Saturday, October 22, 2011

!!माझ्या लेखनाची साठी उलटते ...तेंव्हा ..!!!

''साठ ...सिक्स्टी ..नालायका !! तुला काही लाज वगैरे??...

''अरे,आता त्यात लाज काय.."?

''वाचणार्यांच काय?..त्यांना किती पिडशील ;घोड्या?"'

''अरे ,मी काय जबरदस्ती करून वाचायला लावत नाही..''

''डुकरा;खोटे बोलू नकोस;माझ्या प्रोफाईल वर लिंक वर लिंक पाठवून हैराण केलंयस मला,आणि म्हणतोस .जबरदस्ती नाही.?..कुठे फेडशील ही पापे?""

"'मला वाटलं ;हृदयाला भावलं,म्हणून लिहितो रे मी'!!'

''तुझ हृदय का काय ते आहे ते,चुलीत घाल ,आणि..तुझ्या काळजाला [हा हलकट शब्द बरेचदा असतो रे तुझ्या लिखाणात ;बोकडा!!..काय लफड आहे हे काळ्जाच ??उलट्या काळजाच्या माणसा !! ]; कि काय असेल त्याला वेळच्या वेळी गप्प बसव,नाहीतर लोक फोडून काढतील तुला..आणि तुझ्या मंद ,बेअक्कल भावनांनासुद्धा !! ..लिखाण करतोय ..लिखाण ..दीड अक्कली..कुठचा!..मट्ठ.!!'' 

"'अरे तू वाचून तर चांगला आहे म्हणाला होतास..आणि काय ही भाषा तुझी?

"'अरे ऐतखाऊ टोणग्या; ही माझी भाषा फार सभ्य आहे....त्या लोकांचा विचार कर जे तुला रोज सहन करतायेत..तुझा फडतूस ब्लॉग वाचतायत..त्यांच्या कोमल मनाला केव्हढी शिक्षा..!!..निर्लज्ज माणसा,मानसिक ताणाबद्दल  आणि 'तुझे लंबे चवडे लेख आणि मद्दड कविता वाचून येणारी भोवळ'"..त्या बद्दल ; अशी दुहेरी फौजदारी केस ठोकतील न तुझ्यावर ते वाचक ,तेंव्हा तुझ्या आचरटपणाला असे मस्त रट्टे बसतील....आणि माझ्या प्रतिक्रियेबद्दल .म्हणायचं  तर ,.मी न वाचताच ;छान ;उत्तम असे लिहून ठेवायचो..;मनात म्हणायचो हा  बोकड दोन चार दिवस काहीतरी लिहील आणि गप्प बसेल !!..पण नाही ..हर्षल नामक सुस्त बोकड चरत गेला साहित्याच्या ऐसपैस कुरणात ..आणि साठ ..चक्क साठ लेख खरडून ठेवलेस....काय तर म्हणे 'हर्षायन''!!
कसलं हर्षायन रे ?...त्यापेक्षा मट्ठ बोकडाचे 'चरणायन"'..किंवा सुस्त अजगराचे ''सुस्तायन'..;नाहीतर मूर्खायन ..किंवा अगदीच लाज वाटत असेल तर '"डुक्कर मुसंडी ""...वगैरे नावे दिली असतीस तर शोभले तरी असते..हर्षायन म्हणे..!!....तुला वेळच्या वेळीच आवरायला पाहिजे होता रे...आता तरी सुधार आणि एक सुद्धा अक्षर टाईप करू नकोस...जरा लाज बाळग नरपुंगवा..!!!..सारखे तुझे ब्लॉग वाचायला लोक काय रिकामटेकडे आहेत का रे ...आणि परत जर लिंक पाठवलीस माझ्या प्रोफाईल वर ,तर घरी येऊन तुझा पीसी फोडेन..!!...म्हणून आजच्या  आज .ब्लॉग लिहीण बंद कर..आणि स्वतःला झेपतील तितकीच कामे कर .. ओके? ??..मला दिसले पाहिजे हां,कि बोकड आता चरत नाहीये ..नुसताच बसलाय नाहीतर, एका बोकडाची विनाकारण कत्तल झाल्याची बातमी परवा मीच छापेन ,तुझ्या वाचकांसाठी;तुझ्याच ब्लॉग वर..!!चल.बाय ..सी यु ...टेक केअर ..!! ""

