आयुष्य एखाद्या उन्मत्त जनावरासारखे ...भीती आणि चिंतांची राक्षसी शिंगे उगारत चाललय ...
एकेक क्षण तुफान वेगाने आपल्याला भेटतो आणि आपल्या आतून आरपार निघून जातो भूतकाळाच्या अजस्त्र असंबद्ध जाणीवेत .....
कालचे आज नाही आणि आजचे उद्या नाही.....
तरीही भविष्याची चिंताक्रांत ओझी वाहतोय आम्ही...!!
आनंद आणि उल्हास खरच आपण अनुभवतो का..??....फक्त त्याची वर्णने वाचतो आपण...कल्पनेतच सगळे जगतोय..!!
स्वप्नांसारखे चांगले आणि वाईट दुसरे काही नाही.......
कारण हीच स्वप्ने भयंकर आशा आणि अशक्यप्राय गोष्टी दाखवतात ......मनाला भुरळ पाडतात ....आणि नन्तर स्वप्नांची नशा चढलेल्या मनाला पुन्हा वास्तवाच्या भूमीवर उतरणे ;चालणे अवघड करून टाकतात..........
जगण्याची एक स्तिमित करणारी गोष्ट म्हणजे ते माणसाला जिवंत ठेवते.....अगदी किमान तशी आशा मात्र नेहेमीच राखून ठेवते..."
"कितीएक ते ते जन्मले आणि मेले "....असे जरी प्रत्येकाला समजत असते तरी तो स्वतः मात्र "घातला अमरत्वाचा पट्टा "..अशा थाटात हिंडत असतो....पाप पुण्याचे हिशेब लावत जगत असतो..!!.........
आसक्ती आणि अभिलाषा ह्या दोन जुळ्या भगिनी ...माणसाला किती फिरवतील ते काही सांगता यायच नाही.......
ही अफाट माया ..सर्वत्र वेटोळे घालून बसलेली ...तिला पार नाही ..आदि नाही ....अंत नाही.....वर्तुळाला अंत असतो का कधी..!!
तेच आयुष्य ...ह्या महामायेने उत्पन्न केलेले !!......
जेंव्हा ह्या "मायेच्या ",,पार बघण्याची दृष्टी येते ..तेंव्हा जाग येते......आणि कळतो हा भीषण पण अजाण खेळ...!!
परमेश्वर ह्या सगळ्यांना सोडून पार दूर उभा आहे.....
ही मुक्तता केवळ त्याचीच आणि हे जीवन बंध सुद्धा त्याचेच,......
भेद इतकाच कि; मायेच्या तावडीत असताना तुम्ही परमेश्वराला जाणू शकत नाही.....
आणि मायेच्या विळख्यातून मोकळे झालात कि "परमेश्वराशिवाय " अन्य काहीच पाहण्यासारखे उरत नाही..!!!!
पण हे सगळे समजणे आणि तसे घडणे ..हे फार अवघड आहे....अत्यंत अत्यंत अवघड.....!!!
------------======================================= लेखन - हर्षल ................. { मुक्तचिंतन ३]