आता पुन्हा मेघांचे स्वर ….
अस्मानातून घुमतील ।
सूर्य पुन्हा अखंड झाकून …
पृथ्वीवर फिरतील …
आता पुन्हा समुद्रांचे
काळीज येईल भरून
आता पुन्हा वादळांचे
नाद येतील दुरून ।
तापलेले जमीन खंड
थंड थंड होतील …
उन्हाळलेले रानझरे..
पुर्नजन्म घेतील ….
इंद्र वज्र उग्र पुन्हा
कडाडेल वरती
अंबरात जाळ उठे
मेघ ते वितळती ….
पुन्हा मत्त वायू भार
घेउनी मृद-गंध सार
उधळूनिया दाही दिशी
अवचित होतील पसार…
हरित रंग बहरतील
इंद्रधनू उमलतील
काळजात खोल नवे
प्रीत श्वास जन्मतील …
बरसता उधाण वृष्टी
मेघ गर्जता वरि…
थंड वात वाहताच …
मुग्ध त्यावरी ….
पुन्हा सखे ,तुझ्या स्मृती
मला भारतील…
तुझे शब्द ,तुझे स्पर्श…
पुन्हा जागतील …।
------------------------------------------------------------ written by ....-- HARSHAL .-------------------------------------------
No comments:
Post a Comment