काही जखमा फार खोल असतात …. सनातन ।
अश्वथाम्याच्या कपाळावर असलेल्या जखमेसारख्या!!
त्यातून उमटलेले व्रण तसेच … !!
खूप काही सांगून जाणारे आणि तितकाच द्रोह आणि संताप मनात जागे करणारे …. !!
आयुष्य अश्राप आणि निरागस असताना जे जाणवत नाही , ते या अबोध जखमा नंतर जाणवून देतात !!
जे आहे ते व्यक्त होत नाही । आणि जे नाही ते ओझे उचलून चालावे लागते असा गहजब होतो !!
अनेक प्रश्न निरुत्तर राहतात … अनेक संदर्भ अस्फुट राहतात
आणि अनेक भावना दग्ध होऊन लोपून जातात …. तरी हे महाचक्र थांबत नाही …!!
शेवटी एवढेच वाटते
कि परमेश्वराला विचारावे, " हे ईश्वरा तू आम्हाला जगवतोस कशासाठी आणि मारतोस कशासाठी ,?…. आणि त्या दोन बिंदुंमध्ये हे आभाळा एवढे दु:ख
ओततोस तरी कशासाठी ?… सगळेच काही महामानव नसतात रे …. ! काही सहन करत जगतात … आणि काही जगता जगताच मरतात !!।"।
.----------------------------@-------- " मनस्वी "" या लेखातील एक भाग …। लेखन : हर्षल !!!

Sir it wass really amazing ..from .prasanna pakhare
ReplyDeleteThnks prasanna !!
ReplyDelete