Friday, August 9, 2013

तुला पाहता....!!!

तुला पाहता ,चंदेरी लाटा 
मनाच्या सागरी येतात आता …. 

तुझा तो भास…तुझा निश्वास 
आठवताना  बहरे  श्वास 
  
चंद्र चांदणे पसरे जणू 
प्रीतीत तुझ्या …
नाद मंजुळ …अजुनी वाजे 
तुझ्या स्वरांचा …। 

जसे शिंपले मोती भरले 
स्पर्श तुझे ते 
तसे उरले ……. 
 तुझ्या स्मितात लोपले 
मन 
तुझ्यासाठी हे सारे जीवन ……। 
---------------------------------हर्षल

No comments:

Post a Comment