Thursday, November 17, 2011

आजचे ब्राह्मण -[अंतिम भाग ]-- माझा दृष्टीकोन


"Hey दादा; हे वाच मस्त लिहिलंय सुधीर गाडगीळ काकांनी "
माझ्या हातात एक लेख टेकवून मंदार दाते [second year B.E ] म्हणाला ..

"वाच ;जरा ;कसे असतो आम्ही चित्पावन ते कळेल म्हणजे "
हसत हसत तो लेख मला देऊन मंदार कट्ट्यावर बसला .

'मोजून मापून कोकणस्थ ' हा श्री.सुधीर गाडगीळ [पत्रकार ]यांचा लेख आधी वाचलेला होता...[ १९९९ च्या दिवाळी अंकात आला होता तो ].....डोक्यात फिट्ट होते सगळे शब्द त्यातले !! परत वाचायची अजिबात इच्छा नव्हती ...

असे लेख आता वाचून हसावे कि संतापावे तेच कळत नाही.मंदार कडे तो कागद फेकत मी म्हणालो ..""जरा काही चांगलं असेल तर दे वाचायला .. लहान मुलांच्या गोष्टी आणि पुचाट साहित्य मी आता वाचत  नाही  !!..काही अर्थवाही असेल तर दे..!!""



"ओ देशपांडे सर जी ;यार मस्त आहे हा लेख !!जुना आहे पण कात्रण म्हणून ठेवलाय मी.गांगल काकांना द्यायला आणला होता .सही लिहिलंय यार !"


"मंदार ;लेख कशाबद्दल आहे ?"


"चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण समाजावर आहे यार !!"


"एक काम कर मंदार ;त्यातला ब्राह्मण शब्द काढून टाक ;मग तो लेख चांगला आहे !!"


"म्हणजे?"


"त्या लेखात लिहिलेले वर्णन स्वभावाचे आहे..ब्राह्मण धर्माचे नाही ..आणि जातीचे स्वभाव म्हणजे ब्राह्मणत्व नव्हे..!!..स्वभाव म्हणजे ब्राह्मण पणा असे काहीतरी महामूर्ख समीकरण मी नुसते ऐकले तरी संताप चढतो मला!! "


"अरे एव्हढे भडकायला काय झाले .चांगलंच लिहिलंय त्यात !!"


"लिखाणाबद्दल आक्षेप नाहीये माझा .साहित्यिक अंगाने आणि विनोदी म्हणून फक्त जर लेख वाचला तर चांगला आहे !!परंतु स्वतःचे गुण किंवा दोष म्हणजे अमुक अमुक 'ब्राह्मण'असा शिक्का मारणे म्हणजे महान अपमान आहे ब्राह्मण ज्ञातीचा !!..ब्राह्मण लोकांनाच ब्राह्मणत्व समजत नाहीये असा सरळ अर्थ निघतो त्यातून..!!"


"यार दादा ;तू जाम सिरीयस होतोयस विनाकारण ;चल मी निघतो उद्या भेटूयात ..आणि बाकी मरू देत सगळे माझी mechanics ची आणि SOM ची केटी सोडव बाबा !!..उद्या सकाळी येतोय मी ..दोन लास्ट चाप्टर शिकव यार !..हालत खराब झालीये ..येऊ ना उद्या ??.पाहिजे तर फी देतो बाबा तुला.!!सिरीयसली यार तू शिकवलेले समजते ..येऊ ना उद्या !!

"ये रे ;आणि फी कसली रे दीड शहाण्या ??तुला एव्हढे शिकवलंय  मी कि, फी भरायची तू ठरव्लीस ना ;तर वल्ड बँकेचे कर्ज काढावे लागेल गाढवा !!..चल भेटूयात !!बाय "

हसत हसत मंदार साहेब घरी गेले..आणि मी कट्ट्यावर बसून असाच विचारात बुडालो...

देशस्थ ;कोकणस्थ ;कर्हाडे ही नावे ऐकून अगदी लहानपणी गम्मत वाटायची...विनोद करायची हुक्की यायची...देशस्थ अमुक असतात ;कोकणस्थ तमुक असतात असे वाचायला आणि फुकटच्या गप्पा मारायला बरे वाटायचे..!!


