Tuesday, October 25, 2011

........................"त्या" तीन मुली..................!

""ईईईईई.....ते काय होतं ग?? "...!

"ईईई..अग काळपट जनावर होतं वाटत..पटकन क्रॉस झालं न म्हणून दिसलं नसेल..!!:"

"तुम्हा दोघींचे डोळे बिघडलेत का?..हेहेहेहे..अग तो मुलगा होता..पण खूपच काळा ;गबाळा  आणि गलिच्छ ..पण प्राणी नव्हता ..माणूसच होता.हेहेहेहे..अग;मी म्हणते पण काय ग;ही काही तरुण मुले जनावरांसारखी काय राहतात ग?..शी.!!.मला बाई किळसच वाटली..  !!

"कसला घाणेरडा मुलगा होता ग तो.?.!!रूप नाही ,रंग नाही..रेडा कुठचा..!!..अग मला खरच प्राणी वाटला तो..!!रिअली ..आय स्वेअर !!"

"जाऊ देत ;ए चल;ती बघ बस आलीच!.जाउयात लवकर !.खूप शॉपिंग राहिलंय!!.मग नंतर उशीर झाला कि परत आहेच!!..जनावरांकडे कुठे बघताय??हेहेहे..मस्त handsome कोणी बघुयात.!!काय ग आशु??..हेहेहे...!! ..ए चला ग ..चढा लवकर बसमध्ये !!"



..................... मुंबई cst बाहेर  एका बस-stop वर मी बसच्या रांगेत उभा असताना ..दुपारी जरा कमी गर्दीच्या वेळी  घडलेला हा प्रसंग...तीन यौवन-संपन्न सुकन्या [[.आता त्या 'सुकन्या' होत्या कि चावट कन्या होत्या ते मज पामरास कसे कळणार..??]]....नुकत्याच एका रस्ता धावत पार केलेल्या तरुणाबद्दल आपली महान मते मांडत असताना मी ऐकत होतो..मी काही त्या मुलाला पहिले नसल्याने खरोखरच तो जनावर किंवा भयानक होता कि नाही ते मला ठाऊक नाही..परंतु कुठलाही तरुण ""ईईई ;ते काय होतं ग? ""..अशा तृतीय पुरुषी नपुसकलिंगी उल्लेखाने वर्णन करावा इतका काही वाईट नक्कीच असणार नाही..अगदी केनियातला ओडुम्बे वैगरे नावे असणारा कळकट्ट शिरोमणी तरुण सुद्धा ..!!..पण ह्या फाजील सुकन्यांना तो मुलगा आहे हे उशीरा कळले..आणि तोवर त्या त्याला चक्क प्राणी समजल्या..!!


.........मला तर वाट्त ;मुलींची बोलायची style च जरा वेगळी असते..हत्तीचे कसे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात तशी...!!..नुस्त एव्हढंच नाही,तर मुली जरा समजायला अवघडच असतात ..विशेषतः १६ ते २७ मधल्या मुली.!!.एकंदरच आजकालच्या मुलींवर तर असे झपाट्याने हे नवीन बदलाचं वारं स्वार झालंय;कि काही विचारता सोय नाहीये.!!...[[..मुलगे तर already चावट असतातच..तेंव्हा त्यांची बाजू मी घेत नाहीये;पण आता आजकाल ""..सुंदरा ;शालिना,सुसंवादिनी .कोमला ,मोहिनी ,सलज्जा ""....वैगरे वगैरे विशेषणांनी आजवर समजल्या जाणाऱ्या तरुण मुली सुद्धा चावट  पणाला सहज "used to " झाल्यात इतकेच नव्हे तर चार पावले पुढेच गेल्यात असेच चित्र दिसतेय!!..असो ..]]


