![]() | ||
चाललो मी एकटा वाटेवरी अन गीत माझे एकट्याने गायले..!! |
हे माझे लिखाण त्यातले "काही" असेच .."काही" मनापासूनचे .."काही" सहज लिहिलेले ...तर काही असे कि ते लिहिताना मनात खोलवर साठलेले आठवणींचे ऋण पुन्हा जिवंत करणारे!!'मी अगदी हाडाचा साहित्यिक आहे..',असे दाखवायला..किंवा भाषेचे कलात्मक आविष्कार सहज कसे निर्माण करू शकतो हे दर्शवण्यासाठी हा "ब्लॉग-प्रपंच"नाहीये!!....माझे काही खरोखरच उत्तम लेख किंवा कविता यात नाहीत...थोडेफार असतील ते वाचकांना सुखवतही असतील किंवा नसतीलही ...मला याची कल्पना आहे...!!..पण खर म्हणजे हे सगळे लिखाण मी मला माझ्यापुढेच व्यक्त करण्यासाठी जास्त आनंदाने लिहिले आहे... .अगदी चंद्रशेखर गोख्ल्यांसार्खा "मी माझा"..असा मी नसलो...तरी माझ्यातला "मी"..मला ओळखायचा असला कि मीच लिहिलेले काही बाही मी वाचत असतो...!!..
कधी कधी आपण क्षुल्लक चुका करतो..आणि समोरच्याच्या मनात आपली वेगळीच प्रतिमा निर्माण होते..आणि बरेच मूल्यवान संबंध तुटून जातात ..काळजाला घरे पडतात...मनात निष्कारण कटुता वा अवघडलेपण उत्पन्न होते.....आणि असे होऊ नये म्हणून मी दक्ष असतो..अर्थात त्यासाठी स्वतःला लांबून इतरांसारखे न्याहाळावे लागणे मी शिकून घेतलंय...आणि त्यातलाच एक भाग म्हणजे आपलेच लेखन इतरांच्या दृष्टीने वाचणे.."आपुले आपण व्हावे गुरुजन..!!.जाणा हे लक्षण उद्धाराचे!!"..अशी एक ओळ मीच बनवून सतत स्मरणात ठेवली आहे..!!

माझ लिखाणाबाब्तीत लोकमान्यांशी [टिळक]थोडेसे साम्य आहे...त्यांना लेखन प्रत्यक्ष करायला कंटाळा येई असा त्यांचा स्वभाव होता .[संदर्भ:"दुर्दम्य"-गंगाधर गाडगीळ ]...[..पण त्याच महामानवाला शरीर पोखरणार्या मधुमेहासह;आणि देह जाळणार्या उष्णतेत मंडालेच्या कारावासात गीतारहस्य पेन्सिलीने एकेक शब्दनशब्द लिहायची वेळ आली...दैवाचे खेळ!..म्हणूनच मी सदैव नतमस्तक असतो अशांसमोर..असो..]...आणि महामहोपाध्याय द.वा.पोतदार यांच्याशी सुद्धा..[एकटाकी बसून लिहायला ते अवघडून जात - ईति.बाबासाहेब पुरंदरे..संदर्भ:"ग्रेट भेट" मुलाखत ]
........एका जागी बसून अखंड लेखन करणे यालाच "आसन विजय" असेही म्हणतात ..तो माझ्याकडे कमीच...म्हणजे तासंतास बसायला हरकत नाही...परंतु माझे विचार मी फक्त विचार करत असताना लयबद्ध आणि सजग असतात ..तसे लिहिण्याची जोड मिळाल्यावर राहत नाहीत..अडेलतट्टू वासरासारखे ते मधेच धावतात मधेच थांबतात..मग लेखणी थांबवली कि परत सलज्ज युवतीसारखे मस्तकात परततात..पुन्हा लिहायला बसलो कि परत उनाडक्या सुरु त्यांच्या.....!!थोडक्यात काय लिखाण आणी विचार एकत्र नांदत नाहीत ..म्हणजे ते तयारच नाहीत..!!.