मराठी शुद्ध बोलावे असे म्हणतात ..परंतु मराठी शुद्ध बोलले तर मराठी माणसांनाच कळणार नाही ,अशी परिस्थिती आज आहे...उदाहरणादाखल काही प्रसंग देतोय !! मराठी लोकांना शुद्ध मराठी वाचताना अडचण येऊ नये ,{ कारण मराठी लोकच मराठी शब्दांचे अर्थ विचारताना दिसतात ही जबरदस्त(?) वस्तुस्थिती आहे सध्याची !!} म्हणून काही व्यावहारिक शब्द कंसात दिले आहेत आणी तेच शब्द आपण सर्रास वापरत असतो ,परंतु मूळ मराठी अगदी शुद्ध बोलले तर काय होईल यावर हा एक प्रकाश..!!!
प्रसंग १ :-- ..............संतती-नियमन .......... [ शुद्ध मराठीत]
\\\\\\\\\\ \\ दोन विद्वान बोलतायत ...
"सविनय प्रणाम ,श्रीमान तात्या ;कसे चालू आहे ?"
"उत्तम ;शास्त्रीबुवा .अतिउत्तम !!..आपण कसे आहात ?आपली प्रकृती कशी आहे आता?"
"आम्हास काय धाड भरली आहे!..आम्ही अत्यंत कुशल व आनंदमय आहोत!..आपलीच पृच्छा करावयास दस्तूर खुद्द येथे आलो.आपणास अपत्य प्राप्ती झाल्याचे वर्तमान ऐकले आणी थेट गृह निर्गमन केले [घर सोडले]..कसे आहे आपले पाचवे अपत्य ??"
"अत्युत्तम आहे .ईश्वरेच्छा बलीयसी ,शास्त्रीबुवा !.या समयी मात्र आधीच्या चार खेपेप्रमाणे नैसर्गिक जन्म अशक्य होऊन उदर-शस्त्रक्रिया करावी लागली आमच्या सौभाग्य्वतीन्च्ची..[सीझर!].बालक उत्तम आहे व बालकाची माता देखील स्वस्थ आहे तथापि शस्त्रक्रियेचा क्षीण अद्याप आहेच.तात्पर्य आमची अर्धांगीनी अद्याप प्रसूतीगृहातच विश्रामबद्ध आहे !!"
"अरेरे ,ह्या स्त्रियांस किती दुसःह वेदनांस सामोरे जावे लागते प्रसुतीसमयी !..आम्हास तर दया येते ह्या माउलींची ..नारीच्या वेदना नारीच जाणे !..परंतु तात्या आता आपणास ही हे अवगत व्हायला हवे कि ;सांप्रत काल हा 'अष्टपुत्रा' मातांचा नसून 'एकपुत्रा' अथवा ;'द्वीपुत्रा'.मातांचा आहे.परंतु आपली कृत्ये पाहता आपण लवकरच आपल्या पत्नीस अष्टपुत्रा कराल असे भय वाटते !!"
"अहो बुवा; आम्ही काय आमच्या अर्धान्गीनीस "अष्टपुत्रा "करणार? ..आता या समयी किंचित ब्रह्म-घोटाळा घडला हे खरे ,आमचे संतती-नियमन अकस्मात संकटात आले हेच खरे !..अन्यथा चार अपत्यांननंतर पाचवे शेंडेफळ आजच्या 'अर्थ-व्ययी'[म्हणजे महागाई च्या ] परिस्थितीत संगोपीत करणे म्हणजे अत्यंत कष्टमय कार्य होय..!!
"अहो मग ईतके असून असे कृत्य घडवलेतच का ?..हा घोटाळा संतती-नियमनाचा नसून मनोनिग्रह आणि मानसिक संयम नसल्याने उत्पन्न झालेला असा जटिल घोटाळा आहे..!आपणास हे कळावयास हवे होते तात्या .!!"
"अहो विकारातून बुद्धी नष्ट होते आणि त्यातून संकटे उद्भवतात !..मनोनिग्रह कमी पडला !..ईश्वरेछा ,दुसरे काय ?"
"असो,आता झाले ते झाले ;परंतु अजून ईश्वरास अधिक ईच्छा करावयास लावू नका ..आणि अपत्यांची संख्या वाढवू नका!!..नाहीतर काही समयपश्चात अपत्यांची संख्या ,अष्टवसुनप्रमाणे आठ अथवा
नवग्रहानसारखी नऊ अथवा दशदिशानसारखी दहा अथवा एकादश रुद्रानसारखी अकरा होण्याचा ज्वलंत संभव आहे..!..मनावर ;वासनेवर संयम हवा तात्या ;अशी अपत्यांची मालिका आजकाल कोणी निर्माण करते का ??..पत्नीचा विचार करावा !!..ब्रह्मचारी रहा आता ..पुष्कळ झाली पाच बालके !!कसे संगोपन कराल इत्क्यांचे ??..पुरुषांस ठीक आहे ;निशा समयास पत्नी बरोबर प्रेम्कृत्य करताना देहानंद लाभतो;परंतु त्याचे असे अनिष्ट परिणाम होतात आणी स्त्रियांस नऊ मास एक लहान जीव पोसावं लागतो.विचार करा तात्या ;काही कालांतराने लोक चेष्टा करतील हो तुमची !म्हणतील म्हातार्यास ईतकी अपत्ये आहेत कि ,त्यासच ठाऊक नाही !! संयम बाळगा संयम ..आमच्यासारखा !!"
"नक्की शास्त्री बुवा !! संयमाचे नक्की स्मरणात ठेवेन !!..अहो पण एक विचारायचे राहूनच गेले ; आपली 'सातवी' आणी शेवटची कन्या सांप्रत काय करते आहे ??;चतुर्थ ईयत्तेमधे होती असे श्रवणात होते!.आपण देखील माझ्या वास्त्पुशीत ईतके व्यग्र झालात कि क्षणभर आपणास स्वतःच्या सात गोंडस आणी मेधावी बालकांचा देखील विसर पडावा ,होय न ? खरच आपला विवेक आणी संयम अप्रतीम आहे,आपण आपल्या पत्नीस अष्टम अपत्यासाठी सक्त विरोध केला असाल !!..म्हणून केवळ सातच अपत्ये झाली आपणास !!किती महान !!
..आपल्याला जो संयम 'सात' बालकांच्या जन्मानंतर आला तो मात्र अवर्णनीय आहे हे अगदी सत्य आहे हो .!!परंतु आपली सात बालके एकदा सपत्निक घरी घेऊन याच शास्त्रीबुवा !!..म्हणजे संयमाचे जिवंत उदाहरण प्रत्यक्ष दिसेलच आम्हास !!..आणि त्यातून काही संतती-नियमनाचा बोध ही घेता येईल !!..काय म्हणता ;होय कि नाही??"
[शास्त्रीबुवा गोरेमोरे होऊन काहीतरी कारण सांगून पलायन करतात ]
..............................................लेखन --हर्षल
No comments:
Post a Comment