Tuesday, November 15, 2011

मी आणि landline फोन ....!!

संवाद क्र.१.....

वेळ:सकाळी ९ ची  २०१० डिसेंबर   
प्रसंग:मी आवरून चहा घेत बसलोय ..लेक्चर ला निघायची वेळ झालीये ..इतक्यात ..
आमच्या घरचा landline जोरदार वाजतो ..!!...

[पलीकडून ].."हेल्लो ;हेल्लो; हेल्लो "

"ऐकतोय मी .बोला कोण हवंय? "

"ओळखलं नाहीस का माझ्या राज्जा!!..मी बोलतेय!!"

""मी" कोण ??..नाव असेल न काहीतरी !"

"ए अस काय रे करतोस सोनुल्या !!..उगाच नाटक नको हं गोन्डूल्या"!

"ओ बाई ,कोण हवंय तुम्हाला ??काय चावटपणा चाललाय ?"

"ईई बाई काय रे म्हणतोस जानू !..कसला चावटपणा रे ?..आणि तू काय ओळखत नाहीस माझा आवाज ??..माज्जा गोग्गोड सोन्या !! "

"कसला सोन्या ?..कोण जानू ?..कोण बोलताय आपण?"

"असा रे कसा तू ;रोज झाडाखाली भेटतोस न मला !!..स्वीटू!!"

"चायला ;कोण स्वीटू ?..तू कोण बोलतेस ते सांग..कसलं झाड ?..आमच्या घराजवळ झाड नाहीये ..गवत आहे फक्त गवत..ते पण दुर्वा असतात न तेव्हढ्या उंचीचे !!..मला झाडाखाली कोणालाच कधीच भेटल्याचे आठवत नाहीये..!!"

"अं ..काय रे !!असा का त्रास देतोयस मला?.मला छळू नकोस न रे ..आय लव यु ना माय डार्लिंग !!"

"ए बये ;कोण डार्लिंग ?..कोण पाहिजे तुला ;रॉंग नंबर लागलाय तुझा !!..तुझा जानू का स्वीटू कोण असेल तो मी नव्हे!!..अजून पर्यंत मी कोणाचाच "स्वीटू" झालेलो नाहीये .चल फोन ठेव.!!"

"ए शानपत्ती नको हं सोन्या !!..तूच हवायस मला डियर !!..ओळख ना मला ..चीन्गुल्या !!"

"अग बाई ,कसला चीन्गुल्या ??काय वाट्टेल ती नावे का देतीयेस मला??...मी ओळखत नाही तुला..तुझा नाव तरी सांग मूर्ख मुली !!"

"असा रे काय करतोस ?..नको ना वागूस असा !!आपण लग्न करायची शप्पथ घेतलीये ना..पिंपळाच्या खाली गणपतीसमोर !!मला सोडू नकोस असा!!माय स्वीट पपी!!"

"पपी??..कसला पपी ??,,कोण पपी ?..कुठला गणपती ?..कसला पिंपळ ??..अग ए महामाये मी काय गावातला उनाड वळू वाटलो का तुला ..म्हणे पिंपळाच्या खाली शप्पथ दिलीये !!..कोण आहेस कोण तू ?..पिंपळावरची चेटकी का ??..तुला अक्कल आहे कि नाही ?..कोणालाही फोन करून झाडाखाली भेटलास म्हणून सांगतेस !!"

"ए असं रे काय माझ्या सोनुल्या!!..मी कित्ती किती वाट बघते रे तुझी !!..तुझ्यासाठी स्वेटर विणलाय मी..ये ना माझ्या राजा स्वेटर घालायला !!कधी येतोयस रे सांग ना जानू??!!"

"अग ए बाई ...आता कमाल झाली तुझी !! तू काय मेंढ्या पाळतेस का?..नाही म्हणजे असे किती लोकांना स्वेटर फुकट करून गंडा घालतेस...चिकार झाला फालतूपणा !.गपचूप फोन ठेव चल !!"

"स्वीटू ..माय जानू ...प्लीज माय टेडी ..डोन्ट डू ईट माय चम्पू!! अरे अज्जू काय झालंय आज तुला !!"

"मी तुझा तो अज्जू का फाज्जू नाहीये ...कळल??"

"हा कल्याणचाच नंबर आहे ना ..अज्जू घरत बोलतोयस ना ??..मी सोनी बोलतेय !!तुझा मोबाईल बंद आहे म्हणून घरी फोन केला होता रे "

