!!!आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरम !सर्व देव नमस्कारान केशवं प्रती गच्छति !!
लहानपणी कधीतरी ओठांतून नुसतेच उतरून गेलेले आणी आता हृदयात शांत बसलेले हे सुंदर संस्कृत वचन.!.
मी आज लिहायला बसलोय कारण आज ईतर काहीच उमटणार नाही याची खात्री आहे.माझ्या प्रश्नाची उत्तरे मी देवाशिवाय कोणाला मागत नाही.आणी शिवाय प्रसंगच मला देवाला प्रश्न विचारायला भाग पाडत असतात .'जीव' स्वतःहून 'शिवा'ची भक्ती करत नाही.पण अतृप्ती आणी धर्मजिज्ञासा त्या जीवाला ईश्वराकडे वळवते.आणि पुढे जीवच स्वतः शिव असतो हे त्याला सत्य अर्थाने जाणवते.असो.
मी माझे आणि ईश्वराचे संकेत येथे लिहू शकत नाही.कारण मला जे ईश्वरत्व दिसले तसेच ते सर्वांना जाणवेल असे नाही.परंतु जे मला जाणवले ते माझ्यापुरते आणी माझ्या अस्तित्वासाठी सत्य असेल असे ईतरांनी समजून घेण्यास हरकत नाही.मी तेव्हढेच लिहू इच्छितो.
परमेश्वराचे नाम मी कधी प्रथम ऐकले असेन ते स्मरणात नाही.परंतु त्याने मात्र माझ्याआतून आणी बाहेरून मला बरेच सहाय्य केलेले दिसते.देव आणी त्याचे देऊळ यांकडे जाणारा मार्ग हा भक्तांच्या हृदयातून जातो हे मात्र मला बर्याच अंशी पटलेले आहे.
"भाव तिथे देव" हे अक्षरश: सत्य आहे ह्याचा साक्षात्कार होऊ शकतो हे सुद्धा मला मान्य झाले.भक्तांशीवाय देवाला आणी मनुष्याशीवाय धर्माला परीक्षक अन्य कोणी नसतो.सनातन वस्तूंना सुद्धा व्यक्त होण्यासाठी व्यक्त वस्तूंची मोजपट्टी लागते.आणि व्यक्त वस्तू ह्या अव्यक्त ईश्वराचेच सगुण अवतार आहेत ;किंबहुना व्यक्त आणि अव्यक्त हे एकत्रच असतात ह्याचे ज्ञान तद्नंतर प्राप्त होते.
आपल्याला काळाच्या विस्तीर्ण पटावर अलगद उतरवणारे आणी देह ,मन आणी ईतर वासनांचे आभास प्राप्त करून देणारे अव्यक्त तत्त्व काय असावे हे शोधण्याच्या प्रयत्नात तत्त्वद्न्यांचे जथेच्या जथे ;प्रज्ञावान ऋषीचे समुदाय आणि मुमुक्षु मानवांचे समूहच्या समूह उत्पन्न होत गेले आणि होतील सुद्धा !..परंतु ईश्वरत्व ही अत्यंत आत्मकेंद्रित आणी व्यक्तीसापेक्ष जाणीव आहे.आणि म्हणून लक्षावधी संत जरी जन्माला येऊन उपदेश करून गेले तरी परमेश्वर ज्याला समजायचा त्यालाच समजतो !....
"भाव तिथे देव" हे अक्षरश: सत्य आहे ह्याचा साक्षात्कार होऊ शकतो हे सुद्धा मला मान्य झाले.भक्तांशीवाय देवाला आणी मनुष्याशीवाय धर्माला परीक्षक अन्य कोणी नसतो.सनातन वस्तूंना सुद्धा व्यक्त होण्यासाठी व्यक्त वस्तूंची मोजपट्टी लागते.आणि व्यक्त वस्तू ह्या अव्यक्त ईश्वराचेच सगुण अवतार आहेत ;किंबहुना व्यक्त आणि अव्यक्त हे एकत्रच असतात ह्याचे ज्ञान तद्नंतर प्राप्त होते.
आपल्याला काळाच्या विस्तीर्ण पटावर अलगद उतरवणारे आणी देह ,मन आणी ईतर वासनांचे आभास प्राप्त करून देणारे अव्यक्त तत्त्व काय असावे हे शोधण्याच्या प्रयत्नात तत्त्वद्न्यांचे जथेच्या जथे ;प्रज्ञावान ऋषीचे समुदाय आणि मुमुक्षु मानवांचे समूहच्या समूह उत्पन्न होत गेले आणि होतील सुद्धा !..परंतु ईश्वरत्व ही अत्यंत आत्मकेंद्रित आणी व्यक्तीसापेक्ष जाणीव आहे.आणि म्हणून लक्षावधी संत जरी जन्माला येऊन उपदेश करून गेले तरी परमेश्वर ज्याला समजायचा त्यालाच समजतो !....