पण दैवयोग बलवत्तर ठरले..आणि खरोखर काही विद्वान लोक आणि त्यांचे लेखन वाचून डोळे उघडले..!!..सेतुमाधवराव पगडी एक थोर ईतिहासकार [आमचे नाते होते त्यांच्याशी हे मला फार नंतर कळले]
;द.वा.पोतदार;आचार्य अत्रे;बापट शास्त्री ;विश्वासराव देशपांडे ;पु.ना ओक ;लोकमान्य टिळक ;स्वातंत्र्यवीर सावरकर ;राजारामशास्त्री ;व.दा.भट;मोरोपंत ;अभ्यंकर शास्त्री ;पांडुरंगशास्त्री आठवले;दांडेकर मामा;ईतिहासाचार्य  राजवाडे ..आणि शिवाय अनेकानेक संतांचे साहित्य मी वयाची विशी गाठायच्या आतच वाचून काढले होते....
वरती जी नावे दिलीयेत ती वानगीदाखल !!


आता एक संत साहित्य सोडले तर लेखकाची स्वताची अस्मिता लिखाणात दिसते..तसाच देशस्थ किंवा कोकणस्थ लेखकाचा अभिमान डोकावतो हे मला मान्य आहे...परंतु कुठली गोष्ट व्यक्तिगत ठेवावी आणि कुठली गोष्ट प्रचारित करावी हे लेखकाची विवेकशक्तीच नियंत्रित करू शकते..!!....अत्यंत विद्वान लोकांनी ब्राह्मण जातीतील प्रादेशिक स्वभाव वैशिष्ठ्ये स्पष्ट करण्यासाठी हलकीशी जातीय टीका करणे मी समजू शकतो..परंतु सबंध ब्राह्मण समाज ब्राह्मणत्व विसरून फक्त अडाणीपणे जातीपातीवर गरळ ओकत एकमेकांवर टीका करताना;किंवा स्वतःचे स्वभावजन्य गुण- दोष "ब्राह्मण" या नावाखाली खुशाल दडपताना दिसला कि ;माझे रक्त तापून उठते !!


समर्थांनी [रामदास स्वामी] ब्राह्मण भ्रष्ट झाल्याचे नमूद केले आहे ;ते आम्ही विसरलो;

जुनाट पोथ्यांचे नवीन दृष्टीने अभ्यास करून धर्माधीष्ठीत अर्थ लावायला आम्ही विसरलो;

वेद ;पुराणे;ईतिहास ;विज्ञान यांचा ध्यास घेऊन अध्ययन आणि अध्यापन करायचे आम्ही विसरलो;

'ब्राह्मण आणि ब्राम्हणत्व' नक्की काय आहे हे आम्ही विसरलो;

मंत्रांचे उच्चार करून धार्मिक विधी 'उरकणे'आणि भट भिक्षुकी ला लाजीरवाण्या स्तरावर पोहचवणे आम्ही नवीनच शिकलो;

आम्ही संस्कार आणि शुद्धता विसरलो;

आम्ही निस्वार्थी  आणि त्यागी वृत्ती विसरलो;

आम्ही दयाळूपणा आणि धर्म विसरलो;

आम्ही ढोंगीपणाचा त्याग करायला विसरलो ;

आम्ही फक्त संतांच्या रचना गाण्यापुर्त्या आणि भाषणे ठोकण्यापुरत्या  शिकलो पण त्यांचे आध्यात्मिक महान संदेश आमच्याच हृदयात ओतायला विसरलो;

आम्ही ब्राह्मण म्हणून स्वताचा खरा ईतिहास बघायला ;स्वताची कर्मे तपासून बघायला आणी स्वतःमध्ये विवेक बाणवून घ्यायला विसरलो ;

आम्ही स्वतःची प्रादेशिक जातीय वैशिष्ठ्ये नको तेवढी कुरवाळायला शिकलो;

आम्ही स्वतःला एकात्मतेच्या ;बंधूतेच्या भावनेने बघायला पार म्हणजे पार विसरलो;

आम्ही; स्वताचे खोटारडे अहंकार ;क्षुद्र स्वार्थ ; जातीय विशेषत्वाची अत्यंत हीन लक्तरे आणी लहान सहान रूढी किंवा परंपरा यांच्या जाळ्यात अडकून स्वताचे संकुचित आणी महामूर्ख स्वरूप निर्माण करण्यात यशस्वी झालो आणि स्वताची खरी आणि शुद्ध कर्तव्ये निर्लज्जपणे विसरलो...

