Sunday, October 23, 2011

.!!........ज्योतीषम मूर्धनी स्थितम.!!

मित्र:-:"तुझी रास काय आहे ?नाही;लोकांच भविष्य सांगतोस म्हणून म्हंटल !!"

मी:- "मिथुन "

मित्र :-::"काय म्हणतोस;मिथुन?मला वाटायचं मेष !!चायला मिथुन ??..मग तू पण असाच  ईथून -तिथून ..मिथुन..हेहेहे.."

मी:-"अरे ;पण माझे पुनर्वसू नक्षत्र आहे..तृतीय चरण !!..आर्द्रा नाही!!..तू म्हणतोस ते गुण मिथुनेमध्ये आर्द्रा नक्षत्राचे आहेत .. आर्द्रा नक्षत्र बुधाचे असते आणि म्हणून जरा उथळ बुद्धी येते, पण पुनर्वसू गुरुचे नक्षत्र आहे..म्हणून स्वभाव वेगळा असतो;तत्त्वचिंतक आणि प्रेमळ आणि कर्तव्यकठोर ईत्यादी ..!! एका राशीत वेगवेगळी नक्षत्रे असतात..३० अंश आणि सव्वा दोन नक्षत्रे..नक्षत्र फळ महत्वाचे..किंबहुना तेच मूलभूत आहे ..नक्षत्र फळ.!!..माझा स्वभाव पुनर्वसू नक्षत्राच्या प्रमाणे असणार ..कुठल्याही पुस्तकात पुनर्वसू नक्षत्राचे फळ वाच  !!"

मित्र:-"असेल तसे सुद्धा ;पण अरे;मी प्रोग्राम पाहिलाय;मिथुन रास म्हणजे माकडांची रास...म्हणजे पोकळ विनोदी सगळे मिथुन-राशीवाले  ..ज्ञानाची खोली नाही . !!"

मी:-"म्हणून ;अर्धवट माहिती कानावर पडू नये असे मी नेहेमी म्हणतो न ते याच साठी..!!काहीतरी पूर्वग्रह निर्माण होतात आणि ज्ञान राहते बाजूलाच.!!   तुझ्या माहितीसाठी सांगतो;समर्थ रामदास स्वामी आणि आद्य शंकराचार्य दोघांचे नक्षत्र पुनर्वसू होते;अर्थातच रास मिथुन होती..माझे आहे तेच नक्षत्र आणि तीच रास,,!!"

मित्र:-"बर ;बरं,ज्योतिष विद्या विशारद ;कळले ;कळले!!लगेच    लेक्चर नकोय प्रोफेसर !!.तू पण बघतोस न रे पत्रिका??"

मी:-"तुला माहितीये ना..!.तरीही उगाच ??"

मित्र:-"अरे;कधीतरी गम्मत करतो रे तुझी;अरे पण ताईची पत्रिका सांगितलीस तोपर्यंत मला पण माहित नव्हतं यार.!!..तू कोणाला सांगितलं का नाहीस?..आजकाल ज्योतिषी जाम कमावतात ;तुला चान्स आहे..गम्मत करतोय हं..नाहीतर पुन्हा भडकशील..!!.


मी:--  "...अरे;आपल्याला ज्यातले कळते त्यावरच विनोद करावेत बंधू!!

..आजकाल काही लोक किंवा काही अडाणी लोक म्हणूयात ज्योतिषाच्या नावावर कमावतात हे 

खरय!!..पण ते किती सत्य-निष्ठ आणि उत्तम ज्योतिषी असतात ते मला माहितीये..!!

अर्थात अगदी काही अपवाद वगळता बहुतेक ज्योतिषी म्हणवणारे लोक अगदीच सामान्य वकूबाचे आणि 

अत्यल्प ज्ञान असणारे ;किंवा क्वचित थापा मारणारे सुद्धा असतात ..!!..ते लोक जे सांगतात त्याला 

ज्योतिष शास्त्र असे न म्हणता जन्म-पत्रिकांचे अतिसामान्य समीक्षण ईतकेच म्हणता येईल .!!

ज्योतिष-शास्त्राचे ध्येय आणि गांभीर्य ;या शास्त्राची संपन्नता आणि या शास्त्राचे आत्म-रहस्य समजणे म्हणजे पोरखेळ नाही..!!..

