स्वप्नांची उद्दाम कलेवरे नाचतात जेंव्हा
डोळ्यांच्या लहानशा विश्वात ..
जड होतात पापण्या आणि असह्य होतात
आशांचे आघात ..!!!
स्वप्ने किती मोठी किती विशाल !!
आणि किती लहान शबल आपले कपाल..!!
स्वप्ने जाणत नाहीत नियतीची भेसूर बंधने ..
जाणत नाहीत देहाचे बद्ध कोश...
आणि मद्यमत्त असुरान्सारखी बेहोष होऊन गिरक्या घेतात ..
हृदयाच्या संकुचित धरणीवरती ...!!
स्वप्नांची राज्ये मोठी असतात ..
अवाढव्य असतात त्यांचे संभार ...
राक्षसी असतात त्यांचे आशावाद ...
माणसाचे शरीर पोखरून टाकतात ते..
आणि कोलमडून जाते स्वप्नाच्या ताणाखाली ..
आयुष्याचे सुंदर स्वरूप...
आयुष्ये कित्येक मालवून जातात ..
आणि स्वप्ने मात्र तशीच ...अथांग..उद्दाम..
एका देहावरून दुसर्या देहावर स्वार होतात ..
आत्म्यांसारखी.....!!!
.................लेखन --- हर्षल..!!
No comments:
Post a Comment