प्रसंग १ :--[माझी मावशी माझ्याशी बोलतेय !! ]
"देशस्थ च बघ हं; हर्षु ;"
"का ग ?"
"अरे साध्या असतात ;सासर टिकवतात..शिवाय सरळ देवभोळ्या असतात बिचार्या !! "
"अग ;मावशी कुठल्या जगात आहेस ??";आजकाल असे काही दिसत नाहीये..."!!
"ते मला माहित नाही..;तू मुलगी बघशील तर आधी देशस्थ च !!...त्या नंतर कोकणस्थ; ;आणि कऱ्हाडे आणि देवरूखे तर नकोच!! कळलं नं हर्षु ??"..
प्रसंग २:
स्थळ ;ब्राह्मण सभा
[श्री .नेने मामा माझ्याशी बोलतायत ..]
मामा:-"काय देशपांडे ;लग्न कधी करताय?
मी "अहो अजून m.tech झाल्याशिवाय नाही..!!
अरे शिक्षण काय चालूच राहील..!!..लग्न वेळच्यावेळी झालेच पाहिजे हो..!!"
"अहो मामा ; तुम्ही आज ओळखताय का मला ?? ;मला माझे हातातले काम सोडून ईकडे तिकडे लक्ष द्यायला आवडत नाही... ..!!..लग्नाचं म्हणाल तर अजून वेळ आलेली नाहीये"
"अरे कसली वेळ आलेली नाही!!???..जास्त उशीर केलास तर नंतर डोक्याला हात लावून बसशील रे बाबा "
"अहो मामा;पण मला पसंत नको का मुलगी?.."
"अरे इकडे सभेच्या वधू-वर मंडळात ये ना कधीपण ;तुला दाखवतो हजार मुली..!!..हो पण माझा ऐकशील तर कोकणस्थ च कर रे बाबा;तुमच्या त्या देशस्थ मुली म्हणजे नुसत्या गबाळ्या रे;आमच्या मुली बघ कशा छान आणि धोरणी पणे संसार करतात ..कोकणस्थ कर;!!..तुला पेंडशांची प्रीती महितोये ना.!!आताच mba केलंय!!,नाहीतर जोशांची ,ते जोशी नाहीत का,हार्मोनियम वाले;त्यांची मुग्धा ;डॉक्टर आहे लेका;आहेस कुठे?..विचारू का त्याना??..."
"अहो मामा ,त्या मुलींना आणि कमीत कमी माझ्या आई वडीलांना तरी विचारू कि नको??..हेहेहे!!.... ,तुम्ही तर मला चक्क लगेच बोहल्यावर चढवताय ,बर त्या मुलींना तरी देशस्थ चालेल का हे नको विचारायला ??,नाही ;म्हणजे अहो त्या असतील गोर्यापान ;नाजूक ..आणि आम्ही थालीपीठ कलर वाले ;उंच पुरे धिप्पाड ....अहो मामा ,फोटो काढला तर black and white वाटेल लोकांना...!!"
"अरे देशपांड्या;त्याची चिंता तुला नको रे;नेने मामांनी आजवर ५० लग्न जमव्लीयेत..!!..इंटर कास्ट !!..आहेस कुठे ?""
"इंटर कास्ट..??"
"अरे कोकणस्थ आणि देशस्थ लग्न म्हणजे इंटर-कास्टच ना.!!.हो कि नाही ??"