समर्थांनी त्यांच्या चाफळ मंदिराच्या उत्सव गीतात अंतिम चरणात सांगीतलय .
"दास डोंगरी रहातो ! यात्रा देवाची पहातो !
"देव भक्तासवे जातो ! ध्यानरुपे !"
"देव भक्तासवे जातो ,,ध्यानरुपे !!"...हे वाक्य माझ्या "मर्मबंधातली ठेव "आहे .!! मनात अथांग प्रेम भरून येते त्या उदात्त कल्पनेबद्दल !!..
देव आणि भक्त हे , ईश्वर आणि मानव किंवा पूज्य आणि पूजक अशा बाह्य द्वैत संबंधांवर संपून जाणारे प्रकार नव्हेत ..ते अखंड चालू असतात किंवा असे म्हणूयात कि ,जर ते अखंड एकमेकांशी संलग्न असतील तरच ती "खरी भक्ती "!.आणि फक्त असेच भक्त ,एकनाथ महाराजांसारखे म्हणू शकतात "..भक्तांचिया चिंता क्षण एक न साहवे ,भगवंता!" किंवा "बहुत सुकृताची जोडी ;तेणे विठ्ठली आवडी "!असे मनापासून सांगण्याचा अधिकार अशा भक्तांनाच आहे.!
देवाचे उपकार थोर असतात ..आणि त्याचे उपकार नक्की आहेत कसे हे उमगणे त्याहून थोर असते.
आणि नवविधा भक्तीन्पैकी ईश्वराचे "नामचिंतन" करणारी भक्ती सध्या कलि-काळात उत्तम आणि सर्वश्रेष्ठ असे अत्यंत थोर योग्यांच्या आणि अवतारी महात्म्यांच्या आशीर्वचनावर आणि स्वानुभवावर विसंबून मी आयुष्य जगतोय! हे ईतके तरी मला उमगले हेच माझे भाग्य असेल कदाचित !किंवा ईश्वराची कृपा असेल !
परंतु मुळात देव कसा असतो आणि त्याचे अस्तित्व असते कि नसते ह्या विषयावर अफाट आणि अथांग ग्रंथसंपदा विश्वात निर्माण झालेली आहे. तत्त्वज्ञान आहे ;धर्मवाद आहेत ;शास्त्रे आहेत;विचारग्रंथ आहेत;मोठ-मोठी चर्चा-सत्रे आहेत;अजस्त्र असणारे आणि आश्चर्यमुग्ध करणारे इतिहास ,संस्कृती आहेत .अपरंपार माहिती पसरलेली आहे सर्वत्र!..हे सगळे ज्ञान स्त्रोत बुद्धीगम्य असतील व नसतील सुद्धा !!..आपण सगळेच जगताना; आपणही ह्या कालप्रवाहातच असल्याने या सगळ्या गोष्टींचे भान ठेवत आणी जमेल तितके समजावून घेत मार्ग क्रमित असतो..आणि ज्ञान किंवा विविध शास्त्रांची माहिती म्हणूयात ,ती घेण्यातच स्वतःची प्रगती मानतो ;अहंकार पोसतो;आणि एके दिवशी स्वतचे सारे पसारे सांडून अकस्मात निघून जातो..आपल्यामागे आपलेच आपल्यासारखेच वंश जिवंत ठेवून !!
आणि आश्चर्य म्हणजे आपण मरणार आहोत हे आपल्याला कधीच खरे वाटत नसते .ईतरांना मृत्युपंथास जाताना आपण पाहतो परंतु त्यावेळी आपण जिवंत असल्याने मृत्यूची कल्पना आपल्या मनाला स्पर्श करत नाही !.
हे आपले भ्रमात्मक पण आपल्यासाठी खरेखुरे असलेले "मानसिक अमरत्व"आपल्याला दुखान्पासून दूर ठेवते परंतु त्याच बरोबर एक शाप सुद्धा देते ,तो म्हणजे सत्याकडे पाठ फिरवून मोहाच्या खोल गर्तेत कायम चालत जाण्याचा.!!
हे आपले भ्रमात्मक पण आपल्यासाठी खरेखुरे असलेले "मानसिक अमरत्व"आपल्याला दुखान्पासून दूर ठेवते परंतु त्याच बरोबर एक शाप सुद्धा देते ,तो म्हणजे सत्याकडे पाठ फिरवून मोहाच्या खोल गर्तेत कायम चालत जाण्याचा.!!
"मरे एक त्याचा दुजा शोक वाहे !अकस्मात तोही पुढे जात आहे "
ईतके जरी एखाद्यास समजेल तरी तो किमान भानावर तरी येईल!!..अन्यथा रावणासारखे आपलेसुद्धा होतेच आहे ...
"मना सांग बा,रावणा काय झाले
अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले !"
समजले पाहिजे !!...आणि "समजणेच "सगळ्यात अवघड आहे.!!
