कल्याण करी रामराया ..
जनहित विवरी !!जनहित विवरी..!! कल्याण करी रामराया ..
तळमळ तळमळ होतची आहे ...
तुझा तूच सावरी ..दयाळा ...!! कल्याण करी रामराया ..
अपराधी जन चुकतची गेले ..
हे जन हाती धरी ..दयाळा ..!! कल्याण करी रामराया ..
कठीण त्यावरी कठीणचि जाले..
आता न दिसे उरी दयाळा.....कल्याण करी रामराया !!
कोठे जावे काय करावे ;
आरंभिली बोहरी ;दयाळा ....कल्याण करी रामराया !!
दास म्हणे आम्ही केले पावलो ..
दयेस नाही सरि...दयाळा ...कल्याण करी रामराया !!
----------------------------------समर्थ रामदास स्वामी !!