"अहो मामा,दोघेही; देशस्थ आणि कोकणस्थ हे ; ब्राह्मण असताना इंटर-कास्ट काय म्हणताय??....आपण सगळे एकच नाही का?..हा असला भेदभाव मला पसंत नाहीये..!!एखाद्या जातीचा स्वभाव ;काही गुण किंवा दोषांनी निर्माण झाला असेल तर त्यालाच चिकटून राहणे आणी स्वतःचे मूळ ईतिहास विसरून स्वताला जातीच्या पिंजर्यात स्वतःच्या तथाकथीत वैशीष्ट्यांसहीत बंद करून विनाकारण दुफळी माजवणे आणि भांडणे उत्पन्न करणे ह्या गोष्टींनीच आपण समस्त हिंदवी समाजाची खुलेआम कत्तल केलेली आहे..आणि जे मुळात नाहीत ते भेद निर्माण करून ठेवलेत..!!..........माझे मत तुम्हाला मी आधीसुद्धा सांगितले होते..आपण मागच्या वेळी बोललो होतो ,आठवतंय??..""
"अरे समाज सुधारका ,तू नसत्या उठाठेवी का करतोयस ?..ह्या नेने मामाचे ऐक ;छान कोकणस्थ मुलगी बघून लग्न करून टाक ;नसत्या विचारात असतोस रे देशपांडे तू.!!ऐक माझं!!."
"अहो ,कोकणस्थ किंवा देशस्थ हा वाद नको असे मला म्हणायचंय मामा !!..आणि लग्नाच म्हणाल तर साधी आणि सोज्ज्वळ ब्राह्मण मुलगी हवीये मला..जास्त अपेक्षा नाहीत!!..उगाच नखरेल आणि उर्मट नसली कि झालं..!!."
"तू काहीही म्हण ;पण लक्षात ठेव हो;कोकणस्थ मुलीच चांगल्या..!!..तुला ओळखतो चांगला म्हणून सांगतोय रे;आता आमची अर्धी लाकडं गेली मसणात ..ऐकलंस थोडं तर बिघडणार नाही !!"
"अहो मामा;इथे नं ऐकण्याचा प्रश्नच कुठेय??..मी म्हणतोय कि एकसंघ ब्राह्मण समाजात असे गलिच्छ आणि निष्कारण पेटवलेले भेदाभेद कशाला...??..मुलगी कुठलीही असू देत पण ब्राह्मण असली आणि शालीन असली म्हणजे झालं..!!.ब्राह्मण हा एक वर्ण आहे;आणि आम्ही त्याची जात बनवली ..आणि त्या नसलेल्या जातीच्या भिंती स्वताभोवती उभारून ;स्वताचे दोष आणि गुण जाती पोटजातींच्या नावावर खपवून त्याचे भांडवल करीत अजून बसलोय..!!ज्याची लाज वाटायला हवीये त्याचा अभिमान कसला धरतोय आपण??""
"अरे देशपांडे;तू कोकणस्थ मुलगी करणारेस कि नाही ते सांग..!!..उगीच बडबड करत बसू नकोस ;असे विद्वान खूप पाहिलेत मी..!!बरं,निघतोय मी आता;लग्न ठरवण्यापूर्वी नक्की भेट मला ..!!उगाच देशस्थ वगैरे मुली नको हो.!!चल येतो मी;मीटिंग आहे थोड्या वेळाने...अच्छा!! "..
..........मी नुसताच हात हलवून टाटा केला ..!!
प्रसंग ३.--
स्थळ :देशस्थ ब्राह्मण संघ कार्यालय
वेळ: दुपार ४ ची
[कार्यवाह श्री.कुलकर्णी आणि मी बोलतोय ]
"अरे देशपांडे ;ऐकून तर घेशील "
"त्याचा उपयोग नाही ;काका "
"अरे पण,सध्या लहान सभा आपल्यापुर्तीच ठेवली तर काय बिघडले??"
"मला ते जमणार नाही काका ;मी जे सांगितले त्यामागे फार व्यापक विचार होता..आणि तुम्ही सहमत सुद्धा होतात त्यावेळी..शिवाय जर चित्पावन सभेनी सांगितले कि जमणार नाही तर तो त्यांचा नाठाळपणा किंवा संकुचितपणा म्हणता येईल...परंतु अगोदर तुम्ही त्यांना कळवा तरी..!!..आपले पत्र पोहोचले का तिकडे ??..आपल्याकडून आमंत्रण गेले का त्यांना?.गेलेले तर दिसत नाहीये .!!.किमान सुरुवात तर करायला काय हरकत आहे?..कुणालातरी एक पाउल पुढे आणावेच लागेल..आणि आपण ती सुरुवात करायचीये ..!!माझा निर्णय मी बदलणार नाही..!!
