अजुनी तुझ्या स्मृतींचा संदर्भ तीव्र आहे
अजुनी तुझ्या स्वरांचा संसर्ग उग्र आहे.
संत्रस्त जीवनाचे आभाळ तापलेले
तुजवीण एकट्याने आयुष्य वाहिलेले
आशा निरर्थकाच्या का वाटती अजुनी ?
बहुदा तुझ्या स्मिताचा नयनात शेष आहे.
अंधार सावल्यांचा हा खेळ वेदनांचा
कित्येक माह सरले अजुनी सुरूच आहे
आनंद सर्व सरले विरहार्त शोक उरले.
अजुनी तरी मनाला तव प्रीतीसंग आहे.!!
----------------------------लेखन-हर्षल ==============================
अजुनी तुझ्या स्वरांचा संसर्ग उग्र आहे.
संत्रस्त जीवनाचे आभाळ तापलेले
तुजवीण एकट्याने आयुष्य वाहिलेले
आशा निरर्थकाच्या का वाटती अजुनी ?
बहुदा तुझ्या स्मिताचा नयनात शेष आहे.
अंधार सावल्यांचा हा खेळ वेदनांचा
कित्येक माह सरले अजुनी सुरूच आहे
आनंद सर्व सरले विरहार्त शोक उरले.
अजुनी तरी मनाला तव प्रीतीसंग आहे.!!
----------------------------लेखन-हर्षल ==============================
No comments:
Post a Comment