.....तर ;मी ह्या सुकुमारीन्च्या थोडा मागेच रांगेत उभा असल्याने व गर्दी अगदीच नसल्याने ..त्यांचे सुसंवाद कानावर पडून धन्य होत; त्यांच्या अप्रतिम मराठीला आणि अभिजात बडबडीला मनापासून नमस्कार करत बसमध्ये चढलो..[[त्या आत गेल्यानंतर !!]]....बसमध्ये चढल्यावर त्या तिघी गोंडस बालिका "महिलांसाठी राखीव" अशा जागेवर बसलेल्या एका मध्यमवयीन काका काकुंना गोड बोलून पटवत होत्या ....[[[..काका ;प्लीज..आम्हाला बसू द्याल का ..दमलोय खूप ईत्यादी... ओह!!.thank  you काका!!तुम्हाला लगेच उतरायचंय ना!!..आंम्ही धरतो न काकूंची bag ..सो स्वीट ऑफ यु काकू !!..ईत्यादी ईत्यादी .]]]..आणि चक्क काही मिनिटातच जागा मिळवून त्यांचे त्रिकूट खिदळत स्थानापन्न झाले देखील..!! ते काका-काकू तर धन्य झाले असावेत...ह्या अशा temporary "पुतण्या"..मिळाल्यावर ! [ मस्त बनवला काकाला--मी मनात म्हंटले..!! ]]
.......मला मुलींच्या ह्या "पटवा-पटवी" कौशल्याचा हेवा वाटत आलाय!!....एकंदरच मुलींचे स्वभाव; अखंड आणि अफाट बडबड आणि त्यांची चलाखी वर्णनातीत आहे हे स्वतः ब्रह्मदेव सुद्धा मान्य करेल...बरं ब्रह्मदेवाने गुपचूप  मान्य केलं तर ठीक आहे नाहीतर खुद्द ब्रह्मदेवालाच  मुली म्हणतील.." काय हे.? दाढीवाले आजोबा.??..आमच नाय ऐकणार?.असे कसे हो तुम्मी ??.प्लीज. प्लीज .प्लीज !!.म्हणा ना आम्ही हुशार आहोत!असं काय करताय ??.दाढीवाले आजोबा??...""....आणि यापुढे तास दोन तास, त्या देवाला सविस्तरपणे { आणि sincere पणे(  म्हणजे अत्यंत  रटाळ पणे )} समजावतील कि त्या कशा हुशार आहेत.. !!


......आणि मग [..त्या तुफानी बडबडीला कंटाळून  ] ब्रह्मदेव पण मान्य करेल कि, खरच ;आहात हां मुलींनो तुम्ही हुश्शार !!आणि म्हणेल "".कृपा करून आता निघा हं लाडक्या (कि बडबड्या ?) बालिकांनो! ;माझी चारही डोकी दुखायला लागलीयेत..बाय.. बाय.. टाटा!!..आणि परत येऊ नका हा माझ्याकडे..!!..जा ग जा .! हुशार कुमारीकांनो खाली पृथ्वीवर जाऊन तुम्हाला जो गोंधळ घालायचाय तो सुखाने घाला!.तुमच्या हौशी पुरवणारे आणि तुम्हाला बघून घायाळ वगैरे होणारे  मद्दड नरपुंगव [ उर्फ= पुरुषरूपी बैल ] आम्ही निर्माण करून ठेवलेलेच आहेत..जा,त्यांना आकर्षित करा आणि मग लग्न वगैरे करून "दे माय ,धरणी ठाय "अशी अवस्था करून सोडा..त्याशिवाय लेकाचे भक्ती करणार नाहीत देवाची..दुखातूनच भक्तीचे कमळ उगवते...ते कमळ त्यांच्या मनात उगवून देण्याचे काम तुमचे..जा पोरींनो जा...i am with you ,एन्जोय!! but  leave  me  alone ..प्लीज  !! ""..असो ..


.............तर सांगायचा मुद्दा हा कि ;त्या तिघी सीटवर बसल्या आणि काही वेळाने भाग्यवान अशा मला त्यांच्या मागेच महिलांसाठी नसलेल्या अशा सीटवर जागा मिळाली ..[ एक अवाढव्य दिलदार सिंधी मनुष्य.."ईधर बैठो जी ;असे मला म्हणत उठला तेंव्हा जागा मिळाली !! ..तो मुलींच्या बडबडीने तर नाही न सटकला??..जाऊ देत.. आपल्याला काय ? त्या इंटरेस्टिंग पोरींच्या मागे सीट मिळाली ना !!मग झालं..!!]


