Wednesday, July 24, 2013

आयुष्य !!!


भोवती अंधार भेसूर दाटताना पाहतो … 
आणि आशेचा  नवा मी सूर्य शोधू लागतो 

वासनांनी माजलेली माणसे दिसता कुठे 
धर्म उज्ज्वल शुद्ध माझा शोधण्यासी हिंडतो !!        

मानवाच्या अंतरातून भव्य ईश्वर राहतो …. 
मी तयाच्या साक्षीने आयुष्य चालत राहतो ….!

Tuesday, July 23, 2013

एकांतातून जगता जगता 
कधी उसळते मुशाफिरी …… 
 मनात  झरझर  अखंड झरती …।
नवस्वप्नांच्या धुंद सरी………

ह्या विश्वाची हजार रूपे 
बघता, जगता ती सारी 
तेंव्हा कळते ,केली आपण 
अस्सल ती दुनियादारी ……
---written by Harshal

Saturday, July 20, 2013

हे मातृभूमी तुजला मन वाहियेले 
वक्तृत्व वाग्विभवही तुज अर्पियेले। 

त्वत स्थंडीली ढकलली गृह वित्तमत्ता ।
दावानलात वहिनी- नव पुत्र कांता … 
त्वत स्थंडीली अतुल धैर्य वरिष्ठ बंधू … 
केला हवी परम कारुण पुण्यसिंधू …!!

दीप्तानलात नीज मातृ विमोचनार्थ - 
हा स्वार्थ जाळूनी आम्ही ठरीलो कृतार्थ !!

कि घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने … 
लब्ध प्रकाश ईतिहास निसर्गमाने । 
जे दिव्या दाहक म्हणुनी असावयाचे 
बुद्ध्याची वाण  करी हे धरिले सतीचे ….!!

सरती सुखे नि दु:खे …. सुटतात संग सारे …. उरतात संगतीला गतकाळ वैभवांचे …। 
आयुष्य पुष्प जाते …हळुवार ते मिटूनी …… स्मृतींमधून उरती आनंद यौवनांचे …।...written by HARSHAL
meaning.." all of joy and sorrow diminish ..and everything belonging to us leaves us...
and what remains is the beutiful earnings in  Past......the flower of LIFE ..closes and dies slowly...
and left with us is the memories of young blossoming life..."......