ज्योतिष हे शास्त्र आहे..धंदा नव्हे..आणि पैसे घ्यायचा अधिकार अत्यंत विद्वान आणि शुद्ध ज्ञान असलेल्या ज्योतीषांनाच आहे...ज्योतिष हा धंदा झालाय तो अज्ञानी लोकांमुळे..खरा ज्योतिषी स्वयंसिद्ध 

असतो..आश्रित नव्हे..!!हे काळाचे आणि परमेश्वराचे असे ज्ञान आहे ज्याची सुरुवात 

शास्त्र आणि गणित शिकण्यातून होते..आणि पुढे त्याचे मार्ग प्रज्ञेच्या 

आणि अन्तःस्फूर्तीच्या क्षेत्रांतून जातात...आणि  हा पुढचा मार्ग 

अत्यंत दुष्कर आणि केवळ भाग्यानेच प्राप्त होणारा आहे...गणित 

समजले ;दोन चार नियम समजले तर ज्योतिष समजले असे म्हणणे 

म्हणजे थेंब भर पाणी हातात घेऊन समुद्र ओंजळीत घेतलाय असे 

म्हणण्यासारखे आहे...ज्योतिष म्हणजे नुसते माणसाचे भूत भविष्य 

ज्ञान नाही.!!.हा विषय अत्यंत विशाल आहे..किंबहुना धर्म 

जाणणार्या आणि आत्मबुद्धी असणार्या माणसांनाच यात मुक्त संचार 

वेदांनी ठेवलेला आहे....सर्वांसाठी नाही...असेच लोक जे ईश्वर आणि 

विज्ञान जाणतात तेच आपोआप ज्योतिषाचा मार्ग चालतात...आणि 

अंतिमतः ज्योतिष देखील त्यागून ईश्वराचा बोध समजतात...!

..आपण पत्रिका बघायला जातो तेंव्हा लग्न;मुले बाळे;शिक्षण;पैसा;देह भोग आणि तत्सम गोष्टी ;ज्या 

मुळातच स्वार्थलोलुप आहेत आणि त्यांची परमावधी कितीही गाठली तरी सापेक्ष आणी 

अपूर्णच असते ;त्यांचाच ध्यास घेतो;तेव्हढ्याच विचारतो ;आणि ते सांगणाऱ्या माणसाला 

ज्योतिषी म्हणतो.!!..अर्थात ज्योतिष हे सारे सांगतेच..मानवी जीवनाच्या संकेतांबद्दल ..परंतु ते किती 

सूक्ष्म आणि महान आहे याचे ज्ञान कोणी करून घेत नाही आणि त्याला बाजारात विक्रीला ठेवलेल्या 

मालाप्रमाणे विकतात ह्याचा खेद होतो.. 

पण यापेक्षा माझा  आक्षेप आहे तो ज्योतिषाबद्दल जे पूर्वग्रह आहेत त्यांवर..आणि म्हणूनच 

लोकाना सुद्धा ज्योतिष काय हे कळत नाही..त्याची खरी ओळख होत 

नाही...आणि ज्योतिष सांगण्याचा सुद्धा एक क्षुद्र आणि मूर्ख धंदा 
झालाय..हेच घोर दुर्दैव.!!

.समाजातले "ज्योतिष" ईतक्या खालच्या थराला आणि बाजारभावाला

आलेय;कि ते चित्र पाहताना असे वाटते ;'कि, प्रत्यक्ष कल्पवृक्ष 

मस्तकावर असता..मनात लहान सहान ईच्छा धरून त्या पूर्ण 

व्हाव्यात अशी मुर्खासारखी वागणूक करणे व कल्पवृक्षा-तळी राहून 

अशाश्वत आणि हीन सुखांची मागणी करण्यासारखे होय..!!.मुळात दोष शास्त्रात 

नाहीये;तर ते धारण करू पाहणार्या माणसांत आहे...एक श्लोक आहे 

बघ ...."..यस्य नास्ती स्वयं प्रज्ञा!शास्त्रं तस्य करोति किम!!
    .....लोचनाभ्याम विहीनस्य ;दर्पण: किम करिष्यति?!!..

आंधळ्या माणसाला आरशात दिसत नाही ;हा आरशाचा दोष नसतो तद्वतच प्रज्ञाहीन मनुष्याला शास्त्रांचा काही उपयोग नसतो!!

म्हणून मी जरी ज्योतिष शास्त्र जाणतो ..तरीही  सर्वज्ञ नसल्याने मला 

ज्योतिष येते असे देखील म्हणायला धजावत 

नाही..आता,सर्वसामान्य कुंडली वगैरे बघणे हे मला कळते आणि 

बर्याचदा इतरांपेक्षा थोडे अधिक ..पण म्हणून मी स्वताला फार तर 

फलज्योतिष [मानवी जीवनापुरते ].सांगणारा असे म्हणू शकेन !
परंतु ..खरे आणि शुद्ध ज्योतिष इतके अरुंद आणि पवित्र मार्गावर 

चालते कि अजून मी तिथल्या पहिल्या पायरीवर तरी आहे का हे 

ईश्वरच जाणे!![[ आणि बरेच तथाकथीत ज्योतिषी अजून धड गणित 

आणि योग सुद्धा न जाणता भविष्य-कथनाच्या पाट्या दारावर 

लावतात..आणि  लोकांना आणि स्वतःला अज्ञानाचे धनी बनवतात ; 

