हास्य तुझे कि;तुषार गंगेतील शुद्धसार?
रूप तुझे; जलवंती लाटांचे गर्वभार !!
मौक्तिके विशेष धुंद ऐसे तव अश्रू स्पंद !!
कलिका नवजात कुंद ऐसे तव वृत्ती छंद !!
लाघव सौहार्द तुझे कनकासम ये झळकून..
प्रेम तुझे नीलवर्ण जलधीसम ये भरून ..!!
रात्रींच्या विवरांतून अंधकार ओलांडून
धावतात रवि-शर जे तेज नवे आश्वासून ..!!
ये तशीच प्रियवदने ;विश्व सर्व उल्लंघून..
प्रेम ज्योत स्निग्ध तुझ्या अंतरात चेतवून ...!!
.............लेखन -हर्षल.------------------------------
[जुन्या लेखन पद्धतीप्रमाणे रचलेली एक कविता ].......[काही कडवी लिहिलेली नाहीत !!]...
No comments:
Post a Comment