.......आता मला एक छान संधी मिळाली..मला त्यांना न्याहाळायचे वगैरे होते असे नाही..पण मला त्यांना ऐकायचे होते.!!..मी मवाली किंवा टारगट मुलगा नसल्याने केवळ मुलींना नुस्त बघूनच पिसाळणे
किंवा अश्लील वर्तन करणे मला आवडत नाही...सौंदर्याचा अपमान गलिच्छ पणे करणे मला सहन होत नाही .....पण चौकस पणाचा शाप [कि वरदान??] मला असल्याने आणि इथे तो चौकस पणा नको तितका  जागृत झाल्याने मला उत्तम संधी मिळाली असेच (मज निष्पाप!) मानवास वाटले तर त्यात नवल ते काय..!!..


...............असो..तर एकूणच त्या तिघी हसत होत्या;बोलत होत्या [खिदळणे;बडबड करणे हे शब्द जास्त सूट होतील!!]...आणि माझे कान धन्य होत होते..त्या तिघी एकमेकींना लाडाने shortform  वापरून हाक मारायच्या...*...तिघीमध्ये एक "आशु"..होती; एक "रुपी"होती आणि उरलेली सुडौल तरुणी म्हणजे "मनु"..!!.वा रे वा "आशु" ,"मनु" आणि "रुपी" .[[तीन सुंदर बडबड्या देवी...!!]]


.......ह्यांची मूळ नावे काय असावीत तो विचार मी केला पण ती कळून सुद्धा काय फायदा..??..कारण माझे कान त्यांचे सुखसंवाद ऐकत होते...मनुने आपल्या अजस्त्र पर्स मधून [[ त्या तिच्या हातातल्या वस्तूला पर्स म्हणणे म्हणजे गोणपाटाला दुधाची पिशवी म्हणणे होय..ही पर्स प्रचंड design असलेली आणि पूर्ण वाढलेला अख्खा कांगारू शेपटी सकट आत मावेल इतकी मोठ्ठी होती..]]..वेफर काढले..!! "आशु "ने  आधीच केक फस्त केलेला होतं आणि "रूपी" कुठलेसे जाड ईंग्लीश नॉव्हेल तिच्या मध्यम आकाराच्या पर्स वर ठेवून बसली होती..!!.."मनु"ने सगळ्यांना वेफर वाटले..आणि दोन तीन तोंडात टाकून परत बोलायला सुरुवात केली..नुकताच केक संपवलेली आशु;वेफरची
चव घेत गप्पा मारू लागली................!!...............


.....तिघींचे मोबाईल सतत हातात खेळत होते..आणि headfone च्या बारीक वायरी इकडे तिकडे झाडावरच्या वेलीसारख्या  रुळत होत्या..एकीकडे एका कानात वाजणारी गाणी ;एकीकडे हातात वेफर ;पाण्याची बाटली ;नाजुकसे हातरुमाल ;एकीकडे गप्पा अशा तीन चार आघाड्यांवर ह्या तरुणी एकदम लढत होत्या,.आणि सर्वत्र यशस्वी ;विजयी होताना दिसत होत्या....[[..बडबड करण्याची olympic स्पर्धा असेल तर एक पण मुलगा काठावर पण जिंकणार नाही...:!!]]


.......सुरुवातीला त्या शोपिंगबद्दल बोलल्या..कुठले दुकान किती चांगले ..आपले बजेट किती;कुठल्या दुकानात जाऊ नये;दुकानदार कसे बनेल असतात ;mall चांगला कि shop ..असे अनेक विषय लीलया हाताळून..मग त्यांची गाडी रूळ बदलून घरगुती चौकशांवर आली..आशु चा भाऊ कसा आजारी आहे..आणि तिच्या मित्राने कशी तिला हेल्प केली हे मला कळले.!!"मनु"चे पप्पा किती कडक आहेत आणि ती तिच्या "पप्पांवर" कशी गेलीये; ह्याचे अमुल्य ज्ञान प्राप्त झाले.;"रूपी"ला घरात फक्त तिचा डॉगी आणि टेडी [[हे तिचे अनुक्रमे कुत्रा व lovebird आहेत ]हेच कसे नीट समजून घेतात ;आणि आई वडील कसे घेत नाहीत हे समजले..!!(..हिला आई बाप समजून घेत नाहीत ??मग मोबाईल काय कुत्र्यानी sorry डॉग्गी नी घेतला असेल..??...मी मनात म्हंटले..!!)


