गाढवासारखा खिदळत सांगत होता..असो..तर असेही त्याचे मूळ नाव सांगून फायदाही नाही..आमच्यासाठी तो 'चमन'च आहे..!!
निमित्त काहीही असो..चमन हजर असलाच पाहिजे..तो मूर्ख नाही..अतिशहाणा आहे ,आणि हाच त्याचा प्रोब्लेम आहे..!!तो टारगट नाही पण अडेलतट्टू आहे..हट्टी आहे..आणि सगळ्यात म्हणजे आपण अत्यंत सूक्ष्म आणि मूलभूत विचार करतो असा काहीतरी भयंकर गैरसमज त्याला आहे..!पण तरीही तो असला म्हणजे मनातल्या एका आपल्याच उनाड प्रतिमेला आपण भेटतोय असा विलक्षण आनंद होतो..आणि नंतर कधीकधी त्याला बर्याच वेळा तुडवून काढावासा वाटला कि हाच आनंद मनात येऊन तो आमच्या हातून वाचतो...काहीही असले तरी एका बाबतीत मात्र चमन आकाशा एवढा थोर आहे..ऋषितुल्य आहे..योगी आहे..सर्वद्न्य आहे..ते म्हणजे त्याचे मुलीन्बद्दलचे अफाट ज्ञान..तरुण;सुंदर;कुरूप;बेढब .सुडौल;गर्विष्ठ;उन्मत्त;स्वार्थी;प्रेमळ ;खुशामती ;बेअक्कल ;हुशार ..कशाही मुली असू देत ..चमनला विचारा!..त्याची टेप सुरु होते..अनादी अनंत परमेश्वर जसा सर्वत्र आहे..आणि संतांना सगळीकडे त्याचाच भास होतो तसा चमन सुद्धा संतच..त्याला सर्वत्र स्त्रियांचे [तरुण आणि सुंदर ]भास होत असतात..प्रचंड गर्दीत ;जीव घुसमटून काढणार्या लोकलमध्ये ;कॅन्टीन मध्ये ;थेटरात ;रस्त्यांवर;सर्वत्र तो आपल्या ढापण-आच्छादित डोळ्यांनी ससाण्याच्या कोशल्याने मुली हुडकून काढतो..आणि याही पुढचा पराक्रम म्हणजे एकदा नीट पाहिलेली नार कधीही विसरत नाही,,,अशी अप्रतीम स्मरणशक्ती अभ्यास सोडून याच बाबतीत देवाने त्याला का दिलीये ह्याचं उत्तर त्याने मला दिलेले त्याच्या शब्दात असं आहे.."अरे चमन [म्हणजे मी ],देवाला पण माहितीये रे,कुठल्या गोष्टीला किती महत्व आहे,मला सांग येड्या [म्हणजे परत मीच],न्यूटन चे ते तीन चार फडतूस नियम महत्वाचे कि टी.वाय.ची ती नुपूर.???..माहितीये ना?..काल तर सफरचंद दिसत होती यार !..आता असले सफरचंद सोडून न्युटनची टुकार सफरचंदे काय म्हणून गोळा करू मी?..देवाने म्हणून आपली खोपडी लेडीज टेलर सारखी मस्त बनवलीये .उगीच का म्हणून देवाला नाराज करायचे?".......to be continued....
No comments:
Post a Comment