काव्य रसांचा तृप्त घेउनि वेचक परी आस्वाद …
मनास लाभे बहु विषयांचा - बहुरंगी आल्हाद !!
या काव्याची सत्य थोरवी ,थोर तयाची संज्ञा ,
तुम्हा सांगण्या स्वरूप त्याचे , घेतो जनहो आज्ञा !!
सूर उमटती तार छेडीता , तान्पुरयाची जसे ,
मना छेडीता अलगद उमटे , काव्य हवे ते असे !!
दीर्घ स्वरांचा ,तीक्ष्ण स्वरांचा "वैनतेय " नभगामी !!
तसे प्रभावी ,तीव्र ,स्वयंभू ,काव्य असो हितगामी !!
अमृत-तुल्या मंथन करिता ,उभरे नवनीत सार !!
तसा मन्थने हृदयाच्या ,उभरावा काव्यविचार !!
रामदास जे समर्थ सद्गुरु ,म्हणती काव्य जयाला ।!!
तसे असावे लेखन अनुपम ,अर्पावे देवाला !!
-------------------------------------------------------------------------- हर्षल