अजुनी मनांत जळती त्या एकट्या मशाली ।
ते ताप अजून त्यांचे अन राख साचलेली …
ओसंडत्या धुक्याचे उरले उदास शेष ….
अश्रुंमधून ढळती ते हरवले निमेष …।
काही उरात उरते निर्भान वेदनांचे ….
अजुनी खुशाल घुमते भयगान यातनांचे …
एकेक पाकळीला वेचून वादळाने …
नेले उजाड झाली संताप दग्ध राने . !
हरवून वाट गेली ओल्या सुखी नद्यांची
उरली तीरांवरुनी रेती जुन्या जलांची ….
आरक्त अभ्र वरती झुलते उगाच वेडे …
त्याच्या दहा दिशांना अंधार घाली वेढे …!!
______€€€€€€€____________ हर्षल
No comments:
Post a Comment