म्हणून घडत काय कि बर्याचदा लिहून झाल्यावर असे वाटत कि "अरेच्चा ;अजून पुष्कळच वेगळे शब्द मनात होते..विविध भावना होत्या ..त्या का नाही आठवल्या तेंव्हा..??"...उत्तर एकच-लिहिताना त्या गायब झालेल्या होत्या..[समुद्रातल्या द्वारकेसारख्या].!!.लेखन संपले आणि त्या परत आल्या..!!माझे ..आता काय बोलणार यावर.??...म्हणून मी नेहेमी म्हणतो.."व्यासांना नव्हती ईतकी लेखनिकाची आवश्यकता मज पामरास आहे..seriously .."!!....म्हणजे मी नुसता बोलतोय [ शांत विचार मनात सरसरत येतायत ]..आणि कोणीतरी ते लिहून घेतोय..असे जर कधी घडले तर मी उत्तम साहित्य निर्माण करून जाईन..अगदी खरच !!...[ तेवढ्यासाठी मी चक्क आरामखुर्ची घेतली होती..त्यावर बसून मी बोलणार ;विचार करणार ..पण !!..फक्त लेखक मिळाला नाही..!!]

*आता हे सगळे पुराण सांगून काय उपयोग ?असे कोणास वाटेल म्हणून म्हणतो कि त्याचा या ब्लॉगशी संबंध आहे..अर्थात कागदापेक्षा संगणक लिहिण्यासाठी किंचित बरा असे मला वाटले ..लेखणी पेक्षा कीबोर्ड जरा जास्त मानवला..!!...बरेच सुसंगत लिखाण होऊ शकले....!!
*माझे लिखाण हे माझ्या आयुष्याचे प्रतिरूप नाही...पण माझ्या अव्यक्त आशा आणि विचार यांच ते लहानसं प्रतिबिंब नक्कीच आहे..!.मी प्रेरित होताना ;कर्तव्य-मूढ होताना ;आत्ममग्न होताना ;निश्चल होताना माझ्या मनाचे जे उद्गार उमटले असतील ..जी अनाम संवेदना उत्पन्न झाली असेल त्या स्पन्दन्नांतून हे "हर्षायन"..[.अर्थात हर्षपूर्णतेचे असे माझे अयन[=प्रवास] ] जन्माला आले असावे...जसे रामायण ..कृष्णायन.. तसेच "हर्षायन"!!.....
* आज मी लिहायला बसलो तेंव्हा विचार केला कि, आपण हे पन्नास काव्य-लेखमय साहित्य ब्लॉगवर टाकले...म्हणून आपण किती बदललो ?..आणि त्याचे उत्तर असे कि मनाला एक मुक्तता मिळाली...अनंत विचारांचे ;अनंत मनोरे अगदी अल्प प्रमाणात कागदावर उमटले ..प्रसारित झाले..आणि कदाचित काहींनी आवडीने वा उत्सुकतेने ते वाचले.!.पण खर सांगू.?..हा ब्लॉग इतरांपेक्षा मीच कित्येक वेळा वाचला असेल...एक उदाहरण आठवते कि ;माणसाच्या बाजूने त्रैलोक्य-सुंदरी आणि आरसा ह्या दोन्ही एकत्र गेल्या तर माणूस आधी आरशात पाहिल,इतके माणसाचे स्वतावर प्रेम असते..किंवा आत्मभान असते असे म्हणूयात..[ या उदाहरणावर आमच्या एका सत्शील आणि "युवा-कन्या-निरीक्षण विशारद" अशा मित्राचे म्हणणे असे कि, मी तिला आरशातून पाहीन..मग आरशात स्वताला पाहीन आणि नन्तर तिच्या मागावर सुप्तपणे जाऊन तिला प्रत्यक्ष पाहीन..."..असो..] ..सांगायचा मुद्दा असा कि अशी आत्ममग्नता ;सतत स्वताला परीक्षित राहण्याची संधी हा ब्लॉग मला देतो..!!..माझे लिखाण मीच वाचत असतो..[ तुझे लिखाण तुलाच वाचायचय रे..जरा कमी लिही..नाहीतरी कोण बसलंय वाचायला?