"अरे हर्षल;इतके सोपे नाहीये ते ...तू म्हणतोस तसे देशस्थ आणि कोकणस्थ सभेचे एकत्र संमेलन घेणे..!!"
"अवघड काय आहे काका ,त्यात?,हे दोन समाज वेगवेगळे दिसत असले तरी ब्राह्मण सभेत सगळे एकत्र असतातच लग्न किंवा ईतर कार्यक्रमांसाठी ;तिथे लग्न -मुंजीचे बुकिंग करताना स्वताला फक्त "ब्राह्मण" म्हणवतात ;देशस्थ किंवा कोकणस्थ असे समजत नाहीत ...वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांना एकत्रच नकळत का होईना पण हजेरी लावतात ...!!तेंव्हा काही बिघडत नाही ;आणि मग आताच अगदी हा चित्पावन आणि हा देशस्थ वगैरे भेद कसले.??..आणि देशस्थानतर्फे आमंत्रण गेले तर येतील सुद्धा त्या संघातले काही लोक..!!..मी आधीच अनेक स्पष्टीकरणे देऊन तुम्हाला सांगितले होते कि यावेळी आपली वार्षिक सभा देशस्थ आणि कोकणस्थ अशी एकत्र होऊ द्यात..कोकणस्थ ब्राह्मण संघाला निमंत्रण पाठवा...भले त्यांना विचित्र वाटेल ..पण पाठवा..!!..मला एकत्र हवेत हे दोन्ही समाज आणि ईतर ब्राह्मण सुद्धा अर्थात ..!!.पण विशेष विनाकारण कटुता असलेले हे दोन समाज यंदा एका व्यासपीठावरून मला दिसायला हवेत !.."
"अरे बाबा ;पण सगळ्यांना ही कल्पना अव्यावहारिक वाटते ;ते जरा चेष्टाच करतायेत !..आणि शिवाय ईतके मोठे संमेलन manage कसे आणि कोण करणार;हा देखील प्रश्न आहेच.."
"काका;मला दहा दिवस सुद्धा लागणार नाहीत सगळे करायला मी करून देतो व्यवस्था !!..पण हे असे भित्रट उद्गार ;असे कूपमंडूक विचार ते कसे दूर करू मी?..ठरवलं तर वाट्टेल ते जमते ..!!पण माझ्याच माणसानमधला हा बोथटपणा आणि आत्मघातकी संकोच कसा घालवू हे मला समजत नाहीये..!!पाय मागे लावून पळणारे डरपोक मला सहन होत नाहीत .!मी मागल्या वेळी सगळे खुलासेवार सांगून देखील काहीही फरक पडत नाहीये हे बघून त्रास होतो..!!..मी वार्षिक सभेला येणार नाही..माझे पहिले वाहिले भाषण रद्द करून टाका..सूत्र संचालक होण्यात मला रस नाही.."
"अरे;एकदम टोकाला काय जातोयस तू?,मला सांग तुला भाषण करायला तरी काय हरकत आहे..चांगला बोलतोस तू..भारदस्त !!..म्हणून मुद्दाम दिलाय न तुला चान्स !!..तूच म्हणाला होतास ना तुला बोलायचय म्हणून!!.."