मला ईश्वरानेच घडवले असेल;किंवा काळाने प्रत्येक कर्म प्राक्तनानुसार मजकडून घडवले असेल;किंवा मी जे काही चांगले अथवा वाईट ;काळात अथवा नकळत वागलो असेन ते माझ्या स्व-मतीनुसार आणि सभोवतालच्या प्रसंगान्सापेक्ष वागलो असेन;किंवा निसर्ग नियमाप्रमाणे मी जगात येऊन जगत राहिलो असेन ;अथवा शारीरिक क्रियांचा किंवा मानसिक [मेंदूच्या म्हणा हवे तर !]क्रियांचा परिपाक म्हणजे
माझे जीवन असेल .......काहीही असो.!!
..किमान आजवर किंवा आत्ता तरी जितके मला समजले त्यावरून मी एक निश्चित सत्य मानतो कि ,ईश्वराने मला तारून नेले व प्रत्यही नेत आहे.
मी देवाला सांगितले कि त्याला ऐकू जाते अशी जोवर श्रद्धा माझी राहील तोवर तो ऐकतो ह्यावरचा माझा विश्वास सुद्धा अभंग असेल!!..तो कसा ऐकतो आणि कसा कार्य करतो ह्यावर तत्त्वज्ञांची मते अनेक असतील ;काही मी देखील समजून घेण्याचा प्रयत्न केला ;परंतु ईश्वराचे अस्तित्व समजण्यापेक्षा त्याची कृपा अनुभवण्याचा स्वार्थ माझ्यात अधिक आहे असे आजवर तरी मला जाणवले!.
.माझी परमेश्वराला परमेश्वर मानण्याची उर्मी आणि श्रद्धा जोपर्यंत सात्विकपणे जिवंत राहील आणि जोपर्यंत ईश्वराला मी ;त्याला न ओळखता सुद्द्धा भक्तीभावाने पाहात राहीन तोपर्यंत तरी चिंतेचे कारण काहीही दिसत नाहीये !!
शेवटी "देव भक्तासवे जातो...ध्यानरुपे ",,हेच खरे !!..ईश्वर माझ्या अगदी संनिध ;अगदी जवळ आहे आणी माझे ऐकतो आहे ह्यापेक्षा मोठे सुख मला काय वाटावे!!..माझ्या अज्ञानी मनाला जोडलेला देवाच्या अस्तित्वाचा हा भक्तीमय शुद्ध दुवा मला प्रत्यक्ष देवाशी बद्ध करत असतो हेच माझे पुण्य असेल !!
मला ईश्वराची व्याख्या करता येत नाही ;परंतु ईतके तरी नक्कीच सांगता येते --
""जो अगम्य असूनही भक्तीरूपाने भक्तांच्या हृदयात आणि त्यांच्या आयुष्यात सर्वत्र साक्षित्वाने भरून राहिलेला असतो तो म्हणजे परमेश्वर !!""
स्वतः भगवंत सांगून गेलेत नारदास .." मद्भक्ता: यत्र गायन्ति तत्र तिष्ठामी नारद !!" म्हणजे 'हे नारदा ,जेथे माझे भक्त मला आळवतात तेथेच माझा निवास असतो "..!!
एकच सांगावेसे वाटते कि ;देवाला आपण माणसे कशी आहोत हे चांगलेच आणि संपूर्णतः ठाउक असते ;परंतु आपल्यालाच ईश्वर ठाऊक नसतो ;आणि त्याला भक्तीने आणि ज्ञानाने समजून घेणे ह्यासाठी आपला सगळा प्रपंच आणि खटाटोप हवा !!...थोडक्यात काय सगळे उपभोगुन जगावे परंतु सतत परमेश्वराला साक्ष ठेवून ;त्याकडे पाहत !!....देवाकडे पाठ करून जगलो कि नुसता स्वार्थ पसरलेला दिसेल आणि देवाकडे तोंड करून जगलो कि परमार्थ हाच स्वार्थ होईल !!
आमच्या सद्गुरू श्री.गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनात एक फार सुंदर उपमा त्यांनी दिलीये ..
ते म्हणतात "परमेश्वराचे अनुसंधान [म्हणजे सतत चिंतन आणि साधना ] प्रपंचात कसे असावे तर एखाद्या शालीन;कुलवती स्त्री सारखे !!..ज्याप्रमाणे ती स्त्री अनेक कामांमध्ये कधीही आणि कितीही व्यस्त असली तरी तिचे तिच्या पदराकडे जसे नकळत पण सदैव लक्ष असते . अगदी तसेच आपण कुठल्याही कर्मात असलो तरी आपले भगवंताच्या नामाकडे सतत जागृत लक्ष असायला हवे.!"
अजून काय सांगू ??....
"संताची उच्छीष्ठे बोलीतो उत्तरे ;काय म्या पामरे बोलावे !"
.................................लेखनसीमा...............
-------------------------------------------लेखन - हर्षल !!
No comments:
Post a Comment