हे अज्ञान बघून अत्यंत वाईट वाटते ]]]"

...........आता तू म्हणशील सगळेच ज्योतिषी अडाणी आहेत का?..तर याचे उत्तर असे कि ,ज्योतिषाचे गणित बहुतेकांना  
येते..राशी ;नक्षत्रे आणि काही नियम येतात ..त्यावरून सर्वसाधारण मनुष्याची रूपरेखा सांगता येते..इतकंच जर हे ज्ञान असते तर मी  एक सर्वश्रेष्ठ ज्योतिषी समजलो असतो स्वताला...ज्योतिष जे  तुला परिचयाचे आहे ते सुद्धा संपूर्णपणे कर्मावर आधारीत आहे...मुळात कर्म आणि नियती एकच असते ...जी नियती तेच कर्म आपण करतो..जी आपल्याला  प्रत्येक क्षणी होणारी बुद्धी असते तीच मुळात तीच नियतीचा आणि कर्मफलाचा एक भाग असते.. म्हणून कर्मसिद्धांत ज्योतिषाच्या विरोधी नाही [काहीना असे उगाच वाटते.!!.]..

ज्योतिष ज्या नियमांवर चालते त्या नियमांना मुळात स्वरूप  कसे प्राप्त झाले हे ज्यांना समजते ते खर्या ज्योतिर्विज्ञानाला जाणतात आणि त्यापुढे नतमस्तक होतात..!!मी अशा काही स्वानुभ्वान्वरून  हे सांगतोय,,आणि म्हणून मी ज्योतिष येते असे सुद्धा म्हणत नाही..जे काही पत्रिका वगैरे बघण्याचे काम मी करतो ते ईश्वराने काही  कौशल्य दिले आहे त्यावर ..आणि ते कौशल्य देवदत्त असल्याने ..मी सांगितलेले फलित योग्य येत असावे..!!पण खरच सांगतो यात सगळे श्रेय देवाचे आहे..किंवा त्या त्या वेळी मला होणार्या बुद्धीचे  आहे म्हण ;हवे तर..!!.लहान सहान मानवी घटना मी सांगू शकतो म्हणून मी काय किंवा कोणी काय महान ज्योतिषी झालाय असे म्हणणे म्हणजे "वाटीभर  पाणी पिणाऱ्या माणसाला समुद्रप्राशन करणारा अगस्ती ऋषी म्हणण्यासारखे आहे..!!..........काही कळलं का महाशय??""""
     
मित्र::--"अरे,तू जे बोललास ते सगळ ठीक..म्हणजे काही भाग नाही कळला ;पण तू कुंडली बघतोस ना? मी त्यालाच ज्योतिषी म्हणतो..बाकी आपल्याला काय पण नको.."


मी :--"काय बोलणार आता?..कुंडली बघू शकतो मी, पण तितकेच ज्योतिष आहे असे नसते..आणि नुसती कुंडली सुद्धा सगळ्यांना नीट कुठे कळते ?..ज्योतिष समजण्याची पहिली पायरी आहे ..गणित समजणे ;दुसरी आहे..योग आणि ग्रहमान आणि ईतर नियम  समजणे जे फल ज्योतिषाचे असतात ते!!..आणि हे ईतके सुद्धा वाटते तितके सोपे नाही....मुळात इथपर्यंत फक्त २५ टक्के ज्योतिष ज्ञान झाले असे समजूयात.आणि इतके सुद्धा व्यवस्थित येणारे अगदी दुर्मिळ लोक असतील,,...आणि ह्या पायरीपुढे सूक्ष्म ज्योतिषाचा आणि आत्मज्ञानाचा आणि ज्योतिषी माणसाच्या व्यक्तीगत अनुसंधांचा आणि उपासनेचा आणि तद्जन्न्य गोष्टींचा संबंध येतो...या पुढे सत्य आणि अचूक ज्ञान आहे..त्रिकाल ज्ञान म्हणूयात!! म्हणून मित्रा,ज्योतीषाचाच एक मूळ मंत्र सांगतो."--जे धर्म जाणतात आणि जे ईश्वर जाणतात तेच काळाला पार करतात...आणि कालज्ञान हेच खरे ज्योतिष आहे.--."

म्हणूनच वेदांमध्ये सांगितलंय,

*यथा शिखा मयुराणाम!!
 नागानां मणयो यथा !!
 तथैव सर्व-शास्त्रेषु ..
 ज्योतीषम मूर्धनी स्थितम.!! 

मयूर मस्तकावरचा तुरा जसा ;आणि जसा नाग माथ्यावरचा मणी ;
तसेच सर्व शास्त्रांच्याच्या ही शीर्ष स्थानी [उच्च स्थानी]..ज्योतिषशास्त्र  विराजमान असते...
.....अजून काय सांगू..!!..


................................लेखन -हर्षल

No comments:

Post a Comment