.............chat window  बंद करून आणि फेसबुक वरून  लॉग आउट...करून मी घाम पुसला ..आणि माझ्या परममित्राच्या शिव्या आणि धमक्या गाळून ..विचार करू लागलो..!!..ब्लॉग वर ६० पोस्ट...दिसल्यावर ती साठी साजरी करावी म्हणून माझ्या चांगल्या मित्राला..सहज मेसेज केला ..आणि त्यापुढे त्याने जे काही केले ते आता वर लिहिलेच आहे....बोकड आणि मी असा जुनाच संबंध त्याने प्रस्थापित का केलाय हे मला अजून कळाल नाहीये ..पण आधीपासूनच मी एक बोकड आहे ह्या त्याने स्वताच निर्माण केलेल्या सिद्धांतावर त्याची अपार श्रद्धा आहे..तसा तो मला ईतर नावांनी सुद्धा [जनावरांच्या ]हाका मारत असतो ;परंतु बोकड ह्या प्राण्याशी जरा माझे जास्तच साम्य आहे असे त्याचे ठाम मत असल्याने ..ईतर नावे जरा मागे पडतात....असो..!!
      
                     त्याची सूचना जरा जास्तच भडक असली तरी त्यातले काही मुद्दे  मात्र विचार करण्यासारखे होते..उदाहरणार्थ मी ब्लॉग लिहून लिंक का पाठवतो.?..ती लिंक कोण वाचत असेल का ??.मुळात वाचतात कोणी;कि नुसतच बघतात..??..एक न अनेक शंका त्याने शिव्यांच्या आडून मला दाखवून दिल्या....मुळात मी लिहितोय का हाच मुख्य मुद्दा ..आणि लिहित असेन तर ते कोणी वाचतंय का हा दुसरा मुद्दा..!!..परत वाचल्यावर लोकांना कंटाळा येतो कि बोर होतंय कि आवडतंय  हे कळायची सोय नसल्याने ;आणि रिप्लाय देण्याची सोय असून फारच कमी लोक रिप्लाय देत असल्याने ;खरच कोणी वाचतंय कि नाही अशी शंका मला आली....पण मुळात हा ब्लॉग ..एक समाधानाचे साधन म्हणून माझ्यासाठीच मी जास्त वापरलाय....प्रसिद्धी साठी नव्हे !!..माझा ब्लॉग कमीत कमी एक वाचक तरी नेहेमीच राखून ठेवेल ;तो म्हणजे खुद्द मी...!!...बाकीच्यांनी तो वाचावा असे वाटते ..पण आग्रह नाही...वाचलात तर छानच..कुणाला तरी काही तरी आनंद मिळतो यापेक्षा जास्त अपेक्षा काय असते...??...आता लिंक बद्दल म्हणाल तर फेसबुक वर बर्याच वेळा मी लिंक पाठवत असतो..पण यासाठी कि मी जे लिहिलंय त्याचे मूल्यमापन दुसर्या व्यक्तीकडून व्हावे...आणि सुधारणा करायला वाव मिळावा..!!...मला सुधरण्याची एक सुद्धा संधी मी सोडत नाही....मला सुधारायच्या बाबतीत  मी अगदी निर्लज्ज असतो....लोक मला रागाने;विनोदाने जे काही बोलतात त्यातला राग किंवा विनोद मला समजतो ;पण त्याचा परिणाम माझ्या मनावर अजिबात होत नाही....उलट ती माझी चूक काय होती त्याकडे माझे सगळे लक्ष असते..आणि मी सुधारतो...!!.मी वर्गात शिकवत असताना..माझे व्हिडियो काढून ठेवलेत...ते पाहत पाहत अनेक वेळा बर्याच चुका कमी केल्यात ...असो..!!
                       