.......या चर्चेनंतर जरा वेळ उदास चेहरे होऊन पुन्हा अल्पशी विश्रांती घेत पुन्हा "मनु"च्या अजस्त्र पर्स [[जादूची पोतडी ??]] मधून मसाला दाणे आणि cadburry  बाहेर आली..!!आशुने एवढ्यात तिच्या लहान दिसणार्या {{..आतून कुठलीही लेडीज पर्स लहान नसते..असा सिद्द्धांत लक्षात ठेवा ..त्यात दुनिया भरलेली असते ..जो मंगता है सब मिलेगा!!..साक्षात अलिबाबा सुद्धा हरवेल अशी गुहा असते  ती !! ..}} पर्स मधून लिपस्टिक आणि छोटासा आरसा काढून रंग-रंगोटी करून घेतली..केसांचा मागे बांधलेला band  का काय असतो तो दोनदा काढून परत लावला ..आणि विनाकारण मानेला झटके देत cadburry कडे मोर्चा वळवून मसाला दाणे जवळपास संपवलेल्या "मनु"कडे बघत उसासे टाकत cadburry चे दोन तुकडे तोंडात टाकले.!!..."रूपी " मात्र  वेफर आणि मसाला दाणे एका हातात घेऊन ;दुसर्या हाताने पुस्तक; mobile  ;रुमाल..सांभाळत ".अग ए ; आता cadburry कुठे ठेवू  ग मने??"..असे फारच अवघड आणि मूलभूत प्रश्न विचारत होती..{.केव्हढा त्रास तिच्या चिमुकल्या मेंदूला होत असेल ??..नाही का??..}!!........................काही वेळानंतर cadburry ,वेफर,मसाला दाणे आणि थंड  पाण्याच्या दोन बाटल्या;'रुपी'च्या हातातले पुस्तक  हे सगळे अदृश्य झाले.[म्हणजे संपवले किंवा पर्स मध्ये गेले !!..].आणि तिघी पुन्हा फ्रेश होऊन बोलू लागल्या.......


.................या वेळी बोलण्याचा विषय होता मुले..!!..म्हणजे boyfreinds !!.माझे कान टवकारले...!!


