दुखाचे पूर उतरले काळजात एकाएकी..
हतबुद्ध लोचनांमाजी आसवे जाहली जागी ..!!
कळते कोणास कधी का नियतीची अवघड चाल..
जगताना म्हणुनी होती अश्राप मनाचे हाल ...!!
आधार एकटा कोणी जाता निघून वेगाने ...
शोधती मनाचे पक्षी ती स्वप्नांतील उद्याने ...!!
अंधार पसरता भवती ;एकांत घोर सजताना ...
उन्माद कसा रोखावा ;आयुष्य व्यर्थ जळताना ?
......................लेखन -- हर्षल.........
No comments:
Post a Comment