मी दिले सोडूनी पार देह भोगांना ;
अन सवे घेतले दुखांच्या कळपांना..
उद्रेक घेतले संगे उग्र हताश ;
ते क्षुद्र तोडले संसाराचे पाश ..!!
आसक्त सोडली विकारधारी माया ..
अनुरक्त जाहलो दुखःमुळाच्या पाया ..
ते तमात बुडते मानव पाहत गेलो;
अन निर्वाणाचे रस्ते शोधत गेलो..!!
राज्य सोडले, दिली सोडूनी कांता,
ही घोर लागता विश्व-जनांची चिंता ,
प्रेमाचे हृदयी भरून सागर फिरलो;
दुखात पोळले जीव शांतवत गेलो..!!...
संग्राम पाहिले अशांत धरणीवरती ..
अज्ञान वाहुनी समस्त मानव जगती ..
मी शोधत दैवी प्रज्ञा म्हणुनी गेलो;
मी शोधत दैवी प्रज्ञा म्हणुनी गेलो;
अन सत्य सुमंगल हृदयी तेवत गेलो..!!
पौर्णिमेस दिसला प्रकाश शुद्ध विरागी ..
पौर्णिमेस दिसला प्रकाश शुद्ध विरागी ..
अश्वत्थाखाली प्रज्ञा झाली जागी ..
म्हणतात कुणी मज बुद्ध कुणी बैरागी..!!
मी स्वतास म्हणतो केवळ मानवयोगी..!!
......................लेखन - हर्षल..!!
......................लेखन - हर्षल..!!
No comments:
Post a Comment