  सांगायचा मुद्दा हा ,कि मला स्वताचे परीक्षण अगदी कठोर परीक्षण करायला आवडते....आणि मी ते करतच असतो ;पण  तेच जर इतरांकडून झाले तर जास्त समाधान  मिळते..!!..म्हणून हा लेखन प्रपंच..आणि लिंक पाठवण्याचा उपद्व्याप..!!..पण खरी गम्मत पुढेच आहे..मला टीका आवडते हे मला समजले तरी सगळ्यांना नाही..आणि बरेच लोक तोंड देखली स्तुती करतात किंवा मोघम बोलतात...त्यांना सांगावे कसे हेच कळत नाही मला...!..त्यांना वाटत असेल एकदम चुका कशा काढायच्या?...म्हणून बिचारे इतरांशी जसे औपचारिकपणे वागतात तसे माझ्याशी वागत असावेत..!!..पण मी औपचारीकता अजिबात मनात नाही...मला राग येत नाही..[आला तर अगदीच क्वचित..आणि मग भयंकर.आणि कायमचा !!.पण फार वेगळ्या आणि निर्घृण गोष्टींबद्दल !!लहान सहन गोष्टींचा राग यावा इतक्या त्या भयानक नसतात !!]..आणि माझ्यावर केलेली मनापासूनची व प्रामाणिक टीका मला आवडते ;हे त्यांना कसे समजावून द्यावे हेच मला कळत नाहीये..!!...
                       
  ''साठी बुद्धी नाठी ''असे माझ्या ब्लॉग वरच्या साठ पोस्ट मला हळूच खुणावत तर नाहीयेत ना..अशी खात्री करून मी ही ६१वी पोस्ट लिहायला बसलोय....बुद्धी अजून नाठी झालेली नाहीये..आणि मला कंटाळा तर अजिबात आलेला नाहीये..[रिकामटेकड्या माणसाला कसला कंटाळा रे?..कंटाळा आम्हाला येतो तुझे लेख वाचून !;असे माझा परममित्र म्हणायला मोकळा आहेच].....चांगलं आहे ना !!..म्हणजे अजून तरी मला बरेच लिहिता येईल...आणि सगळ्याच वाचकांना मी वाईट लिहितो असे वाटत नसावे...कारण एक दोन चांगल्या प्रतिक्रिया पण आहेत...[त्या तुझ्याच स्वतच्या असतील ;बोकडा ...-इति आमचा दोस्त.]...आणि त्या वाचल्या कि वाटते आपण सोडून निदान काही लोक तरी हा ब्लॉग वाचत असतील..आणि त्यांना तो आवडलाय..!!सही आहे ..कीप अप देशपांड्या...असे मी स्वतालाच म्हणतो... !!...लिखाण करून माझा नवा जन्म होत असतो [मग ओळखा  बघू ?..मी साठ पोस्ट लिहिल्या,तर  किती वेळा पुनर्जन्म मिळाला असेल ते..!!आम्ही नाय सांगणार !!टुक टुक !!].....माझ्या ज्या  काळजावर जे घणाघाती घाव माझ्या मित्राने सुरुवातीलाच घातलेले मी लिहिलेत ;ते माझे काळीज  [ कुठे असते रे काळीज थापाड्या ?.प्रत्यक्ष दाखव बघू ;मतिमंदा !!काळीज वगैरे नसतेच शरीरात ..सगळं काम मेंदू करतो ;मट्ठ प्राण्या !! science  वाच गाढवा..शिकला नाहीस का biology ??--इति तोच मित्र ].....तर ते माझे काळीज जेंव्हा प्रेम आणि मानवता आणि जगलेले आजवरचे आयुष्य  शोधायला निघते तेंव्हा त्याला परिचित संवेदनाची जोड आपसूकच मिळते;समाज समजू लागतो;माणसांचे स्वभाव आणि स्वताचे वर्तन यांचे आकलन होते;आणि मग नव्या जाणिवांचे ज्ञान प्राप्त होऊन ;नव्या लेखनाचा विषय मिळतो....[[..ही असली वाक्ये लिहितोस ना तेंव्हाच तुला कान्फाडून काढावेसे वाटते रे,,,कसल्या जाणीवा रे ?काय शोधायला निघतोस रे?,!!..काय अर्थ आहे रे  ह्या लांब वाक्याचा..फालतू मनुष्या..तुला तरी कळलाय का बोकडा ??..ताबडतोब हा टारगट पणा थांबव ..नाहीतर तुला जाणीव वगैरे सोडच ,इतर कसलेही ज्ञान सुद्धा होणार नाही असा झोडपेन---इति तोच मित्र..]]......................तर असे माझे लेखन मला साठ पोस्ट नन्तर पण लिहायला प्रवृत्त करते...!!
...............................शेवटी समाधान एवढेच कि माझ्या लिखाणाबद्दल सगळेच लोक माझ्या परम -खवचट -मित्रासारखे विचार करत नाहीत.....म्हणून अजून लिहायचे त्राण आहेत....भान आहे..आणि माझे लिखाण वाचणार्यांवर अकृत्रिम प्रेम सुद्धा आहे.......हे प्रेम असेच राहील आणि माझा ब्लॉग सुद्धा ..[[ [जोवर इंटरनेट आहे ना; तोवर सगळ्या गमजा रे तुझ्या..!!..म्हणे ब्लॉग चालू राहील..!!..पैसे भर आधी इंटरनेटचे वेळेवर !!--- इति तोच [you know who ..]]]