...............रुपीच्या मते मुलगा गोरा ;धीट dashing आणि caring  हवा..!."मनु"च्या मते रंग कसा पण असू देत पण स्वीट हवा.{..स्वीट आणि dashing हे मला न कळलेले शब्द आहेत ;म्हणजे त्याचा अर्थ कसा घ्यायचा हे मला मुळीच कळत नाही..}}.!."आशु"ला बहुदा आधीच थोडा अनुभव असावा म्हणून तिने मुलगा मस्त असावा ईतकेच सांगितले..आता मस्त म्हणजे "मदमस्त "कि नुसताच मस्त हे काही मला आणि उरलेल्या दोघींना कळले नाही.!!...बहुदा 'आशू'च्या मते ,आपल्याला आवडणारा मुलगाच आपल्यासाठी  मस्त  असणार असे काही तरी तिचे  गणित असावे!!....'मुले किती मक्ख असतात इथपासून; मुलांमध्ये काय पहावे आणि काय पाहू नये येथपर्यंत ..शिवाय मुलांना कसलीच अक्कल कशी नसते ..आणि त्यांचा आगाउपणा कसा चालू असतो येथपर्यंत ;शिवाय आपल्याला पहिल्यांदा कोण आणि कसा मुलगा आवडला होता ..पहिला crush कसा होता येथपासून ते नन्तर अनेक crush कसे झाले येथपर्यंत ..सगळे काही ५ -७ मिनिटात त्या त्रिकुटाने बोलून घेतले.!!..काही आचरट शब्द त्यांच्या तोंडून ऐकताना तर माझे गळ्यातले जानवे आणि त्यातला धर्म आता बुडणार कि काय?  ;किंवा माझ्या डोक्यावरची नसलेली शेंडी ;जर असती तर antenaa सारखी ताठ झाली असती काय ?;हे प्रश्न मनाला सतावून गेले..!! मी मान्य करतो कि खरच , काही काही शब्द [अपशब्द] मुलींनी वापरू नयेत ह्यावर माझी दृढ श्रद्धा आहे.!!.म्हणजे तेच अपशब्द मी हजारदा ऐकेन पण गोंडस मुलींच्या तोंडून नाही..फारच वाईट दिसते ते...अगदीच अशोभनीय !!   शिव्या देणार्या मुली शोभून दिसत नाहीत ..मला कसेसेच होते,..म्हणजे उत्तम दर्जाच्या शिव्या मला ठाऊक नाहीत असे नाही [मी देत नसलो तरी ..]!!..पण मुलींनी तेच शब्द उच्चारले कि ..प्रत्यक्ष "लता"ने अलिशा चिनॉय  [[  आलीशा =  ""कजरारे कजरारे  काले काले नैना""हे गाणे भयाण आवाजात म्हणणारी !!]]  ची गाणी म्हंटल्यावर जसे वाटेल तसे वाटते ..!! काही गोष्टी गोंडस व चांगल्या मुलींनी करू नयेत या मताचा मी आहे..कमी कपडे घालणे;शिव्या देणे;ड्रिंक [म्हणजे दारू हो..!!]किंवा स्मोक करणे;स्वताच्या प्रेमाचा बाजार मांडणे ;अश्लील बोलणे ;मुलांसारखे वागणे...अशी मोठ्ठी यादी करता येईल...पण आत्ता नको.!!...........तर आपण पुन्हा या तीन तुफान बडबड करणार्या ..{{आणि बोलून बोलून सफरचंदासारख्या लाल गाल झालेल्या ..}} पोरींकडे  वळूयात..!!
.....................मुलांवरून आता विषय परत शोप्पिंग वर गेला..{{...मुलींना हेच दोन विषय आवडतात वाट्त..शोप्पिंग नाहीतर मुले !!?? }}..मेक अप पासून ड्रेस पर्यंत सगळी उजळणी झाली.!!..कुठल्याही विधानाला खिदळणे किंवा उगीच विरोध नोंदवणे चालूच होते तिघींचे..तरी शेवटी एकमत होऊन शोप्पिंगचा विषय संपला..आणि तितक्यात एक goggle घातलेला ;तिशीचा देखणा मनुष्य बसमध्ये चढला..काही पुरुषांना देखणेपणा मानवतो...[[..आम्हाला देखणेपणा म्हणजे काय हे अद्याप माहित नाही.!!.मी आरशासमोर उभा राहतो तेंव्हा काही वेळाने आरसा वैतागून स्वताच फुटेल किंवा माझे प्रतिबिंब दाखवल्याबद्दल मेहेनताना म्हणून पैसे मागेल अशी भीती वाटते !!]]..तर हा तरुण उत्तम कपडे घातलेला ;goggle आणि उत्तम महागडे घड्याळ घातलेला ;आणि राजबिंडा असा दिसणारा;  आत आला आणि मला एकदम न्यूनगंड का काय तो वाटला..!!आपण असे दिसू का कधी असा विचार मनात ठेवत मी जरा मान खिडकीकडे वळवली..मनात आलेच तरीही " साला;आता हा हिरो बघून ह्या पोरी पाघळणार...तात्पुरते का होईना.पण नक्कीच..!!...आणि अंदाज खरा ठरला...तिघींनी त्याला पहिलेच..!!..नवलाचे ;आश्चर्याचे; सुस्कारे सोडलेच..!! आणि तिघी हळू आवाजात एकमेकींना डोळे मिचकावत बोलू लागल्या..अगदी हळू..पण माझे कान महा तिखट असल्याने ते संवाद पुष्प सादर करतो...........
[ सूचना:-- खालील संवाद अगदी हळू आणि कुजबुजत्या स्वरात झालेला आहे...शिवाय जन-लज्जेपोटी आणि वाचकांच्या निष्पाप मनांवर चावटपणाची सावली पडू नये यासाठी ; ह्या सुंदर युवतींचे काही शब्द "कट"करून किंवा काही "चावट पणाच्या"सीमा ओलांडलेली त्यांची वाक्ये गाळून खालील संवाद सादर केला आहे...वाचकांनो ह्या "सेन्सोरशिप" बद्दल मला क्षमा करा!..नाईलाज होता !!..}}




