Monday, September 9, 2013

तुझी चाहूल..................!!!

कळेना काही तुझी चाहूल 
उठवते का मनात हूल 
भास निराळे ,जगावेगळे 
जागवते का मनात खोल !!

कोसळतात अजून धारा 
अजुनी वाहे उधाण वारा 
पाउस नाही जरी सभोती 
खेळ तरीही चाले हा सारा 

कळेना काही तुझी चाहूल 
जाते घालूनी चांदण भूल 
आकाशी नसे जरी चांदवा 
वाहे गारवा धुंद कोमल …!!

सुवर्ण रंगी दिशा भरती 
नभात भरे नक्षी बेभान 
राज हन्सांची शुभ्र कमान

जागे मनात तुझा जिव्हाळा 
स्पर्श हळवा ,नामानिराळा …।!!

उगाच सखे ,वेड मनास ,
जातो लावूनी ,तुझा हा भास । 
उगा पेटते काळीज जाळत 
मनाच्या तळात प्रेमाची आग…!!

------------------------------------------------==================== हर्षल ............................................. !!


No comments:

Post a Comment