आम्ही;ब्राह्मण म्हणून नुसते जन्माला आलो पण "ब्राह्मण "व्हायलाच संपूर्णपणे विसरलो...
आम्ही फक्त भाषा;जाती आणि परंपरा यांनाच ब्राह्मणत्व मानत गेलो आणि याचमुळे स्वताचा आणि पर्यायाने समाजाचा सत्यानाश झालाय हेच विसरून गेलो...!!!

आम्ही ,फक्त पुण्याईवर जन्म घेतले 'ब्राह्मण' म्हणून; पण तीच पुण्याई योग्यपणे वापरायला विसरलो ;

आम्ही एकत्र यायला विसरलो आणि स्वतःचे स्वार्थ सोडून ;सुखाची  आणि भोगांची लालसा सोडून परमार्थ साधायला ;कर्तव्ये करायला विसरलो .;


किती लिहावे आणि किती नाही!!......अंतच नाहीये त्याला !!
नुसता महाराष्ट्रातीलच नव्हे तर अखंड आर्यावर्तातला ब्राह्मण समाज केवळ कर्माने "ब्राह्मण"म्हणून ओळखला जाईल तेंव्हाच तो सुदिन ठरेल..!!...बाकी वर्णांना सुद्धा असेच एकत्र केले पाहिजे..!!


जो ज्ञानी असतो;निस्वार्थ आणि अनासक्त राहतो;
उप्भोगांमध्ये राहूनदेखील सत्यशील आणी विवेकी राहतो ;
अहंकाराचा जो त्याग करतो;
क्षमा आणी धर्म हे ज्याचे भूषण असते ;
ज्ञान हेच ज्याचे जीवित साधन असते ;
ज्याचे शब्द म्हणजे प्रत्यक्ष सत्याचे दुसरे रूप ठरतात;आणी ज्याचे सामर्थ्य संयमात असते .........तोच खरा ब्राह्मण !!


बाकी आपण सगळे स्वताला "ब्राह्मण" समजणारे आजकालचे लोक म्हणजे नुसतेच 'नावाचे 'ब्राह्मण!!..
"जन्मा येऊन जननी ,वायाची कष्टविली "..या प्रकारात मोडणारे !!

..आणि तसेही नुसत्या 'नावापुरत्या'च ब्राह्मण असलेल्यांनी स्वतःला "देशस्थ" म्हंटले काय किंवा "चित्पावन "नाहीतर कर्हाडे किंवा अजून काही नावे देऊन आयुष्यभर मिरवले काय ;....त्याने कसलाही  काडीमात्र फरक पडत नाही...!


एकच सांगतो ..
""जशी उत्कर्षाला मर्यादा नसते तशीच अधःपाताला सुद्धा सीमा नसते ""
 उत्कर्ष करायचा कि अधःपाताची खोल दरी उतरायची हे ज्याला त्याला समजावे हीच ईश्वरा-चरणी प्रार्थना !!

-----------------लेखनसीमा-----------------------!!


==================================लेखन--हर्षल==========







3 comments:

  1. exceptional writing.!!..u r awesome !!

    ReplyDelete
  2. thanks ..it will be better to introduce urself...but as u wish !!
    anyways thanks fr comment !!

    ReplyDelete
  3. gr8 harshal. hich goshta amache lok visartat. amhala shatruchi garaj nahi, amachya dhongi ani bashkal samjuti, khote abhiman hech shatru mhanun jasta ghatak ahet.

    ReplyDelete