Saturday, July 20, 2013

हे मातृभूमी तुजला मन वाहियेले 
वक्तृत्व वाग्विभवही तुज अर्पियेले। 

त्वत स्थंडीली ढकलली गृह वित्तमत्ता ।
दावानलात वहिनी- नव पुत्र कांता … 
त्वत स्थंडीली अतुल धैर्य वरिष्ठ बंधू … 
केला हवी परम कारुण पुण्यसिंधू …!!

दीप्तानलात नीज मातृ विमोचनार्थ - 
हा स्वार्थ जाळूनी आम्ही ठरीलो कृतार्थ !!

कि घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने … 
लब्ध प्रकाश ईतिहास निसर्गमाने । 
जे दिव्या दाहक म्हणुनी असावयाचे 
बुद्ध्याची वाण  करी हे धरिले सतीचे ….!!

No comments:

Post a Comment