"बोकड आला का रे ?"
"नाही रे;कधीपासून वाट बघतोय; गेला असेल चरायला कुठेतरी "
"अरे मग त्या डुकराला फोन नाही करता येत?"
"नाहीतर काय..पाच वाजता ठरल होत ना यायचं ?"
"अरे तुम्ही दोघे महा मट्ठ आहात..त्या गाढवाला काय महत्वाची कामे देता रे?"
"हो रे;...हा ..हा विन्या ह्यालाच जाम मस्ती अंगात ;त्या माकडाला नको ते कोलीत देऊन ठेवतो हा"
"ए ;माझ्यावर काय घसरतोस ?..मी एवढंच बोललो..त्याच्या ऑफिसजवळ दुकान आहे तो घेऊन येईल ..त्यात माझं काय चुकले?"
"नाही बाबा ..तुझ काय पण नाय चुकले..अरे तो जंगली प्राणी का नाही आलाय मग अजून?? ते तरी सांग?"...
..
................[एवढ्यात मी येतो.]..[आता तुम्हाला वाटेल कि मला आधीचा संवाद कसा कळला ?..तर त्याचे उत्तर असे कि मी माझ्या मित्रांना फार चांगला ओळखतो..वाक्य बदलणार नाहीत फार तर ती बोलणारी तोंडे थोडी बदलतील..!!असो..]
मी: काय रे माझ्या नावाने काय शिमगा चालला होता?
चम्प्या: हा बघ आला हुंदडून ...कुठे गेला होतास बोकडा??..दाढी करायला का?
मी: बोकड दाढी करायला बसलेला कुठे बघितलास सलून मध्ये?
चम्प्या: तुला बघितलाय न किती तरी वेळा..!!उशीर का झाला ते सांग..!!
मी: अरे मीटिंग होती रे..!!वेळ लागला !!
मंग्या: अरे ते मरू देत ..काम झाल का?
विन्या: हो रे ..झाल का?
मी: थांब जरा ..!!..काय उलट तपासणी घेताय कि काय अगदी?
नान्या: ए मठ्ठा ..काम झालाय का ?
मी: अर्ध झालंय..उद्या अर्ध होईल..!!
नान्या: [डोके धरून]..अरे बेअक्कल माणसा तुला जनाची नाही तर मनाची तरी ??
मंग्या: तरी मी सांगत होतो "डुक्कर ते डुक्कर"....पण तुम्हालाच जाम विश्वास..!!
चम्प्या: अरे वाट लागेल आता..काय रे साल्या ..तुला इतका बेफिकीर कोणी बनवला रे..अरे इकडे आम्ही जीव टांगणीला लावून बसलोय...आणि आता हे असे सांगतोस?"..तुला खरच सोलला पाहिजे.."
विन्या: अरे थांबा..काय रे असं कसं झालं?..आज लास्ट डे होता यार..!!
काल नोटीस वाचलीस ना...२९ मार्च शेवटचा दिवस,...!!
मंग्या: अरे विन्या खरं म्हणजे तुलाच कुटला पाहिजे...खरा मद्दड तू आहेस...!!
मंग्या: अरे आता ते जाऊ देत यार...उद्याच काय करायचं?...सगळे प्लान फेल गेले..काय यार तू??
मी: अरे सॉरी....पण
चम्प्या: सॉरी ??..तुज्या लग्नाची लॉरी!!...नीच माणसा लाज नाही वाटत सॉरी म्हणायला..??
मी: अरे त्यात काय उद्या करूयात ना....एका दिवसाने काय होणारे?..
मंग्या: विन्या ह्याला इथेच गाडू का??..एका दिवसाने ??..अरे मतिमंदा ;एका दिवसाने लास्ट डेट सुद्धा संपून जाणारे...!!..फॉर्म काय पर्वा भरणार का?
चम्प्या: म्हणून म्हणत होतो अटेसस्टेशन इथेच करून घेऊयात ...ह्याच्या ऑफिस जवळ नको...आज मी काहीतरी करून आणले असते ना...!!पण नाही सगळे फॉर्म घेऊन हा बोकड दादरला मिटींगमध्ये बसला होता..!!आणि आम्ही इथे सडतोय वाट बघत..!!
मी: अरे पण सगळ्यांचीच चूक आहे..एकतर फॉर्म लवकर भरायला आपण चुकलो..आता मला का शिव्या देताय??
विन्या: हो रे आपण उगाच वेळ काढला रे,..!!
मंग्या: अरे ;पण आपल्याला उशीरा कळलं तर आपण काय करणार?.दोन दिवसापूर्वी कळलं ना,,हां.. आता दोन दिवस आपण वाया घालवले ..पण ठीक आहे ..कितीवेळ चुका उगाळणार...??आणि आज काम झालं असत तरी उद्या भरू शकत होतो... !
मी: [चेहरा पाडून]..सॉरी रे..खरच ..मी आत्ताच्या आत्ता जाऊन बघतो काही होतंय का?माझा नाही झाला तरी चालेल पण तुमचा तरी आटेस्ट करून आणतो..माझ्यामुळे उगाच त्रास..!!
मंग्या: ए ;एवढा काय चेहरा पडतो रे?...आणि तू काय परत जाणार इतक्या लांब..मरू दे रे..बघू दुसरा काही जमतंय का?
चम्प्या: बरोबर रे..जाऊ दे रे ..बघू काहीतरी..
[बाकीचे सुद्धा तेच म्हणतात]
नान्या: चल काहीतरी खावूयात ..मग एक कटिंग मारू...फोर्मच काम होईल रे...फार काय दोन महिन्यांनी परत जाऊ स्पर्धेला..शेवटी कॅरम हा गेम आहे..यावेळी दुसरा कोणीतरी खेळेल आपल्याऐवजी..!
मी: अरे पण मीच कारणीभूत आहे यार..मी जरा लवकर निघालो असतो तर काम झाल असत यार..!!
मंग्या:. .आता बास रे तो विषय ..या वेळी स्पर्धा सोडली असं समजा ..त्यात काय रडायचं??
फालतू स्पर्धेसाठी दोस्ती जाळू काय रे..??
मी: पण स्पर्धा खेळाय्चीच...आणि दोस्ती पण तोडायची नाही ..!!
सगळे: म्हणजे??
मी: फॉर्मच काम झालाय रे........जरा खेचत होतो....खीखीखीखी ..!!
मंग्या: [आनंदात गुद्दा हाणत]:साल्या बोकडा ..मग मीटिंग च काय केलंस..??
मी: अर्ध्यात सोडली..आपल्या ग्रुपच काम आहे रे...येडा आहे का मी मीटिंग करायला?
नान्या: [मला मिठी मारून...स्वताचे डोळे पुसतो]
चम्प्या : बोलां....रानडुकराचा.......
सगळे[माझ्यासकट ].....विजय असो........!!