ती : तू काही बोलणारेस का ?
तो : ………….
ती : असे गप्प बसायचा अर्थ काय घेऊ मी ? …एक तर आधीच सध्या आम्ही काळजीत आहोत सगळे !…भारतात आलोय त्याचे कारण तरी माहितीये का तुला ?… अनिकेतच्या भावाचे म्हणजे सलीलचे kidney operation होते !!… भयानक कॉम्प्लेक्स सगळे !!…. सलीलला पहिले असशील न तू !!…बिचारा !!
kidney प्रोब्लेम !! तो सुद्धा या वयात !!…किडनी रिप्लेस केली !!… DONOR मिळत नव्हता ! शेवटी अनिकेत ने जमवले काही बाही !!… MONEY matters !! १६ जण शोधले पण कोणाची kidney match होत नव्हती !!…शेवटी एक match मिळाली !!………. असो !! आता सलिल ला घेऊन अमेरिकेला च जाणारे !!
पण तू असा मधूनच फोन केलास …. म्हणून आले !!…. अजूनही तसाच आहेस !। be practical !!… बोल काय काम होते ??
तो:………………… !!
ती : काही बोलायला बोलावलेस ना !! आता वेळ नसतो मला …. ठाऊक नाही का तुला ? सगळे हिशेब नवीन झालेत आता !!…. सगळ्या गोष्टी निराळ्या आहेत आता !!…… सांग तरी काय झालय ?? प्लिज be fast !!
तो : ……………………( एक सुस्कारा टाकतो आणि पुन्हा नजर अधांतरी करून पाहू लागतो )
ती : तू जर असाच हट्टीपणा आणि विक्षिप्त पणा करणार असशील तर मी निघते ……. माणूस सुधारायला तयार नसेल तर कोण काय करणार !!!……रहा असाच अंधारात !! या अशाच स्वभावामुळे तू सगळे गमावलेस …!!….अगदी ……………मला सुद्धा !!… एक वेळ येते जेंव्हा मुलीला व्यावहारिक विचार करावा लागतो …। मी तो केला …. आणि आता मी योग्यच होते ते मला समजलय !! अगदी खरे सांगते पण… कि ,…. अनिकेत सारखा नवरा शोधून सापडला नसता!!… doctorate तर आहेच , श्रीमंत आहेच , देखणा आहेच पण सर्वात महत्वाचे म्हणजे ,
मला काय आवडते ते सगळे समजते त्याला !!………… i am damn lucky to have him !!……. just loving to be his wife !!…. तुझा निराळेपणा मला त्या वयात आवडून गेला …तुझी कला ,तुझे हसणे ,बोलणे आवडले होते !! पण नंतर माझे मलाच समजले कि मी चूक होते !!…तु चांगला असलास तरी यशस्वी होणारा नाहीस !!नुसते सद्गुण काय कामाचे ??…. life cant run on hypothesis and dreams !!..it needs strong base of practical approach !...and you have nothing except your plutonic concepts of love and knowledge !!
so i left you !!...मी ambitious मुलगी होते !!…तुझ्यावरच प्रेम हा माझा अडाणी पणा होता !!………अर्थात हे सगळे तुला ठाऊक आहेच !!आपले हे सगळे बोलून झालेय आधीच !!………मनात आले म्हणून सांगितले इतकेच !!आणि तू सुद्धा …तू कशाला बोलावलेस हे अजूनही सांगत नाहीयेस !!??…मला निघायचय आता …. उशीर होतोय !!
तो : … जास्त वेळ घेणार नाही !! ( हात पुढे करतो ) … हे घे !
ती : काय आहे ?… चेक ?? १० लाखाचा ???…. कोणाचा ??
तो : वाच !!
ती : ( वाचून ) ( भांबावून जाते )….अनिकेतने तुला चेक दिला होता ???? परवाची तारीख आहे त्यावर !! कशाबद्दल !!?? …. दहा लाख ??
वेट …… अनिकेत ने १० लाख चेक ने कुरिअर केले होते त्या … माणसाला !!…अनिकेत म्हणाला होता मला । !! the kidney donor !!!...तू ??। तू ?? तू kidney दिलीस सलिल ला ??…
तो : बाजारात अण्णा भेटले होते तुझे !!… त्यानी सगळे सांगितले !! तुम्ही दोघे परत आलायत आणि अनिकेत ला donor मिळत नाहीये म्हणून त्रास किती होतोय ते सुद्धा !!… म्हणून सहज जाउन आलो त्या दिवशी !!…. तू नव्हतीस !! अनिकेत भेटला हॉस्पिटल मध्ये ! म्हंटले त्याला जर माझी मदत झाली तर आनंदाने करेन !!… नशीबाने kidney match झाली !!… फक्त त्याला सांगितले होते कोणाला सांगू नकोस !
पण त्याने हा चेक पाठवला म्हणून तो परत करायला तुला बोलवावे लागले !
पैसे मी घेणार नाही आणि मी परत केले तर तुझा नवरा परत घेणार नाही हे मला ठाऊक आहे म्हणून तुला देतोय !!। नाइलाज होता म्हणून तुला बोलावले !! हा घे आणि परत जा !!
ती : ( रडत) का केलस तू हे ? …।
तो : ( हसून ) practical असतो तर विचार केला असता !!… पण तसे जमत नाही पहिल्यापासूनच !!… बरोबर म्हणालीस आधी तू …. अजून सुधारलो नाहीये मी !!… याच स्वभावामुळे एकदा तू गेलीस आणि आता एक अवयव !…। असो … निघुयात !! बराच उशीर झालाय !!
-------------------------------------------" एका कथेचा उत्तरार्ध " .--लेखन हर्षल ( २००७)
No comments:
Post a Comment