आशु:-"ए बघितलास का ग"?..personality बघ ना..!!
मनु:-"खरच..handsome !!..मस्त आहे ग."! 
रुपी:-श्रीमंत पण दिसतोय..ray -ban घातलाय..कसला सूट होतोय न फेस ला!!
मनु:-"ए पंजाबी असेल का ग ??कि दिल्लीचा ? "..
आशु:-"कसला स्लीक आणि chubby आहे ग..!!" 
मनु;-"आणि highly educated पण..वाटतोय !!"
रुपी:-"smart पण आहे ;मिशी मस्त वाटते त्याला ..हॉट लुक्स..!! "
मनु:-"पंजाबीच बहुदा ,..आपल्यात ईतका छान कोणी असतो का?..हेहेहेः "
आशु:-"muscular  पण आहे..एकदम macho ..!!
रुपी:-"काय ग;आशु ?..फिदा झालीस कि काय ..?"
आशु:-चल ग.!!.पण खरच handsome आहे.!!  I wish असा कोणी भेटेल..!!perfect !!"
मनु:- "ए;पर्फेक्ट्वाली ;पुढचा stop आपला आहे..तो handsome काय कडेवर घेऊन नाही सोडणारे  ......तुला!!..हेहेहेहेः..चला आवरा आता !!""        
रुपी:-"ए मने,मोठा शहाणपणा करतीयेस ,पहिल्यांदा तूच टक लावून बघत होतीस ना..!!i  know  .....you well मने..!!"  
आशु:-"हो ना !!ही मनु म्हणजे "मी नाही त्यातली" type असल्याचा आव आणते आणि सगळं बरोब्बर ......हळूच बघून घेत असते..मांजर आहे मांजर ..!!ए पण काही असू देत हां;बस मध्ये आल्याचा एक ......फायदा तरी झाला .!..जाता जाता का होईना डोळ्याला मजा आली..कसला sincere वाटतोय ग ......तो..त्याची बायको कसली लकी असेल ग..!!"..नाहीतर मघाशी stop वरून दिसलेला तो .....मुलगा!!..मला वाटला प्राणीच आहे तो..हेहेहेहे.!!..see  the  difference !!!...
मनु:--"कळलं हो ..चला उतरायची वेळ झाली.."!!
आशु:--"ए त्या हीरोला टाटा करूयात का..??हिहीः"
रुपी:--[अगदी हळू आवाजात ]"बाय बाय सोनू;असाच भेटत रहा "!!
आशु:--ए अग काय हे..??.हेहेहेः.[अगदी हळू आवाजात ]. anyways बाय handsome "!!