"आता फोन ठेव महामूर्ख मुली !!हा डोंबिवली चा नंबर आहे कल्याणचा नाही !!....आणी तुझा डियर का फियर मी नाहीये !!...आणि काय ग 'सोनी' , वाट्टेल त्याला फोन करून गणपतीच्या आणि लग्नाच्या धमक्या देतेस ??.....मगासपासून सांगतोय रॉंग नंबर असेल म्हणून, तर आचरट नावे घेत बोलाव्तीयेस मला....!!बेअक्कल मुली; काही लाज वगैरे आहे कि नाही ??फुकट डोक्याची भिंगरी केलीस माझ्या !!..परत जर मला तुझा फोन आला ना तर बघ !! आणि तुझा तो चम्पू ;स्वीटू कि जानू कोण आहे ना तो मला भेटू देत फक्त मग बघ ,त्याला नाय मेंढीसारखा कातरून त्याचाच स्वेटर बनवून तुला दिला तर नाव नाही सांगणार !! अग बये ;अभ्यास कर; काही नोकरी वगैरे कर;अगदीच काही जमलं नाही तर एकदाचं त्या "स्वीटू"का "फिटू" बरोबर लग्न करून एकदाची मोकळी हो ..लग्न त्याच झाडाखाली लाव जिथे तुम्ही भेटता !!..पण परत वाट्टेल त्याला फोन करून हैराण करू नकोस !!...बोलताना जरा अक्कल जागेवर ठेवत जा बये !!"..मी होतो  म्हणून  ठीक आहे एखादा दुसरा कोणी असता ना .तर लगेच  झाडाखाली भेटायला आला असता..मग कळल असत तुला..!!.जाऊ दे चल ठेव फोन !!"

[फोन कट झालेला असतो...मी घाम पुसतो ..आणि फोन ठेवून देतो ] 
 .......हा सत्यप्रसंग आहे ....



प्रसंग क्र.२ ...माझा उडालेला गोंधळ  


मे महिना २०१० ...वेळ-सकाळी सुमारे दहा वाजता 
चुलत आत्याचा फोन येतो 

"कसा आहेस हरषु??"

"छान आहे .तू कशीयेस?.घरून बोल्तीयेस का?"

"अरे हो रे बाळा;मला मेलीला म्हातारीला आता कोण आहे मुक्कामाला यायचा विचार करतीये आज संध्याकाळी निघेन हो "

"अग ये न मग !!.काल दादांचा फोन आला होता म्हणत होते तू येणारेस इकडे "

"त्याला काय होतंय सांगायला !..या वयात झेपत नाही रे आता.मी येणारे हो तरीही  "

"मी घ्यायला येऊ न कल्याणला ?"

"अरे तसं नव्हे रे .बघ मी सांगत्ये ते सगळे लक्षात ठेव हो नीट.मी संध्याकाळी बसेन गाडीत ..मग उद्या मधुकर येणारे घ्यायला .त्याकडे जाईन ठाण्याला .दुपारी निघेन तिथून आणि अप्पांकडे जाऊन येईन.मग रात्री परत मधुकडेच मुक्काम करेन.परवा सकाळी ताईकडे भेटून येईन. माझा मेलीचा उपास असतो ना मग ताईकडेच जेवेन हो.नंतर अष्टेकर आहेत न त्यांच्या मुलीला भेटून येईन म्हणते ..दुपारी चहा वगैरे झाला कि ताईच्या लेकाला घेऊन बाजारात जाऊन येईन ..मला मेलीला काय लागते ..पण चार चौघात बसायचे असते ना म्हणून खरेदी करावी लागते ..चार पाच जरीच्या साड्या घेईन म्हणते..!!.रात्री ताईकडेच मुक्काम करेन .मग तेरवा सकाळी महादेवाला जाऊन येईन ..अरे सोमवार ना म्हणून !!..परत उपास हो माझा !!..दुपारी जरा पडले कि नन्तर मग मावशीकडे जाऊन येईन ..मग रात्री तिथेच मुक्काम..मग पुढच्या दिवशी काय करायचे ते नंतर ठरवीन !!"


"अग आत्या तू आमच्याकडे कधी येणारेस ??तेव्हढच सांग न मला!!बाकी सगळं पुराण लक्षात ठेवून काय करू मी ??"


"अरे तुमच्याकडे येण्याचे तर अजून ठरवलंच नाहीये काही ...म्हणजे येणारे हो मी ..पण कधी, कसे, किती वाजता ,ते अजून नक्की नाही ..तुला उद्या फोन करेन न आजसारखा..!!तेंव्हा परत नीट सांगेन हं सगळं !!..अच्छा !!ठेवू फोन हर्षु ??..टाटा ..घरच्यांना सांग मी येतीये म्हणून..फोन करेन उद्या !!"

"अग मग आज जे लांबलचक सांगितलंस ते रामायण ;त्याचं काय??..मी कशाला एव्हढे सगळे लक्षात ठेवू ग आत्या ??.."


"चल ,माठ कुठचा !..आजकालची मुले न तुम्ही वात्रट झालायत बोलायला..मी सांगत्ये ते सगळ्यांना कळावे म्हणून हो..नक्की सगळे सांग हा !!..विसरला नाहीस ना माझा मुक्काम कसा आणि कुठे होणारे ते.??.का परत सांगू ??..तसं उद्या फोन करेनच परत !!..सांगू का तरी पुन्हा सगळे एकदा ??""


[प्रचंड घाबरून ]
"नको नको आत्या ;सगळे लक्षात आहे ;सांगतो मी "!!


फोन बंद होतो आणि मी सुटतो!!..अर्थात काहीच आठवणार नाही याची खात्री असते...'डोन्ट वरी 'मी स्वतःला म्हणतो..कारण उद्या परत आत्या फोन करणार आहेच..!!




..............................लेखन -हर्षल...





No comments:

Post a Comment