.........................असो..शेवटी ब्लॉग काय किंवा आपण काय ..चालत राहावे हे महत्वाचे.....!!..आजकाल सगळ्या गोष्टी ''चालू ''असतात ..मग माझा ब्लॉग चालू असला तर काय प्रॉब्लेम??......असो लिखाण संपवतो..लोभ असावा हि विनंती ..!!............................................................
...........................................................................................सदैव ''तुमचा "'राहू इच्छिणारा  --हर्षल............
.

विशेष सूचना:----
माझ्या परम मित्राच्या धमक्यांना दुर्लक्षित करून मी परत आज लिहिलेय....पुढे काय घडेल सांगता येत नाही..तो त्याच्या शब्दाला जागला आणि स्वतची प्रतिज्ञा खरी करून बसला ...तर उद्या नक्की वाचाल एक बातमी,,.....""एक साक्षर ;निर्लज्ज ;बोकड लिहिता लिहिता यमसदनी गेला..:.....'''.....देवाजवळ प्राथना अशी कि ;असे काही होऊ नये................बोकडाला अजून बरच चरायचय ....!!! ...

3 comments:

  1. आज अपघातानेच मी येथे आलो. एअर फोर्स मध्ये सात वर्षे आणी आर्मीत पंचवीस वर्षे काढल्यानंतर मी निवृत्त झालो. वर्तमानपत्रात असंख्य लेख आणी कर्नल नावाचा माणूस, चंदनाची झाडे अशी दोन पुस्तके पद्मगंधा प्रकाशनाने प्रकाशित केली. आज इथे कोकणस्थ/ देशस्थ वाद वाचून फार निराशा झाली. मी हिंदूंनी एकत्र यावे, मनुवाद जाळून टाकावा या मताचा आहे.धर्माचे नुकसान मनुने केले आहे. मी एकच जीवनात ब्राह्मण,क्षत्रिय, वैश्य, शुद्र या सर्व जातींचे काम केले आहे.चुकीला चूक म्हणण्याचे धाडस माझ्यात आहे. माझी पुस्तके वाचून मला jpc1144@rediffmail.com किंवा ९५९५५८६१६८ यावर संपर्क साधावा.

    ReplyDelete
    Replies
    1. सर ! धन्यवाद ! परंतु देशस्थ कोकणस्थ लिखाण वादासाठी लिहिलेच नहिये ! व्यक्तीवादी वा जातीवादी राजकारण मलाही मान्य नाहीच ! भारत राष्ट्र एकात्म आणि प्रगत व्हावे ही माझिही इछा आहे !

      Delete
    2. सर ! धन्यवाद ! परंतु देशस्थ कोकणस्थ लिखाण वादासाठी लिहिलेच नहिये ! व्यक्तीवादी वा जातीवादी राजकारण मलाही मान्य नाहीच ! भारत राष्ट्र एकात्म आणि प्रगत व्हावे ही माझिही इछा आहे !

      Delete