..- ईति "तोच" मित्र.] ..माझे लिखाण मला सुधारते आणि शिवाय मला उमेदसुद्धा देते..आनंद तर आहेच. !!
* मला व्यसन नाही ...दारू ;सिगारेटी;गुटखे असे प्रकार मला आकर्षित करू शकत नाहीत..त्यांना मी आवडत नसावा..आणि मला ते..!!...पब-डिस्को-बार-ह्यांचे वातावरण मला अजिबात आनंद देऊ शकत नाही..आणि तसा क्षुद्र आनंद घेण्याची आवड सुद्धा नाही..ईश्वराने कमरेवरती दिलेले हृदय आणि त्याहीवरती विराजमान असलेले मस्तक ..ह्यांवर भक्ती जास्त असल्याने .."कमरेखालचे" "विनोदी"वाटणारे साहित्य पाहणे अथवा वाचणे यातही मी रमू शकत नाही....ज्ञान असले कि विकार कमी होतात..अन त्यामुळे इतरांना अवघड वाटणार्या गोष्टी मला सहज वाटतात..आणि त्यांना जे सोपे वाटते ते मला कधी कधी अशक्य आणि भयंकर सुद्धा वाटते...बहुतेकदा पाप सुद्धा ...!!..सांगायचा मुद्दा असा कि..समाजात जी रूढ व्यसने आहेत ती मला आपलीशी वाटत नसल्याने..आपोआपच एक व्यसन मला जडले ,,निरीक्षण आणि आत्मसंधानाचे! यातले आत्मसंधान अजून कमी आहे..पण निरीक्षणामुळे चांगल्या-वाईट गोष्टी समजून गेल्या अगदी त्यातल्या बारकाव्यांसहित..त्यामध्ये फारसे न फसता..!!.म्हणतात ना,"गुंतुनी गुंत्यात सार्या ,पाय माझा मोकळा",तसेच.!!.आणि त्यातून जी समज निर्माण झाली..तेच माझे लेखन..!!..हे हर्षायन!
* हे हर्षायन कधीही थांबणार नाही....ते क्वचित वाट चुकेल किंवा सर्वोत्तम मार्गांवर प्रतिष्ठेने चालेल ,पण चालत राहील..स्वताला सुधारत!निपचित आणि स्वस्थ कधीच राहणार नाही..कारण ते निर्माण झाले आहे ते,वाहण्याच्या ,सतत धर्म-क्रमण करण्याच्या विजीगिषु उमेदीतून..!!..जगण्यामधून ..प्रेमामधून..!!...
प्रतिभेची एक गम्मत असते ..ती सांगून येत नाही..आणि आल्यावर दान दिल्याशिवाय आणि दक्षिणा घेतल्याशिवाय सोडत नाही.!! आठवा बरं,त्या ओळी..""ती येते आणिक जाते ..येताना कळ्या आणिते..जाताना फुले मागते."!..येथे,"ती" म्हणजे उन्मेष-शायी प्रतिभा..!!ती अशी येते तेंव्हाच त्यातून जन्माला येतात संवेदनांच्या अर्थांनी संपृक्त झालेले;प्रतिभेच्या दानावर पोसलेले आणि आपल्या साक्षीने परिपूर्ण झालेले लेखनाविष्कार !!असो..लिहिण्यासारखे खूप आहे..पण आज इतकेच पुरे..!!