............................................बस थांबली ..तिघी उतरल्या..मी घाम पुसला!! खतरनाक कार्ट्या होत्या !!..त्या माणसाला माहित पण नसेल तीन पोरींना त्याने मजा वगैरे दिली होती !! त्या तिघींचे शब्द कानात प्राण आणून ऐकणारा मीच असल्याने बसमधल्या ईतरांना अर्थातच काही कळले नव्हते!! ..मी खिडकीतून पाहिले..खाली रस्त्यावर त्रिकूट परत काहीतरी बडबड करण्यात गुंतले होते!!..बस शेवटच्या मुक्कामाकडे निघाली ;तिघी डोळ्यासमोरून दूर झाल्या..बरेच काही ऐकवून आणि समजावून..त्यांच्याही नकळत..!!त्या कोण होत्या हे मला आज सुद्धा माहित नाही..त्या कधी भेटतील असेही वाटत नाही..त्यांबद्दल आकर्षण तेंव्हाही नव्हते आजही नाही..परंतु एक नवीन जाणीव त्या तीघीनबद्दलची मनात उगाच आहे.!!..मुलींचे मन कसे असते हे मुलींनाच कळत नसल्याने ईतरांना कळू शकत नसावे असे मात्र नक्की वाटते...!..त्या तिघी अशाच काही शिकवून गेल्या;थोडे हादरवून गेल्या;थोडा आनंद देऊन गेल्या ..मुलींबद्दल ;स्वभावाबद्दल एक प्रातिनिधिक ज्ञान देऊन गेल्या ..ईतके मात्र नक्की..!!..
............बाकी सब छोड दो !! पण त्या दिवसापासून , एक तरी मी नक्कीच शिकलो !!!.मी लगेच ,दुसर्या दिवशी स्वच्छ दाढी केली;मिशा कोरल्या..अंघोळ करून ईस्त्रीचे कपडे घालून ;बुटांना polish करून मगच घराबाहेर पडलो..!!..कारण आज पण मला त्याच बसने ;त्याच stop वरून जायचे होते..!!..कोणी जाणावे;कदाचित त्याच तिघी तिथे उभ्या असतील तर ?...आणि समजा मी नेहेमीसारखा ;म्हणजे सर्वसामान्य कपड्यांत आणि दाढी वगैरे न करता [बोकडासारखा]..जसा असतो तसा पटकन त्यांच्या  समोरून गेलो तर??..त्यांनी मला तशा स्थितीत पाहिले तर??...विचारानेच घाम फुटला मला !!.....मला चांगलीच कल्पना आहे त्या काय म्हणतील ,........तुम्हालाही असेल..!.
!!............................सांगू????.........

त्या म्हणतील किंवा त्यातली "आशु" तरी नक्की  म्हणेल..;
........."" ईईईईई ;ते बघ काय??  जंगली प्राणी!! खूपच भयंकर आहे ग!!;ए मने;तो रानडुक्कर आहे कि रानरेडा किंवा बैल आहे ग ?? ..पण मग जनावर असेल तर त्याने  कपडे का घातलेत ग ??...मला परत भास होतोय का ;हा माणूस असण्याची काही शक्यता आहे का ग ;कालच्यासारखा ??""..


आणि दुसरी कोणी म्हणेल  [माझ्या दुर्दैवानी !!]--
..""अग आशु ;कालचा तो कळकट्ट प्राणी म्हणजे  माणूसच होता ग..पण आज मात्र खरच जंगली प्राणी दिसतोय!!..पण रानडुक्कर नाही वाटत;"रानरेडा" कदाचित असू शकेल; पण ;आय थिंक.;बहुतेक "झूल घातलेला" "सजवलेला "बैल असेल ग.. !!..अग "पोळ्या"साठी सजवला असेल ;पण मला एक कळत नाही कि, अशा  मोकाट जंगली प्राण्यांना  रस्त्यावर मुनिसिपालटीचे लोक फीरुच कसे देतात??..चांगला फटकावून पिंजर्यात कोंबा ना अशा मट्ठ बैलांना.किंवा रेडयांना..!!.हो कि नाई ग??!!   "" .......................


.........खरं सांगतो लोकहो ;मला त्या तिघींनी 'असे' काही म्हणावे अशी माझी अजिबात ..म्हणजे अजिबात ईच्छा नाहीये...(माणसाला प्राणी म्हणतात तो पण जंगली ??)..!!....त्या दिवसापासून कधीही मुंबईला जातांना मी अत्यंत स्वच्छ कपडे घालून चांगल्या अवतारात जातो; त्याला त्या तीन महामाया कारणीभूत आहेत......!!!.


.........................लेखन ------हर्षल..!! 

No comments:

Post a Comment