![]() |
माझी डायरी [रचना] |
...जिच्यावर मी मनापासून प्रेम करतो आणि जिने आजवर माझ्याकडून एका लेखणी-शिवाय कसलीही अपेक्षा ठेवली नाही....
जिच्याकडून आनंदाशिवाय आणि समाधानाशिवाय अन्य काही मिळवण्याची अपेक्षा मी ठेवली नाही......
मला माझेच विचार ; स्वताच्या शुभ्र अंगावर जीने लिहू दिले....
मला आयुष्याच्या आजवरच्या प्रवासात सुख-दुःखाच्या सगळ्या क्षणी जिची आठवण आणी साथ सतत राहिली .....
स्वतः जीर्ण होऊन सुद्धा माझे मानसिक जीवन जिने नेहेमी टवटवीत ठेवले ..
जिच्या प्रत्येक अंगावर माझा एकेक काळ;एकेक क्षण रुजलाय
;माझी एकेक स्मृती आनंदाने अजून तिच्यामध्ये खेळतेय ..
मला आठवणार देखील नाही असा मीच जगलेला जुना काळ मला परत पहायचा असला कि जिच्याशिवाय मला कोणाचीही आठवण होत नाही....
जी मला वेळोवेळी माझेच बदलते स्वरूप दाखवते ..माझ्या मनाचे आणी उन्नतीचे बदललेले स्तर ;माझ्या त्या-त्या वेळच्या विचारांचे जिवंत रूप ;जी मला हसतमुखाने दाखवून देते.....
माझ्यातल्या "मला" व्यक्त करण्यासाठी "जिने" मला असीम बळ
दिले ..आणी माझे राग;लोभ;द्वेष;आनंद;प्रेम;समाधान सगळे सगळे विनातक्रार स्वीकारले ...नुसते स्वीकारलेच नाही तर जपून ठेवले..अगदी मायेने ..!!
त्या आजसुद्धा माझ्याबरोबर असलेल्या माझ्या लेखन-वहीस "डायरीस"....ही स्नेहांजली !!
----------------------------लेखन -- हर्षल..
No comments:
Post a Comment