**..आता वाचकांबद्दल.,.मला ज्ञात वा अज्ञात जे जे वाचक असतील ;ज्यांनी यातले एकतरी पान वा काव्य वाचून मला प्रकट किंवा अप्रत्यक्ष दाद दिली असेल वा आवड /नावड/समीक्षा अगदी काहीही केले असेल...त्या सगळ्यांना मी त्यांच्या आयुष्यातले काही क्षण तरी अल्पसा आनंद किंवा माझे शब्द देऊ शकलो असेन तर ..हेच मजसाठी फार थोर समाधान आहे!..हे माझे आपुलकीचे ;प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे चार ओळींचे अर्पण पत्र त्याची कृतज्ञता म्हणून मी वाचकांसाठी देत आहे..आपण प्रत्यक्ष भेटू तर शकत नाही.किंवा मला आपण माहित असाल वा नसालही..आपण माझ्या वयाचे असाल;ज्येष्ठ असाल ;स्त्री /पुरुष कोणीही असाल,.आपणास मी आवडत असेन वा नसेनही...काहीही असो.!!..पण हे माझे कृतज्ञतेचे शब्दांचे ;सौहार्दाचे ;स्वानंदाचे प्रेम मी आपल्याला आपल्यातील प्रत्येकाला व्यक्तिश: अर्पण करीत आहे,..मी आजवर कोणावरही केवळ औपचारिक किंवा कृत्रिम प्रेम केले नाही..मला ते जमत नाही..प्रेम हा विश्वास आहे..तो धर्म आहे..पावित्र्य आणि सृजनाचा !!..आपण मला परिचयाचे असाल वा नसाल ..माझ्याबद्दल आपली मते चांगली असतील वा वाईट..तरी माझ्या मनात तुमच्याबद्दल
कसलाही किंतु कधीही नसेल ..हे लेखन वाचताना आपण असे समजू शकता कि मी आपल्याजवळच माझ्या शब्दरूपाने आहे..!जितके माझे लेखन माझे स्वताचे मनापासूनचे आहे..तितकेच तुम्हाला अर्पण केलेले हे अभिवादन आणि निष्कलंक निरासक्त प्रेम माझेच आहे!काही नाती शब्दांत बांधता येत नाहीत..आणि सगळ्यांनाच शब्दहीन नाती उमजतात असेही नाही,,म्हणून शब्दांतून ती व्यक्त करावी लागतात...एका पुस्तकात मी वाचलेले आठवते..एक प्रियकर आपल्या गैरसमज करून घेतलेल्या आणि कायमचे सोडून गेलेल्या प्रेयसीला ;त्याच्या मृत्युसमयी लिहून ठेवतो "प्रिये;आजवर तुझ्या स्मृतींवर जगलो..प्रतारणा केली नाही ..तरीही तुला समजलेच नाही..हे शब्द तरी वाचून कळतील कि नाही ते ठाऊक नाही..पण शेवटी ईश्वर अधिक दयाळू निघाला त्याने या जीवघेण्या हालांतून सुटका केली.!वाईट ईतकेच वाटते कि त्याला शब्दांशिवाय सारे कळले आणि तुला माझ्या दीर्घ प्रार्थनाही समजू नयेत?."!!...तर एकंदर असे असते.म्हणून शब्दांमधला अर्थ काळजात घ्यावा नुसते व्याकरण नाही..माझ्या वाचकांवर माझे असेच शब्दातीत प्रेम सदैव राहील.....अजून काय लिहू ?.कळावे ...लोभ असावा ही विनंती,,.!!
शेवटी........हा ब्लॉग अजून चालू आहे तसेच माझे आयुष्य सुद्धा..आणि त्या महामाता परमेश्वरी जगदेश्वरीस इतकेच सांगतो..कि;
""*****..मत्सम:पातकी नास्ती,
पापघ्नी त्वत्समा न ही..
एवं ज्ञात्वा महादेवी, यथा योग्यं तथा कुरु..!!...
..............................लेखनसीमा......हर्षल!!
great man...simply great.........awadla mitra!!
ReplyDelete