जगण्यासाठी प्यावे लागेल ,इतके विष …
…. माहित नव्हते …
इतके वळतील रस्ते अवघड …
खरच तेंव्हा ठाऊक नव्ह्ते…।
आकांक्षेंचे लांब तन्तू
नाजूक धरून जावे लागेल…
मधेच गेले जरी तुटून …
जगणे वाहत न्यावेच लागेल…
आशा सुंदर काचेसारखी…
मधेच जाता तडकून पार …
उसासलेले काळीज घेऊन …
नाही होता येत पसार…
सगळे दु:ख हसत राहून
पहावे लागेल………।
…………। माहित नव्ह्ते…।!!
इतके वळतील रस्ते अवघड …
खरच तेंव्हा ठाऊक नव्ह्ते…। .------------------------------------------------अपूर्ण … .लेखन---------- हर्षल
No comments:
Post a Comment