"हो मी म्हणालो होतो,पण कुठल्या कारणासाठी??..तर ब्राह्मण समाजातले वेगवेगळे प्रवाह जेंव्हा आपण वार्षिक सभेच्या निमित्ताने एकत्र आणू तेंव्हा त्यांसमोर मला अनेकानेक गोष्टी मुक्तपणे व्यक्त करायच्या होत्या ;त्यासाठी भाषण हवे होते मला !! पण आता एकत्र संमेलन होणार नसेल किंवा आपणच पावले पुढे टाकत नसू तर मला रस उरलेला नाही त्यात..जुन्या डबक्यात पोहण्याचा आता कंटाळा आलाय !!..आपलीच हानी आपणास दिसत नसेल तर काय उपयोग??..जाऊ द्यात !!..मी सभेला येणार नाही जर आधी ठरल्याप्रमाणे काही होत नसेल तर!!..पण तुम्हाला काही मदत लागली तर नक्की सांगा ..मदत वाट्टेल तेंव्हा करेन!!:
"अरे हर्षल ;ऐक ना ;आपण बघू रे तू एकदम काही ठरवू नकोस..!!
"काका ;बघू ;करू हे शब्द मला नकोत आता ...काही प्रत्यक्ष घडलं तर कळवा...!!..थोडं कमी अधिक बोललो असेन तर क्षमा करा पण मला ही कर्तव्यमूढता आता सहन होत नाही ...तुमच्यावर आणि आपल्या लोकांवर राग नाही माझा;पण महत्वाचे कार्य अडून राहिले कि मनस्ताप होतो ..म्हणून !!...ठीकाय निघतो मी..!!"
प्रसंग ४ :---
स्थळ :डोंबिवली
वार्षिक वसंतोत्सव कार्यक्रम ..टिळकनगर विद्यामंदिर !!
प्रेक्षकांमध्ये मी बसलोय आणि ऐकतोय..
१] कोकणस्थ संवाद:-
"संदीप खरे मस्त आहे ना?.काय लिहितोय !!..शेवटी पुण्याचा चित्पावन हो आपला.काय वाहिनी?"
"हो न ;सलील सुद्धा छान गातो "
"एखादा अपवाद असतोच देशस्थांमध्ये तसाच सलील कुलकर्णी असेल"
"खरय ;सगळीकडे आपली मुले पुढे आहेत आजकाल "
"मग;आहोतच आपण तसे "
२]देशस्थ संवाद :-
"सलील कुलकर्णी .म्हणजे देशस्थ ;नाहीतर दुसरा कोण असणार?,..त्याच्यामुळेच खरी रंगत .गायनामुळे !!"
"अहो पण बाकीचे सगळे कार्यक्रमातले पाहिलेत का?..चित्पावन दिसतायेत ;आयोजकांपासून सगळे ..सगळीकडे पुढे पुढे असतात हे कोकणस्थ "
"खरय ,पण मेहनती देखील आहेत;चांगली कामे करतायेत "
"हो म्हणे चांगली !!;आप्ल्याईत्के हुशार नसून देखील फक्त पुढे पुढे करण्यामुळे चमकतात ;अन आपली पोरे मागेच !!"
मी माझी जागा बदलली ...तिकडे पुन्हा कान असेच काही ऐकू लागले ;मग मी रांग बदलून अगदी मागे जाऊन बसलो ..थोड्या वेळाने कार्यक्रम सुरु झाला ;गाणी वगैरे ऐकताना मघाशी "देशस्थ कि कोकणस्थ" ही बडबड करणारे छान मान डुलवत गाणी ऐकत होते ..मी स्वताशीच हसलो...!!...देवाचे आभार मानले !!..म्हंटले या गाण्याने जसे यांचे उथळ बोलणे जसे तात्पुरते का होईना बंद पाडलेस तसे कायमचे हे द्वैत ;हे द्वेष मिटवण्यासाठी तुझे नाम गायन करण्याची बुद्धी दे रे देवा!!...कारण देशस्थ कि कोकणस्थ या वादात आता विनोद शोधायचे दिवस गेलेत..सगळे ब्राह्मण एकसंघ कर रे देवा!!............

...................................लेखन:-हर्षल
No comments:
Post a Comment